मुंबई,वरळी : “आवाज मराठीचा” या रॅलीमध्ये जवळपास वीस वर्षांनी एकाच मंचावर आलेले (Thakre) ठाकरे बंधू – राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे – यांनी मराठी अस्मिता, हिंदुत्व आणि भाषेच्या मुद्द्यावर एकत्र येण्याचा संदेश दिला. पण या एकतेवर सत्ताधाऱ्यांकडून जोरदार टीका करण्यात आली.

हिंदी भाषा शिकवण्याच्या मुद्द्यावर सुरु असलेल्या वादानंतर सरकारने माघार घेतल्याच्या पार्श्वभूमीवर दि ०५-०७-२०२५ रोजी “आवाज मराठीचा” या रॅलीचे आयोजन केले गेले होते. वरळी, मुंबई येथील NSCI डोम सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भाषणे झाली. या भाषणांवर सत्ताधाऱ्यांकडून जोरदार टीका होताना दिसत आहे.
राज ठाकरे (Thakre) यांच्या भाषणावर फडणवीस यांचं व्यंगात्मक प्रत्युत्तर
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की,
“जे बाळासाहेब ठाकरे करू शकले नाहीत, ते देवेंद्र फडणवीस यांनी केलं – आम्हाला एकत्र आणलं.”यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राज ठाकरे यांनी मला श्रेय दिलं याचा मी आभारी आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंनी वरून मला आशीर्वाद दिले असतील.” पुढे व्यंग करत ते म्हणाले, “ही विजय रॅली होती असं सांगण्यात आलं, पण प्रत्यक्षात ‘रुदाली भाषण’ ऐकायला मिळालं. मराठीबद्दल एकही ठोस मुद्दा मांडला नाही. २५ वर्षे मुंबई महापालिका यांच्याच ताब्यात होती, तरीही दाखवण्यासारखं काहीच काम केलं नाही.”
शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर (Thakre) हल्ला: “सत्तेची भूक आणि असूया”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर टीका करत म्हटलं,
“राज ठाकरे यांनी खऱ्या अर्थाने मराठी भाषेची चिंता व्यक्त केली, पण उद्धव ठाकरेंचं भाषण हे पूर्णपणे असूया, تل्ही आणि सत्तेच्या भुकेने भरलेलं होतं.” ते पुढे म्हणाले, “ही सभा मराठी अस्मिता जागवण्यासाठी होती, पण उद्धव ठाकरेंनी मराठी माणसांचे एकही मुद्दे मांडले नाहीत. त्यांचा अजेंडा फक्त राजकीय स्वार्थ आणि सत्ता मिळवण्यापुरता मर्यादित होता.”
“हिंदुत्व आणि मराठी अस्मितेचा विश्वासघात” – शिंदे यांचा आरोप
शिंदे म्हणाले, “2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी (Thakre) भाजपला सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता मिळवण्यासाठी युती केली. त्यामुळे त्यांनी बाळासाहेबांची विचारधारा आणि मराठी जनतेचा विश्वासघात केला.”
“मुंबईत मराठी माणसांची लोकसंख्या कमी होत आहे, त्यांचं प्रतिनिधित्व कमी होतंय. आणि याला कारणीभूत कोण?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
पंतप्रधानांचा अपमान? शिंदे यांनी दावा केला की,
“उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही भाषणात टीका केली, जी अत्यंत दुर्दैवी आणि सत्तेसाठीची विवशता दर्शवते.”
रामदास आठवले आणि शेलार यांची टीका
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांना इशारा देत म्हटलं, “मराठी भाषेवर प्रेम असावं, पण हिंदीचा विरोध करणं योग्य नाही. मनसे कार्यकर्त्यांनी दादागिरी करू नये. अशी दादागिरी होऊ लागली, तर उत्तर दादागिरीनंच दिलं जाईल.”
ते म्हणाले, “मुख्यमंत्री फडणवीस यांनी अशा प्रवृत्तीविरुद्ध कडक कारवाई करावी. ही एकता महाविकास आघाडीत फूट पाडू शकते.”
आशिष शेलार यांनी रॅलीवर टीका करत म्हटलं,
“ही सभा भाषेच्या प्रेमासाठी नव्हती, तर एका घरातून हाकलून दिलेल्या भावाची पुन्हा आठवण आल्यामुळे झाली होती. भाजपा महापालिकेत ताकदवान होत असल्यामुळेच (Thakre) ठाकरे बंधूंना आपली भावकी आठवली.”
“साथ आलो, साथ राहू!” – उद्धव ठाकरे NSCI डोममध्ये कार्यकर्त्यांच्या जल्लोषात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले,
“आम्ही एकत्र आलो आहोत आणि आता एकत्रच राहणार आहोत. महापालिकेवर आणि महाराष्ट्रात पुन्हा सत्ता मिळवू.”त्यांचं भाषण “मराठी भाषा आणि अस्मिता” या मुद्द्यावर केंद्रित होतं आणि त्यांनी हिंदी थोपवण्याच्या प्रयत्नाचा तीव्र निषेध केला.
राज ठाकरेचा इशारा: “मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची तयारी?” राज ठाकरे म्हणाले, “तीन भाषांंच्या शिक्षण धोरणामुळे मराठी भाषा मागे पडणार होती. ही योजना म्हणजे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रारंभ आहे. महाराष्ट्रावर हात टाका आणि काय होतंय ते बघा!”
ठाकरे (Thakre) बंधूंचं एकत्र येणं याचा राजकीय अर्थ:
मुंबई महापालिकेच्या इलेक्शनपूर्वी नवे समीकरण ? ठाकरे बंधूंचं एकत्र येणं हे मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी मोठा राजकीय संदेश मानला जात आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना (UBT) मागील काही निवडणुकांमध्ये अपयशी ठरली असून, मनसेचं राजकीय अस्तित्वही अलीकडच्या काळात कमी झालं आहे. ही सभा दोघांनाही पुन्हा एकत्र येऊन राजकीय पुनरागमनाची संधी देऊ शकते.
निष्कर्ष:
(Thakre) ठाकरे बंधूंचं एकत्र येणं हे मराठी अस्मिता आणि भाषेच्या मुद्द्यांवर आधारित असल्याचं जरी दाखवलं गेलं तरी सत्तेच्या समीकरणात या मंचाच्या राजकीय हेतूंची छाया अधिक स्पष्टपणे दिसून आली. आगामी निवडणुकीत ही एकता टिकते का, आणि जनतेचा विश्वास पुन्हा मिळवता येतो का, हे पाहणं रंजक ठरणार आहे.
काल ५ जुलै २०२५ रोजी मुंबईत झालेल्या मराठी माणसांच्या भव्य विजयी मेळाव्याची चित्रफीत.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
IGR Maharashtra Hall Ticket 2025: नोंदणी व मुद्रांक विभागाच्या शिपाई भरती परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर
