संसदेवरील 2001 च्या दहशतवादी हल्ल्याच्या स्मरणदिनाच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचे (Vinayak Damodar Savarkar) यांच्या बाबत भारतीय युवांना आवाहन !

Vishal Patole

दिल्लीतील संसदेवरील 2001 च्या दहशतवादी हल्ल्याच्या स्मरणदिनाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा देशातील तरुणांना उद्देशून बोलताना अमित शहा म्हणाले की, “ज्याप्रमाणे वीर सावरकरांनी (Vinayak Damodar Savarkar) मातृभूमीसाठी आपले जीवन समर्पित केले, त्याच भावनेने तरुणांनी सुरक्षित आणि समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी कार्य करावे.”  अमित शहा यांनी सांगितले की आज भारताची युवा पिढी देशाच्या प्रगतीत आणि राष्ट्रनिर्मितीत महत्वाची भूमिका बजावत आहे. त्यांना राष्ट्रभक्ती, शिस्त आणि एकात्मतेचा आदर्श वीर सावरकरांच्या कार्यातून घ्यावा लागेल. देशाच्या सुरक्षेसाठी, विकासासाठी आणि आत्मनिर्भरतेसाठी युवाशक्तीचे बळ निर्णायक ठरणार असल्याचे ते म्हणाले.

Vinayak Damodar Savarkar

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा आज १३ डिसेंबर या दिवशी २००१ मध्ये झालेल्या संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना आदरांजली वाहिली

 दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा आज १३ डिसेंबर या दिवशी २००१ मध्ये झालेल्या संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना आदरांजली वाहिली. आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, “या दिवशी आपण त्या सर्वांना स्मरतो ज्यांनी आपल्या संसदेवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात शौर्य, तत्परता आणि कर्तव्यनिष्ठेचे उत्तम उदाहरण घालून दिले. भारताला त्यांच्या पराक्रमाबद्दल सदैव कृतज्ञता राहील.”

पंतप्रधानांच्या या वक्तव्यातून राष्ट्राच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या जवानांप्रती पुन्हा एकदा आदरभाव व्यक्त झाला. संसदेवरील हल्ल्याला आज २४ वर्षे पूर्ण होत असताना देशभरात त्या शूरवीरांच्या कार्याचे स्मरण करण्यात येत आहे. 

या दोन्ही विधानांतून राष्ट्रभक्ती, सुरक्षा आणि देशनिर्मितीचा एकसंध संदेश देण्यात आल्याचे दिसून येते. भाजपच्या राज्य आणि केंद्रस्तरीय नेतृत्वाकडून युवांना सतत देशाच्या प्रगतीसाठी प्रेरित केले जात असून, वीर सावरकरांच्या विचारांवर आधारित राष्ट्रभावनेचा पुरस्कार करण्यात येत आहे. 

संसद हल्ल्याच्या शहीद वीरांना अमित शहा यांचे श्रद्धांजली अर्पण 

१३ डिसेंबर २०२५ रोजी, संसद भवनावरील २००१ मधील दहशतवादी हल्ल्याच्या स्मरणदिनी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शौर्यवान जवानांना आदरांजली वाहिली. आपल्या एक्स (Twitter) पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “आजचा दिवस हा देशाच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडताना अपार धैर्य आणि जिद्द दाखवणाऱ्या सुरक्षाबलांच्या पराक्रमाचे स्मरण करण्याचा दिवस आहे. २००१ मध्ये जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या मंदिरावर झालेल्या त्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला आपल्या जवानांनी आपल्या जिगरबाज वृत्तीने निष्फळ ठरवले.” 

शहा यांनी पुढे लिहिले की, “आतंकवाद्यांना तोंड देत शौर्याने वीरगती प्राप्त झालेल्या सर्व सुरक्षाबलांप्रती मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. हे राष्ट्र त्यांच्या त्याग आणि बलिदानाचे सदैव ऋणी राहील.”त्यांच्या या संदेशातून देशाच्या सुरक्षेबाबतची ठाम भूमिका आणि शहीद जवानांविषयीचा सखोल आदरभाव अधोरेखित झाला. 

अंडमान आणि निकोबार बेटांच्या ऐतिहासिक भूमीवर, १२ डिसेंबर २०२५ रोजी स्वातंत्र्यवीर (Vinayak Damodar Savarkar) विनायक दामोदर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण

अंडमान आणि निकोबार बेटांच्या ऐतिहासिक भूमीवर, १२ डिसेंबर २०२५ रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण आणि “वीर सावरकर प्रेरणा उद्यान”चे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक पू. डॉ. मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. 

या प्रसंगी राष्ट्रभक्तीचा आणि त्यागाचा आर्त संदेश देणारा वातावरण भारावून गेला होता. भाजपा महाराष्ट्राने आपल्या अधिकृत ‘एक्स’ हँडलवरून लिहिले, “हे मातृभूमी, तुजसाठी मरण ते जनन; तुजविण जनन ते मरण.” या ओळींद्वारे त्यांनी सावरकरांच्या बलिदानाची आठवण करून दिली आणि नमूद केले की अंदमानने अनेक स्वातंत्र्यसैनिकांचे त्याग, समर्पण व शौर्य पाहिले आहे. 

गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटले की, “वीर सावरकरांचे जीवन मातृभूमीवरील अथांग प्रेम आणि राष्ट्रासाठी प्राणांचे बलिदान देण्याची प्रेरणा देते. अंडमान आणि निकोबारची ही भूमी सावरकरांसह अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची साक्षीदार आहे.” त्यांनी पुढे असेही म्हटले की, “आज आम्ही सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या सोबत सावरकरांच्या पुतळ्याचे अनावरण आणि ‘वीर सावरकर प्रेरणा पार्क’चे उद्घाटन करून त्यांच्या स्वप्नांच्या भारताकडे वाटचाल करत आहोत.” 

या कार्यक्रमाद्वारे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचे पुन्हा एकदा स्मरण झाले असून, राष्ट्रनिर्मिती आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या दिशेने त्यांचा आदर्श भावी पिढ्यांना प्रेरित करीत राहील, असा भाव व्यक्त करण्यात आला.

समाज माध्यमावरील प्रतीक्रीयेंसाठी येथे क्लिक करा.

आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :

बातमी न्यूज

 

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
प्रतिक्रिया नाहीत

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत