बॉलिवूड अभिनेता (Sunil Shetty) सुनील शेट्टी यांनी कांतारा (Kantara Chapter 1) चित्रपट पाहून आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. १० ऑक्टोबर रोजी ट्विटरवर (X) केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी या चित्रपटाने त्यांना किती खोलवर स्पर्श केला हे सांगितले. सुनील शेट्टी यांनी लिहिले की, “काल रात्री कांताराने फक्त मला भारावूनच टाकले नाही, तर माझ्या नसानसांत तो शिरला. अंगावर रोमांच आणणारे क्षण, डोळ्यात पाणी, अभिमान, समाधान – हे सगळं एकाच वेळी जाणवलं.” त्यांनी पुढे म्हटलं, “खऱ्या सिनेमाचं हे सामर्थ्य असतं – तो आपल्याला आपल्या मुळांशी जोडतो. जेव्हा भारतीय सिनेमा आपल्या मातीत, आपल्या लोकांबद्दल, आपल्या देवांबद्दल बोलतो – तो पवित्र होतो. आणि आपण या कथांना प्रामाणिक राहिलो, तर कधीही वाईट सिनेमा निर्माण होणार नाही.”

Kantara Chapter 1 चित्रपट पाहून आल्यावर Sunil Shetty पुढे म्हणतात
रिशभ शेट्टी आणि संपूर्ण कांतारा टीमचं कौतुक करताना सुनील शेट्टी म्हणाले, “फक्त आपल्या मुळांशी वेड्यासारखं जोडलेला, आणि त्यात आसक्त असलेला माणूसच इतकं प्रभावी काही निर्माण करू शकतो. हा चित्रपट माझ्या मनात खूप, खूप काळ राहील.”रिशभ शेट्टी यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला कांतारा हा चित्रपट भारतीय संस्कृती, लोककथा आणि अध्यात्म यांना प्रभावीपणे पडद्यावर आणतो. होम्बले फिल्म्स च्या बॅनरखाली निर्मित या चित्रपटाला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, आता सुनील शेट्टी यांच्या प्रतिक्रियेनंतर चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा चर्चेचा विषय झाला आहे.
‘कांतारा: अ लिजेंड चॅप्टर-1’ Kantara Chapter 1 चा बॉक्स ऑफिसवर जलवा — जगभरात ५५० कोटींपेक्षा अधिक कमाई!
भारतीय सिनेमाच्या भव्यतेला आणि सांस्कृतिक मुळांना नव्याने जिवंत करणारा ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा: अ लिजेंड चॅप्टर-1’ सध्या बॉक्स ऑफिसवर इतिहास रचत आहे. स्थानिक भाषांतील प्रेक्षकांपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील चाहत्यांपर्यंत – या चित्रपटाचा “जादू” सर्वत्र पसरला आहे.
चित्रपटाच्या याच जादूमुळे ‘कांतारा: अ लिजेंड चॅप्टर-1 ने रचला जागतिक कमाईचा नवा विक्रम
‘कांतारा’ने सर्व भाषांतील एकूण संग्रहात तब्बल ₹५५४.५ कोटींचा टप्पा पार केला आहे. त्यापैकी भारतातच नेट कमाई ₹३९७.६५ कोटी, तर ग्रॉस कमाई ₹४७४.५ कोटी इतकी झाली आहे. चित्रपटाने परदेशातही ₹८० कोटींहून अधिक ची कमाई नोंदवली आहे. वेगवेगळ्या भाषेत तयार झालेल्या या चित्रपटाच्या सर्वच संस्करनाणी जोरदार कमाई केली आहे.
कन्नड व्हर्जन: स्थानिक रंगात जागतिक यश
- कन्नड नेट कलेक्शन: ₹१२५.७ कोटी
- दिवस १० कमाई: ₹११.२५ कोटी
कर्नाटकात ‘कांटारा’ हा अभिमानाचा विषय ठरला आहे. लोककथा, देवभक्ती आणि निसर्गाशी जोडलेली काव्यात्मक कथा या सिनेमाला प्रेक्षकांनी अंगीकारले आहे.
तेलुगू व्हर्जन: आंध्रच्या प्रेक्षकांकडून जोरदार प्रतिसाद
- तेलुगू नेट कलेक्शन: ₹७२.०५ कोटी
- दिवस १० कमाई: ₹५.२५ कोटी
तेलुगू राज्यांमध्येही सिनेमाला मोठी मागणी मिळत असून प्रेक्षकांनी थिएटरमध्ये ‘पूर्ण हाऊस’चा माहोल तयार केला आहे.
हिंदी व्हर्जन: उत्तर भारतात ‘कांतारा’ ची लाट
- हिंदी नेट कलेक्शन: ₹१२९.५ कोटी
- दिवस १० कमाई: ₹१३.५ कोटी
उत्तर भारतात ‘कांटारा’ने आपली छाप सोडत बॉलिवूडच्या मोठ्या चित्रपटांनाही मागे टाकले आहे. सिनेमाची धार्मिक पार्श्वभूमी आणि आत्मीय कथनशैली मराठी, हिंदी आणि उत्तर भारतीय प्रेक्षकांना तितकीच भावली आहे.
तमिळ आणि मल्याळम व्हर्जनचेही उत्साहवर्धक आकडे
- तमिळ नेट कलेक्शन: ₹३८.७५ कोटी
- दिवस १० कमाई: ₹४.७५ कोटी
- मल्याळम नेट कलेक्शन: ₹३१.६५ कोटी
- दिवस १० कमाई: ₹३.२५ कोटी
या आकड्यांवरून दिसून येते की, दक्षिणेतील प्रत्येक राज्यात ‘कांतारा’ने आपल्या मायभूमीच्या कथा आणि परंपरांना सन्मानाने पुढे नेले आहे.
भारतीय सिनेमाचा आत्मा
‘कांतारा: अ लिजेंड चॅप्टर-1’ हा केवळ एक चित्रपट नसून, तो भारतीय संस्कृतीचा उत्सव बनला आहे. देव, निसर्ग आणि माणसातील नात्याचे दर्शन घडवणारा हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या मनातच नव्हे तर बॉक्स ऑफिस रेकॉर्ड बुकमध्येही अमर झाला आहे.
अभिनेता सुनील शेट्टी यांची समाज माध्यम साईट “x” प्रतिक्रिया पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट:
