भारताच्या राष्ट्रपती Droupadi Murmu यांनी सोमवारी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनाच्या गणतंत्र मंडपात आयोजित पहिल्या सिव्हिल इन्व्हेस्टिचर समारंभात (Padma Awards) पद्म पुरस्कार प्रदान केले. या समारंभात 2 पद्म विभूषण, 6 पद्म भूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले. देशातील कला, साहित्य, शिक्षण, उद्योग, समाजकार्य, विज्ञान, क्रीडा आणि सार्वजनिक जीवनात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यंदा 2026 साठी केंद्र सरकारने एकूण 131 (Padma Awards) पद्म पुरस्कारांना मंजुरी दिली आहे. त्यामध्ये 5 पद्म विभूषण, 13 पद्म भूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. उर्वरित पुरस्कार विजेत्यांचा सन्मान पुढील टप्प्यातील समारंभात करण्यात येणार आहे. समारंभात चित्रपट, संगीत, उद्योग, क्रीडा आणि लोककला क्षेत्रातील अनेक दिग्गजांना सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते Dharmendra यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या वतीने अभिनेत्री आणि खासदार Hema Malini यांनी हा सन्मान स्वीकारला. मल्याळम चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार Mammootty यांना पद्म भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच प्रसिद्ध गायिका Alka Yagnik, उद्योगपती Uday Kotak, अभिनेता R. Madhavan आणि बंगाली अभिनेते Prosenjit Chatterjee यांचाही सन्मान करण्यात आला.

Padma Awards : पद्म विभूषण पुरस्कार विजेते 2026
पद्म पुरस्कार (Padma Awards) हे भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक मानले जातात. हे पुरस्कार दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केले जातात आणि त्यानंतर राष्ट्रपती भवनात विशेष समारंभात प्रदान केले जातात.
Padma Awards 2026 अधिकृत संपूर्ण यादी आणि माहिती :
Padma Awards – पद्म पुरस्कार २०२६ :
भारत सरकारने प्रजासत्ताक दिन २०२६ निमित्त देशातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर केले आहेत. यंदा एकूण १३१ पद्म पुरस्कारांना मंजुरी देण्यात आली असून त्यामध्ये ५ पद्म विभूषण, १३ पद्म भूषण आणि ११३ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. या पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष समारंभात करण्यात येत आहे.
(Padma Vibhushan Awards) – पद्म विभूषण पुरस्कार विजेते २०२६
| क्र. | नाव | क्षेत्र | राज्य |
|---|---|---|---|
| १ | धर्मेंद्र सिंह देओल (मरणोत्तर) | कला | महाराष्ट्र |
| २ | न्यायमूर्ती के. टी. थॉमस | सार्वजनिक व्यवहार / न्यायव्यवस्था | केरळ |
| ३ | डॉ. एन. राजम | शास्त्रीय संगीत | महाराष्ट्र |
| ४ | पी. नारायणन | विज्ञान व अभियांत्रिकी | तामिळनाडू |
| ५ | व्ही. एस. अच्युतानंदन (मरणोत्तर) | सार्वजनिक व्यवहार | केरळ |
(Padma Bhushan Awards) – पद्म भूषण पुरस्कार विजेते २०२६
| क्र. | नाव | क्षेत्र |
|---|---|---|
| १ | ममूटी | कला / चित्रपट |
| २ | अलका याज्ञिक | संगीत |
| ३ | उदय कोटक | व्यापार व उद्योग |
| ४ | विजय अमृतराज | क्रीडा |
| ५ | शिबू सोरेन | सार्वजनिक जीवन |
| ६ | पियुष पांडे | जाहिरात व साहित्य |
| ७ | राकेश गंगवाल | उद्योग |
| ८ | विनोद धाम | विज्ञान व तंत्रज्ञान |
| ९ | डॉ. तेजस पटेल | वैद्यकीय क्षेत्र |
| १० | एस. पी. बालसुब्रह्मण्यम फाउंडेशन टीम | समाजकार्य |
| ११ | एल. सुब्रमण्यम | संगीत |
| १२ | अनंत गोयंका | उद्योग |
| १३ | गोकुलचंद्र पती | प्रशासकीय सेवा |
Padmashri Award – पद्मश्री पुरस्कार विजेते २०२६
कला व मनोरंजन क्षेत्र
- आर. माधवन
- प्रसेनजित चॅटर्जी
- सतीश शाह
- दीपिका रेड्डी
- तरुण भट्टाचार्य
- कुमार बोस
- तृप्ती मुखर्जी
- रघुवीर तुकाराम खेडकर
- भिकल्या लाडक्या धिंडा
- हरिचरण सैकिया
- नुरुद्दीन अहमद
- टागा राम भील
- संग्युसांग एस. पोंगेनर
- पोखिला लेखतेपी
- राजेंद्र प्रसाद
- अरविंद वैद्य
- मुरली मोहन
- सिमांचल पात्रो
- विमला मेनन
- ओथुवर तिरुथानी स्वामिनाथन
- गफरुद्दीन मेवाती जोगी
- रंजनी-गायत्री जोडी
- चिरंजी लाल यादव
- शरत कुमार पात्रा
- मीर हाजीभाई कासमभाई
- तिरुवारूर बक्तवात्सलम
क्रीडा क्षेत्र
- रोहित शर्मा
- हरमनप्रीत कौर
- मनू भाकर
- प्रमोद भगत
- शीतल देवी
- वंतिका अग्रवाल
साहित्य व शिक्षण क्षेत्र
- नरेशचंद्र देव वर्मा
- चरण हेम्ब्रम
- राबिलाल तुडू
- अनिल कुमार रस्तोगी
- भगवत मुर्मू
समाजकार्य व लोकसेवा
- जमुना तुडू
- गुरु माँ कमली सोरेन
- चामी मुर्मू
- टागा राम भील
विज्ञान, वैद्यकीय व इतर क्षेत्र
- डॉ. तेजस पटेल
- विनोद धाम
- लार्स-क्रिश्चियन कोच (जर्मनी)
- गारिमेला बालकृष्ण प्रसाद (मरणोत्तर)
- हरि माधव मुखोपाध्याय (मरणोत्तर)
- युमनाम जात्रा सिंह (मरणोत्तर)
Padma Award : पद्म पुरस्कार २०२६ मधील विशेष बाबी
- यंदा १९ महिलांना पद्म पुरस्कार जाहीर
- १६ पुरस्कार मरणोत्तर प्रदान
- ६ विदेशी / एनआरआय / ओसीआय व्यक्तींना सन्मान
- दोन संयुक्त पुरस्कार प्रकरणांचा समावेश
राष्ट्रपती भवनातील पहिला (Padma Awards) पुरस्कार समारंभ
राष्ट्रपती भवनातील पहिल्या सिव्हिल इन्व्हेस्टिचर समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अनेक मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये धर्मेंद्र, अलका याज्ञिक, आर. माधवन, प्रसेनजित चॅटर्जी, हरमनप्रीत कौर यांच्यासह अनेक दिग्गजांचा समावेश होता.
अधिकृत वेबसाईटसाठी येथे क्लिक करा.
समाज माध्यमावरील प्रतिक्रियेसाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
