मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) राजकारणात ऐतिहासिक घडामोड घडत असून तब्बल २५ वर्षांनंतर ठाकरे कुटुंबाच्या वर्चस्वाचा शेवट होण्याच्या मार्गावर आहे. भाजपच्या नगरसेविका (Ritu Tawde) रितू तावडे यांनी मुंबईच्या महापौरपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यांच्या निवडीसह मुंबईला ४४ वर्षांनंतर भाजपचा पहिला महापौर (Ritu Tawde BJP) मिळण्याची शक्यता प्रबळ झाली आहे. महायुतीतील सहयोगी पक्ष शिवसेनेने (एकनाथ शिंदे गट) उपमहापौरपदासाठी संजय घाडी (Sanjay Ghadi) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शनिवार, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी रितू तावडे(Ritu Tawde) आणि संजय घाडी यांनी महानगरपालिकेच्या सचिव कार्यालयात मंत्री मंगलप्रभात लोढा, भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम, माजी खासदार राहुल शेवाळे आणि महायुतीतील इतर नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वॉर्ड क्रमांक ५ मधील नगरसेवक संजय घाडी हे उपमहापौर म्हणून १५ महिन्यांचा कार्यकाळ सांभाळतील. त्यानंतर उर्वरित कार्यकाळात शिवसेनेचे आणखी चार नगरसेवकांना संधी देण्याचा पक्षाचा मानस आहे. संजय घाडी हे पूर्वी उद्धव ठाकरे गटातील ज्येष्ठ नगरसेवकांपैकी होते, मात्र नंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला.

Ritu Tawde आणि Sanjay Ghadi यांच्या पदांचा निकाल ११ तारखेला
रितू तावडे (Ritu Tawde) यांनी २०१२ साली भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्याच वर्षी त्या प्रथमच नगरसेवक म्हणून निवडून आल्या. पहिल्या कार्यकाळात त्यांनी शिक्षण समितीच्या अध्यक्षा म्हणून काम केले. स्थानिक पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा आणि सार्वजनिक सुरक्षेचे प्रश्न त्यांनी सातत्याने उपस्थित केले. घाटकोपर पूर्व (वॉर्ड १३२) येथील दोन वेळा निवडून आलेल्या तावडे यांनी त्यांच्या मागील कार्यकाळात दुकानांमधील मॅनिक्विन्सवरील आक्षेपार्ह कपड्यांचा मुद्दा उपस्थित करून लक्ष वेधले होते.
पत्रकार परिषदेत बोलताना अमित साटम यांनी सांगितले की, “मुंबईला ४४ वर्षांनंतर भाजपचा महापौर मिळणार आहे. महायुती BMC ला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी काम करेल.” त्यांनी पुढे म्हटले की, महायुतीकडे ११८ नगरसेवकांचा पाठिंबा असून आणखी काही सदस्यांचे समर्थनही मिळत आहे. “महापौर मराठी आणि हिंदू असावा, हा आमचा सुरुवातीपासूनचा आग्रह होता. आता मुंबईला मराठी, मालवणी, कोकणी आणि हिंदू महापौर मिळणार आहे,” असेही ते म्हणाले.
२२७ सदस्यीय मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप ८९ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला, तर शिवसेनेला २९ जागा मिळाल्या. महायुतीची एकत्रित ताकद ११८ नगरसेवकांची असून, बहुमतासाठी आवश्यक ११४ च्या आकड्यापेक्षा ती जास्त आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची १९९७ पासून सलग २५ वर्षे महापालिकेवर होती सत्ता
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (UBT), ज्यांनी १९९७ पासून सलग २५ वर्षे महापालिकेवर सत्ता राखली होती, त्यांना या निवडणुकीत ६५ जागांवर समाधान मानावे लागले. त्यांच्या सहयोगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांना १ जागा मिळाली. काँग्रेसला २४, AIMIM ला ८, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला ३, समाजवादी पक्षाला २ जागा मिळाल्या. दोन अपक्ष उमेदवारही विजयी झाले. ही निवडणूक तब्बल नऊ वर्षांनंतर पार पडली.
मागील महापालिका कार्यकाळ संपल्यानंतर ७ मार्च २०२२ पासून BMC आयुक्त राज्य सरकार नियुक्त प्रशासक म्हणून कारभार पाहत आहेत.
देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळख असलेल्या BMC चा २०२५-२६ साठीचा अर्थसंकल्प तब्बल ₹७४,४५० कोटी इतका असून, तो काही लहान राज्यांच्या अर्थसंकल्पापेक्षाही मोठा आहे. अशा परिस्थितीत येणाऱ्या महापौर आणि उपमहापौरांसमोर प्रशासन पारदर्शक आणि कार्यक्षम करण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
समाज माध्यमावरील प्रतिक्रियेसाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
