पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत दुधाळ गायी म्हशींची वाटप Sarkari Yojna- सरकारी योजना सुरु करण्यात आलेली असून या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाला खास करून अल्प भूधारक, भूमी हीन, महिला बचत गट, सुशिक्षित बेरोजगार, २ हेक्टर च्या आत शेती धारक, १ हेक्टर च्या आत शेती धारक शेतकरी, अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे इत्यादी अर्ज करणाऱ्या अर्जदारांपैकी सफलता पूर्वक निवड झालेल्या शेतकऱ्यांना २ दुधाळ गायी किंवा २ दुधाळ म्हशींचा गट वाटप केली जाते जेणेकरून अल्प व अत्यल्प उत्पन्न गटातील शेतकऱ्याच्या उत्पन्नात या जोड व्यवसायातून वाढ होऊ शकेल.
- (Sarkari Yojna)सरकारी योजनेसाठी दुधाळ गायी किंवा म्हशीचा प्रकार
- दोन गायींच्या गटाची प्रकल्प किंमत
- दोन गायींच्या गटासाठी मिळणारे शासकिय अनुदान व शेतकऱ्याचा स्वहीस्सा
- दोन म्हशीच्या गटाची प्रकल्प किंमत
- दोन म्हशीच्या गटासाठी मिळणारे शासकिय अनुदान व शेतकऱ्याचा स्वहीस्सा
- लाभार्थी निवडीचे निकष
- अर्जासोबत जोडायची कागदपत्रे
- अर्ज कसा करावा
- गायी म्हशीची योजने संदर्भात येणारी जाहिरात
- अर्ज सादर करा

(Sarkari Yojna)सरकारी योजनेसाठी दुधाळ गायी किंवा म्हशीचा प्रकार
दुधाळ गायी म्हशीच्या योजने अंतर्गत निवड झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार खालील प्रमाणे गायी अथवा म्हशी घ्यायच्या असतात ज्याची रक्कम नंतर योजनेनुसार शेतकऱ्याच्या खात्यात जमा होते
- संकरित गाय – जर्सी / एच.एफ.
- म्हैस – जाफराबादी / मुऱ्हा
- देशी गाय – थारपारकर देवनी, लाल कंधारी, गवळाऊ, गीर, साहिवाल, रेड सिंधी, डांगी व राठी
दोन गायींच्या गटाची प्रकल्प किंमत
| अ.क्र. | बाब | दोन गायींचा गट किंमत |
| १ | संकरीत गायीचा गट, प्रति गाय ७०००० रु प्रमाणे | १,४०,००० रुपये |
| २ | जनावरांसाठी गोठा | ० |
| ३ | स्वयंचलीत चार कटाई यंत्र | ० |
| ४ | खाद्य साठविण्याची शेड | ० |
| ५ | जनावरांचा विमा | १६८५० रुपये |
| एकूण प्रकल्प किंमत | १,५६,८५० रुपये |
दोन गायींच्या गटासाठी मिळणारे शासकिय अनुदान व शेतकऱ्याचा स्वहीस्सा
| अ.क्र. | प्रवर्ग | दोन गायींचा गट अनुदानित रक्कम |
| १ | अनुसूचित जातीतील शेतकरी – ७५ % अनुदान | १,१७,६३८ रुपये |
| २ | अनुसूचित जातीतील शेतकरी – २५ % स्वहीस्सा | ३९,२१२ रुपये |
| ३ | सर्वसाधारण गटातील शेतकरी – ५०% अनुदान | ७८,४२५ रुपये |
| ४ | सर्वसाधारण गटातील शेतकरी – ५०% स्वहीस्सा | ७८,४२५ रुपये |
दोन म्हशीच्या गटाची प्रकल्प किंमत
| अ.क्र. | बाब | २ म्हशीच्या गटाची किंमत |
| १ | दोन म्हशीचा गट – प्रत्येक म्हैस ८०,००० रुपये प्रमाणे | १,६०,००० रुपये |
| २ | जनावरांसाठी गोठा | ० |
| ३ | स्वयं चलीत चारा कटाई यंत्र | ० |
| ४ | खाद्य साठविण्यासाठी शेड | ० |
| ५ | जनावरांचा विमा | १९,२५८ रुपये |
| एकूण प्रकल्प किंमत | १,७९,२५८ रुपये |
दोन म्हशीच्या गटासाठी मिळणारे शासकिय अनुदान व शेतकऱ्याचा स्वहीस्सा
| अ.क्र. | प्रवर्ग | दोन म्हशीच्या गटासाठी अनुदानिक रक्कम |
| १ | अनुसूचित जातीतील शेतकरी – ७५ % अनुदान | १,३४,४४३ रुपये |
| अनुसूचित जातीतील शेतकरी – २५ % स्वहीस्सा | ४४,८१५ रुपये | |
| सर्वसाधारण गटातील शेतकरी – ५०% अनुदान | ८९,६२९ रुपये | |
| सर्वसाधारण गटातील शेतकरी – ५०% स्वहीस्सा | ८९,६२९ रुपये |
लाभार्थी निवडीचे निकष
Sarkari Yojna-सरकारी योजना – गायी म्हशीची वाटप राज्यस्थरीय योजने अंतर्गत अर्जदाराची निवड निकष प्राधान्यक्रम उतरत्या क्रमाने खालीलप्रमाणे दिले आहे
- महिला बचत गट
- अल्प भूधारक शेतकरी
- १ हेक्टर पर्यंत भूधारक शेतकरी
- २ हेक्टर पर्यंत भूधारक शेतकरी
- रोजगार व स्वयं रोजगार केंद्रात नोंद असलेले ग्रामीण सुशिक्षित बेरोजगार.

अर्जासोबत जोडायची कागदपत्रे
- फोटो ओळखपत्राची सत्य प्रत (अनिवार्य)
- सातबारा (अनिवार्य )
- ८ अ (अनिवार्य)
- अपत्य दाखला स्वघोषणापत्र (अनिवार्य)
- आधारकार्ड (अनिवार्य)
- सात बारा मध्ये लाभार्थ्याचे नाव नसल्यास कुटुंबाचे संमतीपत्र, दुसऱ्याची जमीन भाडेतत्वावर असल्यास करारनामा (असल्यास अनिवार्य)
- अर्जदार हा (SC) अनुसूचित जाती, (ST) जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (अनिवार्य)
- रहिवाशी प्रमाणपत्र (अनिवार्य)
- असल्यास दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र (अनिवार्य)
- बँक खाते पासबुक सत्यप्रत (अनिवार्य)
- कुटुंबातील एकाच व्यक्तिल लाभ मिळत असल्यामुळे कुटुंब प्रमाणपत्र / रेशन कार्ड (अनिवार्य)
- असल्यास दिव्यांग असल्याचा दाखला (अनिवार्य)
- बचत गट सदय असल्यास – बचत गटाचे प्रमाणपत्र अथवा बचत गटाच्या बँक पासबुकाची सत्यप्रत
- जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत शैक्षणिक पात्रतेचा दाखला
- सुशिक्षित बेरोजगार असल्यास स्वयं रोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
- प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत
अर्ज कसा करावा
गायी म्हशीची वाटप सरकारी योजना (Sarkari Yojna ) राज्यस्थरीय साठी अर्ज दोन पद्धतीने करता येतो ऑनलाईन वेबसाईट www.ah.mahabms.com, या संकेत स्थळाच्या माध्यमातून किंवा स्मार्ट फोन आणि इंटरनेट असेल तर AH-MAHABMS या नावाचे मोबाईल APP प्ले स्टोर वरून घेऊन त्या APP च्या मध्ज्यामातून ओपन होणाऱ्या पर्यायांपैकी “वेळापत्रक” या पर्यायावर जाऊन वेळापत्रक वाचून प्रत्येक वर्षी अर्ज भरणे सुरु झाल्याच्या तारखेनुसार अगोदर जर आपण अर्ज केला नसेल तर “अर्जदार नोंदणी” या पर्यायावर क्लिक करून येणारा फॉर्म भरायचा आहे संपूर्ण माहिती अचूक भरायची आहे. नंतर भरून झालेल्या फॉर्म ची प्रिंट घ्यायची आहे. जर अगोदरच्या वर्षी अर्ज केलेले असेल आणि निवड झालेली नसेल तर मागील माहितीच्या आधारावर याही वर्षी आपण अर्ज करू शकतो त्यासाठी “योजनेसाठी अर्ज करा” या पर्यायावर जाऊन माहिती भरायची आहे. केलेला अर्ज पाहण्यासठी ‘केलेले अर्ज” या पर्यायाचा वापर करता येतो.
Sarkari Yojna अर्जाची प्रक्रिया
अर्जदार नोंदणी – ऑनलाईन अर्ज जमा करणे – प्रणाली द्वारे लाभार्थी यादी तयार होणे – स्क्रुटिनी / प्राथमिक निवड होते -निवड झालेल्या अर्जदारांना SMS (संदेश) द्वारे कळविले जाते.
त्यापुढील सर्व प्रक्रिया SMS द्वारे कळविले जाते व त्यानुसार कार्यवाही करायची असते. या Sarkari Yojna च्या संबधित संदेश (SMS) “CP-JAIENP” या नावाने येत असतो तो मराठी भाषेत असतो.
गायी म्हशीची योजने संदर्भात येणारी जाहिरात
गायी म्हशीची Sarkari Yojna – राज्यस्थरीय योजनेचे वेळापत्रक वेळोवेळी जाहीर केली जाते. संबंधित वेळापत्रके आपणास आमच्या ब्लॉगवर देखील पाहता येऊ शकेल
अर्ज सादर करा
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट | https://ah.mahabms.com |
Sarkari Yojna विषयी आमच्या इतर पोस्ट वाचण्यासाठी आम्ही खाली लिंक देत आहोत.
Pradhanmantri Awas Yojna – प्रधानमंत्री आवास योजना शहरी- या विषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
