SBI JOB : स्टेट बँकेत तब्बल 5410 जागांची मेगा भरती; महाराष्ट्रात सर्वाधिक 504 जागा

Vishal Patole
By
Vishal Patole
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News...

SBI JOB: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या (SBI) State Bank of India ने Apprentice पदांसाठी मोठी भरती जाहीर केली असून तरुणांसाठी ही मोठी रोजगाराची संधी मानली जात आहे. SBI Apprentice Recruitment 2026 अंतर्गत देशभरात हजारो पदांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रासाठी तब्बल 504 जागा राखीव ठेवण्यात आल्या असून मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे, रायगडसह अनेक जिल्ह्यांमध्ये भरती होणार आहे.

SBI JOB

SBI JOB Apprentice 2026 –  महाराष्ट्रात कुठे किती जागा?

जाहिरातीनुसार महाराष्ट्रात एकूण 504 जागा उपलब्ध आहेत.

  • मुंबई आणि उपनगरांसाठी सर्वाधिक 90 जागा आहेत.
  • त्याशिवाय पुणे-20,
  • ठाणे-35,
  • नाशिक-16,
  • नागपूर-13,
  • कोल्हापूर-13,
  • रायगड-15,
  • छत्रपती संभाजी नगर -14,
  • सोलापूर-14,
  • सातारा-13 अशा विविध जिल्ह्यांमध्ये भरती होणार आहे. ग्रामीण भागातील युवकांनाही मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

SBI JOB Apprentice 2026 – पात्रता

कोण अर्ज करू शकतो?

या भरतीसाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे.

  • उमेदवारांचे वय 1 एप्रिल 2026 रोजी किमान 20 वर्षे आणि कमाल 28 वर्षे असावे.
  • SC/ST उमेदवारांना 05 वर्षांची वयोमर्यादा सवलत, तर OBC उमेदवारांना 03 वर्षांची सवलत मिळणार.

प्रशिक्षण कालावधी आणि स्टायपेंड

निवड झालेल्या उमेदवारांना एक वर्षाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण काळात उमेदवारांना दरमहा ₹15,000 स्टायपेंड दिले जाणार आहे. मात्र, Apprentice उमेदवारांना इतर कोणतेही भत्ते किंवा बँक कर्मचाऱ्यांना मिळणारे फायदे मिळणार नाहीत.

परीक्षा पद्धती कशी असेल?

भरतीसाठी ऑनलाइन लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

  • परीक्षेत General Awareness,
  • English,
  • Quantitative Aptitude
  • आणि Reasoning & Computer Aptitude या विषयांवर आधारित 100 प्रश्न विचारले जाणार आहेत. प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र वेळ देण्यात येणार आहे आणि संपूर्ण परीक्षा 60 मिनिटांची असेल.
  • चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्किंगची तरतूद करण्यात आली असून प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 गुण वजा केले जाणार आहेत.

मराठीत परीक्षा देण्याची सुविधा

महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी परीक्षा इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेत उपलब्ध असणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आणि मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बाब मानली जात आहे.

स्थानिक भाषेची चाचणी आवश्यक

लेखी परीक्षेनंतर उमेदवारांची स्थानिक भाषेची चाचणी घेतली जाणार आहे. उमेदवारांना संबंधित राज्यातील स्थानिक भाषा वाचता, लिहिता आणि बोलता येणे आवश्यक आहे. मात्र 10वी किंवा 12वीमध्ये संबंधित भाषा शिकल्याचा पुरावा असल्यास स्वतंत्र भाषा परीक्षा द्यावी लागणार नाही.

SBI JOB Apprentice 2026 – अर्ज शुल्क किती?

 General, OBC आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹300 ठेवण्यात आले आहे. SC, ST आणि PwBD उमेदवारांना शुल्कमाफी देण्यात आली आहे.

 Apprentice म्हणजे कायम नोकरी नाही

SBI ने जाहिरातीत स्पष्ट केले आहे की Apprentice ही कायमस्वरूपी नोकरी नसून प्रशिक्षण स्वरूपाची संधी आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर बँकेकडून कायम नोकरीची हमी दिली जाणार नाही. मात्र भविष्यातील Junior Associate भरतीमध्ये Apprentices ना काही प्रमाणात प्राधान्य आणि सवलत दिली जाऊ शकते.

अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन

उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून अर्ज करताना फोटो, स्वाक्षरी, थंब इम्प्रेशन आणि हस्तलिखित घोषणा अपलोड करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक तपासावी, कारण अंतिम सबमिट केल्यानंतर माहितीमध्ये बदल करता येणार नाही.

 परीक्षेसाठी महत्त्वाच्या सूचना

परीक्षा केंद्रावर उमेदवारांना आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा इतर वैध ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक असेल. मोबाईल फोन, स्मार्टवॉच, कॅल्क्युलेटर किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण परीक्षा केंद्रात नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.

 SBI JOB – युवकांसाठी मोठी संधी

बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी SBI Apprentice भरती 2026 ही अत्यंत महत्त्वाची संधी मानली जात आहे. विशेषतः महाराष्ट्रातील युवकांसाठी 504 जागा उपलब्ध असल्यामुळे या भरतीकडे मोठे लक्ष लागले आहे. बँकिंग क्षेत्रातील अनुभव, प्रशिक्षण आणि भविष्यातील नोकरीच्या संधींसाठी ही भरती फायदेशीर ठरणार आहे.

अधिकृत जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :

बातमीन्यूज

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
प्रतिक्रिया नाहीत

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत