Stand Up India Scheme- तरुणांना उद्योगशीलतेकडे वळवणारी योजना.

Stand Up India

Vishal Patole
Stand Up IndiaStand Up India

भारत सरकारची हि एक महत्वपूर्ण योजना आहे स्टैंड अप इंडिया योजना -Stand Up India Scheme, हि योजना एस. सी., एस. टी. प्रवर्गातील लोकांना तसेच सर्व प्रवर्गातील महिलांनी उद्योगशीलते कडे वळावे या उद्देशाने सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पात्र अर्जदारांना नवीन उद्योग सुरु करण्यासाठी १० लाख रु पासून ते १ करोड रुपयापर्यंतचे कमी व्याजदरावर लोन दिल्या जाते. जेणेकरून मागासवर्गीय समाजातील होतकरू मुलांना व्यवसाय क्षेत्रात उतरता येईल व त्यातून त्यांना स्वत: रोजगार मिळून त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून इतर हातांना देखील रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील.

stand up india

STAND UP INDIA LAUNCH DATE

महिला आणि SC आणि ST समुदायांमधील उद्योजकतेला पाठिंबा देण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिल 2016 रोजी स्टँड-अप इंडिया योजना सुरू केली.

STAND UP INDIA पात्रता

  • या योजनेअंतर्गत वैय्यक्तिक कर्ज योजनेसाठी केवळ महिला (कोणत्याही प्रवर्गातील) आणि एस. सी. , एस. टी. प्रवर्गाचा व्यक्ती पात्र आहे.
  • या स्कीमअंतर्गत कंपनीच्या नावाने लोन घेण्यासाठी – संबंधित कंपनीमधील ५१ % पेक्षा अधिक हिस्सेदारी एस. सी. , एस. टी. प्रवर्गाचा व्यक्ती असावा किंवा महिला उद्यमीच्या नावे असली पाहिजे.
  • अर्जदार डीफौल्टर नसावा – अर्जदारावर कोणत्याही बँकेचे लोन डीफौल्ट केलेले नसावे म्हणजेच पूर्वीचे न चुकवलेले थकीत लोन नसावे.
  • पात्र अर्जदाराचा सिबिल स्कोर चांगला असावा.
  • केवळ नवीन उद्योग सुरु करण्यासाठीच Stand Up India Scheme अंतर्गत लोन दिल्या जाते.
  • अगोदर सुरु असलेल्या व्यवसायांना या योजनेंतर्गत लोन मिळत नाही.
  • अर्जदाराकडे सर्व के. वाय. सी कागदपत्रे उपलब्ध असावीत – जसे कि आधार कार्ड, Pan कार्ड, इत्यादी

STAND UP INDIA SCHEME वय मर्यादा

  • या योजनेत पात्र होण्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी १८ वर्ष आणि जास्तीत जास्त ५७ वर्ष वय असणे अत्यंत आवश्यक आहे.

Stand Up India Scheme अंतर्गत लोन किती मिळते व व्याज किती असते ?

  • अर्जदाराच्या आवश्यकते नुसार व प्रकल्पाधारित १० लाख रुपयांपासून ते १ करोड रुपयांपर्यंतचे लोन मिळते
  • बँक MCLR+३% (बँकांना RBI कडून मिळणाऱ्या व्याजदरात ३ टक्के वाढवून)
  • उदा: MCLR दर जर ६ % असेल तर वरील लोन मध्ये आपणास व्याज राहील ९ % (या संदर्भात बँकेशी संपर्क साधावा)
  • सदर योजनेमध्ये सामन्यात: एकूण प्रकल्प रकमेच्या ७५ % रक्कम बँक लोन स्वरुपात मंजूर होत असते तर २५ % रक्कम पात्र अर्जदाराला स्वत: उभी करावी लागते.
  • काही प्रकरणात सरकार अर्जदारास स्वहीस्सा १० % भरून बँक कर्ज ९०% करण्यास सुट देऊ शकते.

STAND UP INDIA LOAN INTEREST RATE- व्याज

  • Stand Up India Scheme अंतर्गत मिळणाऱ्या लोनवर बँक MCLR+३% (बँकांना RBI कडून मिळणाऱ्या व्याजदरात ३ टक्के वाढवून) उदा: MCLR दर जर ६ % असेल तर वरील लोन मध्ये आपणास व्याज राहील ९ % (या संदर्भात बँकेशी संपर्क .साधावा) अशा प्रकारे व्याज आकारले जाते.

किती कालावधीसाठी लोन मिळते ?

  • ७ वर्षाच्या कालावधीसाठी लोन मिळते
  • १८ महिन्याचा मेरोटोरीयम पिरीयड मिळतो म्हणजे सुरुवातीच्या १८ महिन्यात EMI न भरता केवळ लोनवरील व्याज रक्कम भरली तरीही चालते.
youtube video related to Stand Up India SCHEME

ग्यारंटी / सिक्युरीटी

  • या योजनेत CGFSIL अंतर्गत भारत सरकार लोनची ग्यारंटी घेत असते.
  • बँक लोन मंजूर करण्यासाठी बँकेच्या नियमानुसार आवश्यक त्या पद्धतीची सिक्युरिटी पात्र अर्जदारास मागू शकते.

कोणत्या व्यवसायासाठी स्टैंड अप लोन मिळते ?

  1. उत्पादन व्यवसाय – (Manufacturing Business)- कोणत्याही वस्तूची निर्मिती करणारे सर्व प्रकारचे व्यवसाय उत्पादन व्यवसाय मानले जातात. अशा प्रकारच्या उद्योग उभारणीसाठी Stand Up India Scheme अंतर्गत लोन दिल्या जाते.
  2. सेवा क्षेत्र (Service Sector)- ज्या व्यवसायात समाजाला विविध सेवा पुरवल्या जातात जसे कि ग्राहक सेवा केंद्र, बि. पी. ओ., कुरिअर सेवा, बँकिंग सेवा, ट्रान्सपोर्ट सेवा इत्यादी प्रकाच्या सेवा आधारित उद्योग उभारणीसाठी Stand Up India Scheme अंतर्गत लोन दिले जाते.
  3. कृषी आधारित व्यवसाय (Allied to Agriculture Business)- शेती, शेतमाल, उत्पादन आधारित व्यवसाय जसे कि टोमाटो केचअप निर्मिती, फळ, भाजीपाला स्टोरेज सुविधा, धान्य कोठारे, कृषी उत्पादने खरेदी विक्री, शेतमालावर प्रक्रिया करणारे कोणत्याही प्रकारचे व्यवसाय उभारणीसाठी या योजने अंतर्गत लोन मिळते.
  4. ट्रेडिंग व्यवसाय (Trading Business)- कोणत्याही प्रकारच्या वस्तूंची विक्री ज्या व्यवसायात होते असे व्यवसाय देखील या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

कर्जाचे स्वरूप

व्यवसायाच्या स्वरूपानुसार व गरजेनुसार कर्जाचे स्वरूप एकतर टर्म लोन किंवा वर्किंग कॅपिटल या स्वरूपाचे असू शकते अथवा टर्म लोन अधिक वर्किंग कॅपिटल या स्वरूपाचे देखील असू शकते.

  • टर्म लोन – व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक सेट अप लावण्यासाठी सहसा टर्म लोन चा वापर होतो ज्या अंतर्गत मिळणारी राशी हि उद्योगाला आवश्यक असलेला सेट अप उभा करण्यासाठी अथवा व्यवसायाला आवश्यक मशिनरी खरेदीसाठी केला जातो.
  • वर्किंग कॅपिटल- ज्या व्यवसायांना खेळत्या भांडवलाची आवश्यकता जास्त असते त्या व्यवसायांना या प्रकारच्या लोनची गरज भासते ज्यामध्ये मिळणारी कर्जाची रक्कम हि व्यवसायात खेळत्या भांडवलात जास्त वापरली जाते.
  • टर्म लोन + वर्किंग कॅपिटल– पुष्कळ व्यवसायांना उद्योग उभारणीसाठी मशिनरी सह खेळत्या भांडवलाची देखील गरज व्यवसाय चालवण्याकरिता असते अश्या वेळेस टर्म लोन + वर्किंग कॅपिटल या दोन्ही प्रकारच्या लोनची गरज असते ज्याच्या अंतर्गत मिळणारी कर्जाची रक्कम हि व्यवसाय उभारणी सोबतच व्यवसायात आवश्यक असणाऱ्या खेळत्या भांडवलात वापरली जात असते.

Stand Up India Scheme साठी आवश्यक कागदपत्रे

  • ओळख प्रमाण – अर्जदाराचे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा पासपोर्ट किंवा PAN कार्ड.
  • अर्जदाराचा जातीचा दाखला.
  • पत्याचा पुरावा – रहिवाशी पुरावा आणि उद्योगाचा पत्ता दर्शवणारा पुरावा.
  • अर्ज कंपनीच्या नावाने असेल तर – इनकार्पोरेशन प्रमाणपत्र (नोंदणी प्रमाणपत्र), पार्टनरशिप डीड, व्यवसायाची जागा भाड्याने असल्यास भाडेपट्टा, असेट लयबेलिटी रेकोर्ड, इन्कम TAX रिटर्न (वैयक्तिक).
  • प्रोजेक्टेड BALANCESHEET , पी.सी.बी. लायसेन्स, व्यवसायानुसार इतर आवश्यक लायसन्स/ परवाने.
  • सुनियोजित आणि चांगला प्रकल्प अहवाल.

अर्ज रिजेक्ट होण्याची कारणे

  • ज्या व्यवसायाच्या उभारणीच्या उद्देशाने आवश्यक लोनसाठी अर्जदार अर्ज करतो त्या व्यवसायासाठी आवश्यक स्कील अर्जदाराकडे नसेल तर अर्ज रद्द होतो.
  • अर्जदाराचा सिबिल स्कोर जर बँक मान्यतेनुसार व बँकेच्या नियमानुसार नसेल तर अर्ज रद्द होतो.
  • सुनियोजित प्रकल्प अहवालाच्या त्रुटीमुळे देखील आपले लोन अप्लिकेशन रद्द होऊ शकते.
  • कागदपत्रे मिसप्लेस होणे किंवा गहाळ होणे यासारख्या कारणांमुळे देखील आपला अर्ज रद्द होऊ शकतो.

म्हणून अर्जदाराने संबंधित योजनेअंतर्गत लोन साठी अर्ज करण्याअगोदर आवश्यक त्या सर्व स्कील आपल्या अंगी अवगत कराव्यात व तत्संबंधी प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावे अथवा तयार ठेवावेत. आपला सिबिल स्कोर खराब असल्यास तो सुधारून घ्यावा व त्यानंतरच अर्ज करावा, योग्य त्या प्रोफेशनलच्या हाथाने प्रकल्प अहवाल बनवावा व स्वत: तो समजून घेऊन बँकेला पटवून देता यावा, कागदपत्रे गहाळ होऊ नयेत म्हणून ऑनलाईन अर्ज करून मग फाईल बँकेकडे सुपूर्द करावी. तर अर्ज नाकारल्या जाण्याची शक्यता कमी होते.

Stand Up India Scheme साठी अर्ज कसा करावा ?

  • या योजनेसाठी अर्ज करण्याकरीता www.standupindia.in किंवा www.udyamimitra.in या वेबसाईट वर जाऊन पात्र अर्जदारास अर्ज करता येतो.
  • आपल्या क्षेत्रात नेमलेल्या Lead District Manager च्या माध्यमातून सुद्धा अर्ज करता येतो. Lead District Manager ची यादी आपणास www.standupindia.in या वेबसाईटवर पाहता येते.
  • डायरेक्ट बँकेत जाऊन देखील वरील योजनेसाठी अर्ज दाखल करता येतो.

तसेच या योजनेविषयी अधिक सविस्तर माहिती आपणास www.standupindia.in या वेबसाईट वर पाहता येते.

STAND UP INDIA APPLICATION FORM

या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

STAND UP INDIA LOGIN

या योजनेमध्ये नोंदणी किंवा लॉगीन करण्यासाठी दुसरी पद्धतसुद्धा आहे किंवा दुसरी वेबसाईट लिंक पुढे दिली आहे – https://udyamimitra.in/

FAQ

Q. What is the Stand-Up India concept?

Ans. :- आपल्या देशात बेरोजगारी एक मोठी समस्या आहे आणि सरकरी नोकरी सर्वांना देता येणे सरकारसाठी शक्य नाही. तसेच शिक्षणानंतर तरुणांनी केवळ नोकरीची वाट पाहत बसण्यापेक्षा उद्योगाकडे वळावे जेणेकरून त्यांना स्वत: लाच नाही तर इतरांना देखील रोजगार मिळवून देता येईल त्याकरिता भारत सरकार ने Stand-Up India concept आणली ज्यामध्ये भारतीय तरुणांमध्ये उद्योगशीलता वाढीस लागावी या करिता सरकार स्तरावरून पयत्न केले जातात.


Who is eligible for Stand-Up India?

Ans. :- Stand Up India Scheme अंतर्गत वैय्यक्तिक कर्ज योजनेसाठी केवळ कोणत्याही प्रवर्गातील महिला आणि एस. सी. , एस. टी. प्रवर्गाचा व्यक्ती पात्र आहे.


What is Stand-Up India Scheme 2023?

Ans. :- भारत सरकारची हि एक महत्वपूर्ण योजना आहे स्टैंड अप इंडिया योजना -Stand Up India Scheme, हि योजना एस. सी., एस. टी. प्रवर्गातील लोकांना तसेच सर्व प्रवर्गातील महिलांनी उद्योगशीलते कडे वळावे या उद्देशाने सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पात्र अर्जदारांना नवीन उद्योग सुरु करण्यासाठी १० लाख रु पासून ते १ करोड रुपयापर्यंतचे कमी व्याजदरावर लोन दिल्या जाते.


Who launched the Stand-Up India scheme?

Ans. :- भारत सरकारने Stand-Up India scheme launch केलेली आहे. भारत सरकारची हि एक महत्वपूर्ण आणि महत्वाकांक्षी योजना आहे.

इतर योजनांविषयी सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.

PM Kisan Sanman Nidhi Yojna

Pradhanmantri Awas Yojna

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
3 टिप्पण्या

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत