महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा महत्त्वाचा टर्निंग पॉइंट: आज सकाळी ७ पासून मतदान प्रक्रिया सुरु- Maharashtra Election 2024

Vishal Patole
Maharashtra Election 2024

Maharashtra Election 2024- आज २० नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात मतदान सुरु झाले आहे. राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये सकाळी ७ वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरु झाली असून, सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल. निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. मतदान हा लोकशाहीने भारतीय नागरिकांना दिलेला अमुल्य अधिकार आहे याचा वापर जर आपण अजून केला नसेल तर चला, उठा बाहेर पडा, रांगेत उभे राहून आपला मताधिकार वापरा. अन्यथा तुम्ही न वापरलेल्या अधिकारामुळे तुम्हाला नको असलेले निकाल तुमच्या हाथी येतील.

महाराष्ट्राच्या आगामी भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या या निवडणुकीत मोठ्या संख्येने मतदारांनी सहभाग घेतला पाहिजे, असे आवाहन अनेक प्रमुख नेत्यांनी केले आहे. सोमवारी झालेल्या प्रचार मोहिमेच्या समारोपात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाद्रा यांनी निवडणुकीत आपआपल्या पक्षांचा व उमेदवारांचा शक्य तेथे प्रचार केला आहे.

सध्याच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील दोन प्रमुख राजकीय गटांमध्ये लढत पाहायला मिळत आहे. सत्ताधारी ‘महायुती’ गटात भारतीय जनता पार्टी (भा.ज.प.), शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP- अजित पवार गट) यांचा समावेश आहे. तर, विरोधकांच्या ‘महाविकास आघाडी’ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC), शिवसेना (UBT- उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (SP- शरद पवार गट) यांचा समावेश आहे.

Maharashtra Election 2024

मतदानाचे महत्त्व- Maharashtra Election 2024


मतदान केवळ एक नागरिक म्हणून आपला हक्कच नाही, तर आपल्याला आपल्या राज्याच्या आणि देशाच्या भवितव्यावर प्रभाव टाकण्याची संधी देखील आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क वापरून मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा. आपल्या पसंतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी “मतदान” हे लोकशाहीने आम्हाला दिलेले एक महत्त्वाचे शस्त्र आहे, ज्यामुळे आपल्या व आपल्या समाजाच्या भविष्याची दिशा ठरवली जाऊ शकते.

प्रत्येक मतदाराची एकवटलेली शक्ती हाच लोकशाहीचा (डेमोक्रसीचा) मुख्य गाभा आहे, आणि म्हणूनच आपला मतदानाचा हक्क संजीवनीसारखा महत्वाचा ठरतो. महाराष्ट्राच्या निवडणुकीत- Maharashtra Election 2024 मध्ये तुमचा आवाज महत्त्वाचा आहे—हे लक्षात ठेवून सर्व नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात विविध नेत्यांनी मतदारांना मतदानासाठी प्रेरित करण्याच्या अनेक प्रयत्नांमध्ये भाग घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महायुतीला विजय मिळविण्याचे आवाहन केले, तर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाद्रांनी महाराष्ट्राच्या भाकिताच्या विकासासाठी महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याची अपील केली.

Maharashtra Election 2024- आजच्या मतदानामुळे राज्यात भविष्यातील सरकार कोण ठरवणार हे निश्चित होईल, आणि त्यामुळे प्रत्येक मतदाराने मतदानाचे महत्त्व समजून सहभागी व्हावे, ही आजची सर्वोच्च आवश्यकता आहे.

दुपारी १ वाजे पर्यंत केवळ ३२.१८ % मतदान

शेवटची माहिती मिळाल्यानुसार दुपारी १ वाजेपर्यंत संपूर्ण राज्यात सरासरी केवळ ३२.१८ % मतदान झाले आहे तर मुंबई मध्ये सर्वात कमी २७ टक्के मतदान झाले आहे. याचा संदेश मध्यमवर्गीयांची मतदानाकडे पाठ असा हि असू शकतो किंवा सायंकाळी निवांत मध्यमवर्गीय मतदार बाहेर पडू शकतो.

इलेक्शन विभागाच्या अधिकृत पोर्टलसाठी येथे क्लिक करा.

आमचे इतर ब्लॉगपोस्ट :

सिंदखेडराजा मतदार संघातील नेत्यांचे भविष्य केवळ मराठा आणी मुस्लीम मतदारांच्या हाथात ? Election 2024

तुमचे वोट तुमचेच नाही तर तुमच्या येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य ठरविणार आहे ! Maharashtra Election 2024

महाराष्ट्राचे “हिंदुहृदयसम्राट” आणि राजकारणातील प्रखर सूर्य : बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thakre)

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
Leave a Comment

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत