Maharashtra Election 2024- किराणा सामान घेतांना मी जातीवाल्याचे दुकान कधीच शोधत नाही, शेतात काम करायला जाताना मी शेतीमालक माझ्या जातीचा कधीच शोधत नाही, फळे खरेदी करताना मी माझ्या जातीचा फळविकणारा कधीच शोधत नाही, बांधकाम मजूर म्हणून मजुरी करत असताना मी फक्त माझ्या जातीच्याच ठेकेदाराच्या हाथाखाली कधीच काम करत नाही किंवा फक्त माझ्याच जातीच्या माणसाचे घर कधीच बांधत नाही, चहा प्यायला जाताना मी माझ्या जातीचा चहावाला कधीच शोधत नाही, पान सुपारी खाताना मी माझ्या जातीचा पान टपरी वाला कधीही शोधत नाही, कपडे घेताना मी माझ्या जातीच्या माणसाचे कपड्याचे दुकान कधीच शोधत नाही, गाडी खरेदी करताना मी माझ्या जातीच्या माणसाचे शोरूम कधीच शोधत नाही, मिठाई, गुलाबजाम, रबडी, रस मलाई खायला घेताना मी मिठाईचे दुकान माझ्या जातीवाल्याचे कधीच शोधत नाही, जे अन्न आपण खातो ते आपल्याच जातीवाल्याच्या शेतात पिकलेले आहे का ? हे मी कधीच पाहत नाही, बोर खोदताना बोरवाला आपल्याच जातीचा मी कधीच शोधत नाही, घराचे काम करताना लागणारी वीट आणायला आपण आपला जातीचा वीटभट्टी वाला कधीच शोधत नाही, घराला लागणारी रेती विकणारा आपण आपल्या जातीचा कधीच शोधत नाही, घर बनवायला लागणारी गिट्टी विकणारा आपण आपल्या जातीचा शोधत नाही, घरासाठी सिमेंट, लोखंड, फरशी विकत घेताना आपण हॉर्डवेअरचे दुकान आपल्या जातीवाल्याचे शोधत नाही, घराला टाइल्स बसवताना कारागीर आपण आपल्याच जातीचा शोधत नाही, लेकरे शाळेत टाकताना त्यांना शिकवणारा शिक्षक आपण आपल्याच जातीचा शोधत नाही, प्रवास करताना गाडीतून जाताना गाडीवाला आपण आपल्या जातीचा कधीच शोधत नाही, मटण खाणारे मटण घ्यायला गेल्यावर आपल्याच जातीचे मटनाचे दुकान शोधत नाही, मासे घेताना आपल्याच जातीच्या माणसाचे मासेविकणारा शोधत नाही, आजारी पडल्यावर आपल्याच जातीवाला डॉक्टर आपन शोधत नाही, नकाशा बनविताना इंजिनिअर आपण आपल्या जातीचा शोधत नाही, कटिंग, दाढी करायला गेल्यावर हेअर सलून आपण आपल्या जातीच्या माणसाचे शोधत नाही, झाडू घेताना दुकान आपण आपल्या जातीच्या माणसाकडून घेत नाही, मडके घेताना, बांबू विकत घेताना आपण आपल्या जातीच्या माणसाला शोधत नाही, सोने चांदी घ्यायला जाताना माझ्या जातीवाल्याचे सोन्याचांदीचे दुकान मी कधीच शोधत नाही, गाडीत पेट्रोल टाकतांना आपल्या जातीवाल्याचा पेट्रोल पंप कधी मी शोधात नाही, बाजारातून कांदा, लसून, टमाटे विकत घेताना आपल्या जातीचा भाजीपाला विकणारा आपन शोधत नाही, अशा हजारो व्यावहारिक क्रिया ज्या तुमच्या कमवलेल्या पैशाच्या भरवशावर दिवसरात्र चालतात त्या करताना आपण “जात” पाहत नाही पण जेव्हा मतदान येते फक्त तेव्हाच मी “माझी जात- उमेदवाराची जात” आणि “माझी पार्टी- त्याची पार्टी” का करतो बरे ?
माझ्या जातीचा नेता कसा निवडून येईल -Maharashtra Election 2024
आपल्या जातीचा नेता निवडून यावा तो आमदार, खासदार व्हावा, तो मंत्री व्हावा तो मुख्यमंत्री बनावा किंवा तो थेठ पंतप्रधान बनावा असे स्वप्न पाहणे म्हणजे गुन्हा नाही, पाप नाही किंवा चुकीच नाहीच. पण जरा विचार करा प्रत्येक जातीच्या माणसाने जर आपल्याच जातीचा माणूस निवडणूक जिंकावा असे म्हंटले तर ते शक्य होणार आहे का? जर व्यावहारिक बुद्धीने विचार केला तर कोणतीही निवडणूक जिंकायची म्हणजे त्याला निवडणुकीत उभा असलेल्या उमेदवाराला बहुमत मिळवणे गरजेचे असे पण मग आपल्या जातीचे मतदान किती? आणि निवडणूक जिंकण्यासाठी मते लागतील किती ? मग आपला जातवाला निवडून येणार कसा ?
मग आता विचार करा कि जो उमेदवार तुमच्या जातीच्या नावावर उभा आहे किंवा जी पार्टी केवळ तुमच्या जातीच्या लोकांसाठी काम करते अशा पार्टी कडून उभा आहे किंवा जो उमेदवार केवळ तुमच्याच जातीच्या लोकांची मते मागत असेल तर त्या उमेदवाराला तुमच्या जातीची एकूण मते किती आहेत हे माहित नसेल का ? आणि त्याला इतर जातीचे मते किती हे माहित नसेल का ? जेव्हा त्याने इतर जातींसाठी काही केले नाहीच आहे किंवा तो केवळ तुमचा नेता आहे तर अन्य जातीवाले त्याला मतदान का करतील ? जेव्हा इतर जातीवाल्यांचे आपआपले उमेदवार उभे असताना ते त्यांच्या जातीवाल्यांना सोडून तुमच्या जातीवल्या नेत्याला का मते देणार आहेत? याच संख्येच्या पेचात साक्षात संविधान रचईता डॉ. बाबासाहेब आंबेडकर देखील अडकले होते. त्यांना देखील कित्येक ठिकाणी निवडणूक जिंकता आली नाही.म्हणून काय मग आम्ही आमच्या जातीचा माणूस इलेक्शन ला उभा करायचा नाही का ? तर उत्तर आहे होय, आपापल्या जातीचा माणूस जेथे आपले संख्याबळ आहे आणि समाजात एकता आहे जेथे आपल्या जातीच्या नेत्याचे कार्य एवढे मोठे आहे कि अन्य जातीचे लोक देखील त्यांना आपला नेता मानतात असे नेते शोधून जेथे आपले संख्याबळ आहे तेथे आपल्या जातीचा नेता निश्चितपणे निवडून येणार आहे. पण ज्या मतदारसंघात अशी परिस्थिती नाही तेथे उभे असणारे आपल्या जातीचे नेते हे केवळ आपली मते फोडण्याचे काम करणार आहेत. मते फोडणे हा शब्द यासाठी कि आपण निवडून येणार नाही हे त्या उभ्या राहणाऱ्या नेत्याला देखील माहित असते. मग आता विचार करा तो नेता उभा राहिला कशासाठी ? केवळ तुमच्यातील मते खाण्यासाठी.
मुस्लिमांचे एकगठ्ठा मते आणि हिंदूंची जाती जातीत विखुरलेली मते
जर मुस्लीम वोटबँक च्या संदर्भात बघितले तर मुस्लिमांची मते कधीच फुटत नाहीत. त्यांच्यात देखील बरेच प्रकार असतात जसे खाटिक, कुरेशी, सुन्नी, शिया, देवबंदी, सिद्दिकी इत्यादी कितीतरी प्रकारअसले तरीही त्यांची मते एक मुस्लीम म्हणून एकाच ठिकाणी पडणारे असतात . कारण ते मुस्लीम म्हणून एक आहेत, ते पाचवेळा नमाजीला जातात आणि एकच आणि स्पष्ट संदेश त्यांच्यातील प्रत्येक मुसलमानापर्यंत पोहोचलेला असतो त्यामुळे त्याला काय करणे आहे आणि कोणाला मत देणे आहे हे स्पष्ट असते. त्याच्या गल्लीत कितीही रस्ते झाले. घरे झालीत, नाल्या झाल्यात, रेशन फ्री मिळाले, लाडकी बहिण योजना, मुलींना शिष्यवृत्ती सगळे घेऊनदेखील ज्यांनी हे सर्व केले ते लोक जर ,मुस्लिमांचा अजेंडा पुढे चालवीत नसतील आणि त्यांच्या वर्चस्वाला जर धक्का बसत असेल तर तशा पार्टीला ते केव्हाच वोट देत नाहीत हे गेल्या ७० वर्षात आणि विशेष म्हणजे गेल्या १० आणि अतिवेशेष म्हणजे २०२४ च्या लोकसभा इलेक्शनसाठी झालेल्या मतदानाच्या शैलीवरून आलेल्या निकालावरून स्पष्ट झालेलेच आहे. पण त्यांच्या विरुद्ध आम्ही ८० करोड म्हणवून घेणारे लोक हिंदू म्हणून जरी ८० टक्के असलो तरीही इलेक्शनवेळी आम्ही जातीवादी होतो किंवा तसा अजेंडा राबवून राजकारणी आपल्या पोळ्या भाजून घेण्यासाठी आमच्यात हेतुपुरस्पर जातिवाद पेरतात. कारण त्यामुळे आम्ही जाती जातीत विखुरले जाऊन जो विकासकामे करणारा आणि सर्व जातींना समान न्याय देणारा नेता असतो त्याची निवड न करता आमच्या जातीचा, जवळचा, आवडता नेता निवडतो जो कि निवडून येणारच नसतो मग आमचे विखुरलेले मत वाया जाते आणि मुस्लिमांचे एक गठ्ठा मते मिळवून चुकीचा अजेंडा चालवणारे, मुस्लीम अजेंड्याचे समर्थन करणारे नेते आरामात निवडून येतात. पण त्यांना हे माहित असते कि, तुमची मते त्यांना मिळालेलीच नाहीत मग तुमची कामे ते कशासाठी करतील. याउलट सच्चे नेते ज्यांचा अजेंडा केवळ हिंदूहीतच नसून राज्याचा सर्वांगीण विकास आहे. आणि ज्यांच्या योजना केवळ हिंदूंच्या अठरापगड जातींनाच नाही तर मुस्लिमांना देखील विकासयात्रेत सोबत घेऊन जाणाऱ्या असतात. तेही मुस्लिमांची मते त्यांना मिळालेली नसताना. मग खरे लोकशाहीवादी कोण ? हे समजून न घेता आम्ही विखुरलेले मतदान करतो हिंदू म्हणून एकगठ्ठा मतदान करत नाही त्याचा अभ्यास मुरब्बी राजकारण्यांना चांगलाच आहे.
ह्या सरकार ने मलं काय देलं -Maharashtra Election 2024
ज्या लोकांनी मला टोयलेट दिले त्याच्याशी मला काही देणेघेणे नाही, मी मत माझ्या पार्टीला आणि माझ्या जातीवाल्यालाच देईन, ज्याने रस्ते बनविले, ज्याने रस्त्यातले गड्डे बुझविले त्याच्याशी मला काय करणे आहे, मी मत माझ्या पार्टीला आणि माझ्या जातीवाल्यालाच देईन, ज्या लोकांनी घरकुले वाटली, त्यांना मी मते का द्यावे? ज्या लोकांनी माझ्या समाजातील लोकांना उद्योजक बनविण्याचे स्वप्न दाखविले, त्याला मी मते का द्यावीत / मला स्वप्न पाहायला ज्याने शिकवले त्याला मी मते का देऊ? जो दिवसरात्र केवळ समाजातील गोर गरिबांसाठी काम, काम आणि केवळ काम करत आहे मी त्याला मत का देऊ? ज्याने माझ्या देशातील बॉम्बस्फोट संपून टाकले मी त्याला मते का देऊ ? ज्याने माझ्या राज्यातील दंग्यांचा बाजार बंद केला ज्यामुळे माझ्या जातीच्या मुलांवर लादल्या जाणाऱ्या केसेस बंद झाल्या व माझ्या जातीचे या दंग्यात, जाळ पोळीत मरणे व जेल मध्ये जाणे बंद झाले अशा नेत्याला मी का मत द्यावे? ज्यांनी शेती विकासासाठी शेतीचे यांत्रिकीकरण करण्याच्या हेतूने सर्वांना समान संधी मिळावी म्हणून गोर गरिबांना अधिक अनुदान देऊन विविध शेतयोजना आणल्या त्याला मी मते का देऊ? मी मत माझ्या पार्टीला आणि माझ्या जातीवाल्यालाच देईन, तो म्हणतो २०४७ मध्ये भारत विकसित होणार, मग मला त्याचे काय मी मत माझ्या पार्टीला आणि माझ्या जातीवाल्यालाच देईन.
ज्या धोरणामुळे व योजनेमुळे हजारो शेतकरी आत्महत्या थांबल्या ती प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना जिच्या अंतर्गत १२००० रु वर्षाला शेतकऱ्याच्या खात्यात थेट येतात ज्याच्यासाठी कोणत्याही नेत्याच्या पाया पडावे लागत नाही, साहेबाच्या मागे फिरावे लागत नाही त्या योजनेची सुरवात ज्या नेत्याने केली त्या नेत्याच्या पार्टीला आणि नेत्याला आम्ही काहून येवढा मान द्यायचा ? याउलट मी मत माझ्या पार्टीला आणि माझ्या जातीवाल्यालाच देईन, म्या मपल्या माय, बहिणीचे आन बायकोचे आवश्यक कागदपत्रे कधी पहिलेच नव्हते पण लाडकी बहिण योजना आली म्हणून मला तिचे आधार दुरुस्त करावे लागले, तिचे मतदान नीट नव्हते ते नीट करून घेतले, तिचे रेशन कार्ड बनवायला टाकले, बँकेचे खाते नव्हते तर ते खोलुन घेतले, हे सगळे करून ज्या लोकांनी खरेखुरे महिला सबलीकरण केले त्या लोकांना मी मते का देऊ ? मी मत माझ्या पार्टीला आणि माझ्या जातीवाल्यालाच देईन,ज्याने एस.ई.बी.सी. चे आरक्षण सर्वप्रथम आणले, ज्याने अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ आणून माझ्या जातीच्या गोर गरिबा लेकरांना कर्ज दिले व उद्योग उभारणीस मदत केली त्या नेत्याला मी मते काहून देऊन त्यो काय आमच्या जातीचा थोडाच आहे? ज्याने सारथी सारखी व्यवस्था आणली ज्याच्यातून मपल्या जातीच्या पोरायला एम.पी.एस.सी क्लास, पोलीस भरती क्लास दिले, ज्याने महाज्योती मधून ओ बी.सी वरील सर्व सुविधा आणि tablet दिले त्याला आम्ही काहून मते द्यायचे? मी मत माझ्या पार्टीला आणि माझ्या जातीवाल्यालाच देईन, ज्याने खरा व सर्वांगीण विकास केला त्यो नेता आमच्या काय कामाचा, मह्यासाठी त मही जात आन मही पार्टी लई महत्वाची हाय भाऊ, म्हणून मी मत माझ्या पार्टीला आणि माझ्या जातीवाल्यालाच देईन.
आता पर्यंत मी ज्याला मते दिले आताही त्यालाच देणार- Maharashtra Election 2024
ज्या थोर लोकांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी १६ ते ३० वर्षे वयाची आपली पोटची लेकरे देशावरील बलिदानासाठी देणाऱ्या त्या शहिदांच्या परिवारांना अडगळीत एका कोपऱ्यात बसवून दिल्या जाते कोणतीही योजना त्यांच्या नावाने देखील निघत नाही. ज्यांनी कधी देशासाठी साधी मुंगी देखील मारली नाही त्या लोकांनी देशाला स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर सगळ्यात आधी सत्ता ताब्यात्त घेतली. मह्या बाप जाद्यांनी यांना मते दिली मीही त्यांनाच देणार, ज्यांनी आम्हाला खालून वर पर्यन्त फक्त भ्रष्टाचार कसा करायचा हे शिकवले, ज्यांनी आम्हाला वशिलेबाजी शिकवली आम्ही त्यांनाच मते देणार ना? ज्यांनी वर्षानुवर्षे आमच्या डोक्यावरचे पाण्याचे हंडे हटू दिले नाही,ज्यांनी आम्हाला लाईट मीटर डोळ्याने दिसू दिले नाही, ज्यांनी आम्हाला वर्षानुवर्षे गड्ड्याने भरलेली रस्ते दिली, ज्यांनी आमच्या माता बहिणीला कित्येक वर्षे धुपनात / धुरात चुलीवर स्वयंपाक करायला भाग पाडले, ज्यांनी स्वयंपाकाचा GAS फक्त वरच्या वर्गालाच लोकांसाठी असतो हे सिद्ध केले, ज्यांनी आम्हाला केवळ झोपड्या दिल्या, ज्यांनी आम्हाला कधीच मोठे स्वप्न पाहू दिले नाही, ज्यांनी वारंवार आमच्या जातीची आम्हाला आठवण करून दिली, ज्यांच्या काळात आमच्या महिलांना टोयलेट ला जायला संध्याकाळ होण्याची वाट पाहायला लावली, उघड्यावर शौच करण्यास पिढ्यान पिढ्या ज्यांनी मजबूर केले, ज्यांनी गरिबी हटविण्याच्या नावावर गरीबालाच महागाईच्या मुक्क्यांनी जबर मार देत राहिले, ज्यांच्या काळात सरकारी दवाखान्यात औषधे मिळत नसल्याने व योग्य उपचार मिळत नसल्याने कित्येक लेकरे व वृद्ध मृत्युमुखी पडले, ज्यांनी अवैध पैसा उभा करण्यासाठी दिवसरात्री आपल्या चेल्यांच्या आणि चमच्यांच्या माध्यमातून देशातील काना कोपऱ्यात दारूची अवैध दुकाने,जुगार अड्डे, मटका अड्डे, चरस, गांजा सारखे अवैध व्यवसाय सुरु केलीत, ज्यांनी बहुजन समाजातील प्रत्येक तरुणाला व्यसनी बनविले, ज्यांनी तंबाखू, सिगरेट, बिडी, गुटखा याला आमच्या जीवनाचा अविभाज्य अंग बनविला, स्वत:चे अवैध मालमत्ता वाढविण्यासाठी ज्यांनी लाखी करोडो घरे बरबाद केलीत, लाखो तरुणांचा या व्यसंनानी बळी घेतला, लाखो महिला विधवा केल्या, लेकरे अनाथ केली, समाज बरबाद झाला, अशारीतीने समाजाला महापुरुषांनी दिलेल्या विचारांपासून हेतुपुरस्पर दूर केले गेले, अशा लोकांना आम्ही मते देणे का सोडावीत, जे एकदा निवडून आल्यावर पुन्हा ५ वर्षे तोंड दाखवत नाहीत, आणि सर्वसामान्य लोकांची कामे पडले कि निवडून आलेल्या नेत्यांचे चमचे सर्वसामान्य लोकांना टोलवून दूर पळवून लावतात अशा महान लोकांना आम्ही मते देणे का थांबवणार. पिढ्या न पिढ्या आमच्यावर सत्ता गाजवायची ज्यांची मक्तेदारी आहे अशा घराण्यांना आम्ही मते देणे का सोडावे, म्हणून आम्ही मते त्यांनाच देणार. कोणी चहावाला, कोणी रिक्षाचालवणारा, सर्व सामान्य कार्यकर्ता, साधारण संन्यासी सारख्या लोकांना आम्ही मते का द्यावीत. आम्ही मते त्यांनाच देणार ज्यांनी अखंड आयुष्य फक्त घराणेशाही केली. सत्ता ज्यांची पिढीजात मक्तेदारी आहे त्यांना मी मत देणार. ज्या राजकीय पार्ट्यानी सर्व सामान्य कार्यकर्त्यांना मोठे केले, ज्या पार्ट्यानी कोणत्याही उमेदवाराची कोणतीही जात न पाहता, प्रवर्ग न पाहता, घराणेशाही न पाहता, पूर्वीची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी न पाहता त्याच्यातील नेतृत्वगुण हेरून त्याला मोठे केले, मुख्यमंत्री केले तर कोणाला पंतप्रधान केले. तर अशा पार्ट्यांना आपण समर्थन का द्यावे ? कारण असे करून ते खरी लोकशाही आणि बाबासाहेबांना अपेक्षित विचार अमलात आणत असतात परंतु आम्हाला घराणेशाहीची सवय झालेल्या लोकांना अशा पार्ट्यांचे वावडे आहे मग आम्ही जातीवादी व घराणेशाहीला पोसणाऱ्या पर्त्यांनाच मतदान करणार.
मग मला काय फरक पडतो- Maharashtra Election 2024
कोरोना काळात त्याची आई मेल्यावर, आपल्या आईची अंतिमक्रिया करायला चाललेल्या संन्याशी लोकांना त्यांच्या अंगात केवळ भगवे कपडे आहेत म्हणून गाडीतून बाहेर काढून जिवंत मारले जाते तर त्याच्याशी मला काय करणे आहे ? मह्या जातीचा थोडाच होता ? जी गोष्ट त्यांचे धर्म गुरु त्यांच्या इतर धार्मिक पुस्तकातून त्यांना शिकवितात तीच गोष्ट एक अन्य धर्मीय महिला टीव्हीवर सांगते तेव्हा तिचे शीर धडावेगळे केले जाण्याच्या घोषणा होतात तर मला काय करणे आहे? याच गोष्टीचे स्टेटस ठेवणारा एक सर्व सामान्य टेलर कन्हैय्या कुमार त्याचे मुंडके, गळ्यावर सुरी लाऊन चराचरा कापले जाते आणि तो राक्तात्च्या थारोळ्यात पडलेला असताना देखील मोबाईल वर शुटींग करून सोशल मिडीयावर पाठविली जाते कारण तो केवळ एक हिंदू होता म्हणून तर मला काय करायचे त्याच्याशी? त्यो काय मह्या जातीचा होता का ? १९ जानेवारी १९९० रोजी काश्मीर मधून ५ लाख हिंदू एका रात्रीत मारून, हाणून तलवारीच्या आणि बंदुकीच्या जोरावर हाकलून दिल्या गेले, लाखो हिंदू लोक आपली संपत्ती विकुन आपले राहते घर सोडून पळून गेले तर मला त्याच्याशी काय करणे ? त्याचवेळी काश्मीरच्या गिरीजा टिक्कू सारख्या महिलांना नियोजन करून १० ते १५ नराधमांनी भर चौकात उघडे करून बलात्कार करून शेवटी लाकडे कापण्याच्या मशीनने तिच्या माय अंगाकडून दोन भागात कापून फेकून दिले तर मला काय देणे घेणे आहे? ती काय मह्या जातीची थोडीच होती ? शहर शहरातील अन्य धर्मियांच्या वस्त्या अचानक वाढायला लागल्या तर मला काय करायचे त्याच्यावरून ? ज्याने ४० दिवस छत्रपती संभाजी महाराजांचे हाल केले, त्यांचे डोळे फोडले, जीभ कापली, प्रत्येक दिवसाला एकेक करून हथापायाची बोटे ज्याने तोडली, ज्याने वीर संभाजींच्या शरीराची चामडी सोलून काढली, नंतर त्याच्यावर मीठ चोळले, एवढे करून थांबला नाही तर हाथ तोडले, पाय तोडले, शेवटी शीर धडावेगळे केले व शेवटी धडाचे बारीक बारीक तुकडे करून इंद्रायणी नदीत टाकले, ज्याने आपल्या स्वत: च्या बापाला हालहाल करून मारले, ज्याने स्वत:च्या भावाचे मुंडके उडवले, त्या औरंगजेबच्या कबरीवर जर कोणी संविधानाची शपथ घेणारा आमदार, खासदार जात असेल असेल तर मला काय फरक पडणार आहेत? आजही काहींनी त्यांच्या मनात औरंगजेब जिवंत ठेवला आहे तर मला त्याच्या काय पडणार आहे? मी मटन खातो म्हणून मटन विकणाऱ्याच्या जमिनी मोठ्या झाल्या, त्याची संपती वाढली तर मला काय फरक पडतो? काल मी जे काम करत होतो ते काम आता अन्य धर्मीय करू लागले तर मला काय फरक पडणार आहे ? मी दिवसातून एकदाही माझ्या मंदिरात, स्तूपात, जैन मंदिरात, चर्चला जात नाही पण ते दिवसातून ५ वेळा मस्जिदीत जातात तर मला काय फरक पडणार आहे? माझी भाषा त्याला येते माझ्याबद्दल त्याला सगळे माहित आहे पण त्याची भाषा मला येत नाही ? मला त्याच्या बद्दल काहीच माहित नाही आणि तो ते काही माहित होऊ देखील देत नाही, म्हणून काय झाले मला काय फरक पडणार आहे? मला माझाच धर्म माहित नाही ? तर त्यांचा धर्म वाचून मला काय फरक पडणार आहे? ते दिवसरात्र मला न समजणाऱ्या भाषेत काही तरी मोठ्याने ओरडून सांगत असतात तर मला काय फरक पडणार आहे? मोदीने घरे दिली तरीही ते मोदिलाच शिवी देतात तर मला काय फरक पडणार आहे ? मोदीने त्यांनादेखील रस्ते दिले , तरीही ते मोदींना शिवी देतात तर मला काय फरक पडणार आहे ? जो मोदी कोरोना काळापासून गोरगरिबांना फुकट रेशन वाटत आहे त्याचा लाभ घेऊन देखील जे मोदीलाच शिव्या घालतात तर मला काय फरक पडणार आहे? ज्या मोदीने कोरोना वेक्सीन वाटताना जातिवाद किंवा धर्मवाद केला नाही ज्या सरकारने कोरोना काळातप्राणवायू वाटताना, गरिबांना पैसे पाठवताना जात अथवा धर्म पहिला नाही त्या मोदीच्या वाटेला जर शिव्याच येत असतील तर मला काय फरक पडतो? ज्या मोदीने अल्पसंख्याक शिष्यवृत्ती सुरु केली, ज्या मोदीने त्यांच्या मुलींनी शिकावे म्हणून हजरत महाल शिष्यवृत्ती सुरु केली त्याच मोदिला ते शिव्या देतात वोट देणे तर दूरच राहिले ? तर मला काय फरक पडणार आहे? आजारी असताना मोठे ऑपरेशन करताना ५ लाख रु पर्यंतचा दवाखाना आयुष्मान भारत योजनेमध्ये मोफत तर घेतात उलट त्या मोदीला शिवी देतात तर मला काय फरक पडणार आहे? तीनवेळा तलाक, तलाक म्हणत महिलांना घराबाहेर काढून देणारे अत्याचारी कायदे बदलून ट्रिपल तलाक विरोधी कायदा मोदीने बनविला म्हणून जे दिवसरात्र त्याला शिव्या घालतात, तर मला फरक पडतो? सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास म्हणत प्रत्येक जाती धर्माच्या माणसाची प्रगती व्हावी म्हणून दिवसाच्या २० तास अविरत, न थांबत काम करणाऱ्या १४० कोटी लोकांच्या पंतप्रधानाला गेली १० वर्षे फक्त शिवी दिल्या जात असतील तर मला काय फरक पडणार आहे ? माह्या जातीचा थोडीच आहे का माह्या पार्टीचा थोडाच आहे? १९४७ साली ज्यांना आमच्या सोबत राहायचे नव्हते ज्यांना भारताचे संविधान नको होते त्यांनी वेगळा देश मागितला आमच्या पूर्वजांनी त्यांना हजारो एक्कर जमीन, नद्या संपत्ती देऊन वेगळा देश दिला. त्या देशाला त्यांनी इस्लामिक देश बनविला. तरी देखील देशाचे विभाजन करणाऱ्या लोकांना माझ्या पूर्वजांनी मते देऊन सत्तेत आणले. सत्तेत आल्यावर शेकडो वर्षे दारिद्र्य भोगणाऱ्या मोठ्या समाजासाठी काही योजना आखण्या ऐवजी वोट बँकेसाठी या लोकांनी वक्फ बोर्ड बनविले, ज्या वक्फ बोर्डाला कोणाचीही जमीन त्याला नोटीस न देता ताब्यात घेण्याचा अमर्याद अधिकार दिला तर मला काय करणे त्याच्यावरून ? ज्याची जमीन गेली त्याला कोर्टात सुद्धा जाण्याचा अधिकार नाही असा वक्फ बोर्ड कायदा असेनतर मग मला काय करायचे ? ज्याची जमीन वक्फ बोर्डाने घेतली ती वापस घेण्यासाठी जो मूळ मालक आहे तो कोर्टात तर जाऊ शकत नाही मग त्याला वक्फ बोर्डाच्या TRIBUNAL मध्ये जावे लागते तेथे सर्व त्यांचेच मौलवी असतात, या TRIBUNAL मध्ये एकही कलेक्टर नाही, मंत्री नाही, आमदार नाही, खासदार नसतो, तर असतात फक्त त्यांचे कट्टर मौलाना तर मला काय फरक पडणार आहे? तर मला काय करायचे आहे जमीन माझी थोडीच गेली आहे ? जेव्हा माझी जाईल तेव्हा पाहू ? आज भारतातील सगळ्यात जास्त जमीन भारतीय संरक्षण विभागाकडे आहे. संरक्षण विभागानंतर भारतातील सगळ्यात जास्त जमीन आज वक्फ बोर्डाकडे आहे? तर मग मला काय फरक पडणार आहे ? जागो जागी थडगे करून जमिनी ताब्यात घेतल्या जात आहेत तर मला काय फरक पडणार आहे ? संविधानाचे सर्व नियम जैन,बौद्ध, ख्रिश्चन, पारशी सर्वाना सारखे मग फक्त एका समाजासाठी दुसऱ्या देशात बनविले गेलेले १५०० वर्षांपूर्वीचे कायदे पाळण्याची मुभा देण्यासाठी MUSLIM PERSONAL LAW BOARD तर मग मला काय फरक पडणार आहे? या वैयक्तीक कायद्यामुळे जर त्यांना ४ बायका करता येतात तर मला काय फरक पडणार आहे? याच कायद्यामुळे अल्लाची देन म्हणत, हम दो हमारे १०-१५ लेकरे त्यांना आहेत तर मला काय फरक पडणार आहे? एखादा प्रसंग आला तर माझ्या जातीचा एकही माणूस धाऊन येत नाही आणि त्यांचे १००- २०० जन एका फोन वर एका ठिकाणी जमा होतात तर मला काय फरक पडणार आहे ? संपूर्ण जग ज्या विचारधारेमुळे परेशान आहे, पाश्चिमात्य देशात देखील कट्टरवाद्यांनी धिंगाणा माजवला आहे, कित्येक देशात् परिस्थिती गंभीर आहे? तर मग मला काय करायचे त्याच्यावरून ? एकटा इस्रायल देश ५-६ इस्लामी देशांच्या विरोधात एकटा लढत आहे तर मला काय फरक पडणार आहे?
मी मतदान नाही केले तर काय फरक पडणार आहे ?Maharashtra Election 2024
वरील सर्व गोष्टींचा मला काही विशेष फरक पडत नसल्याने, आमच्यातील काही जन मतदान करणार नाहीत, काही जन आपली सुट्टी मजेत घालवतील, काही जन राजकारण्यांना शिव्या देण्यात दिवस घालवतील, काही जन कोणी काही पैसे देते का याची वाट पाह्त बसतील, कोणी मतदान केंद्रावरची गर्दी पाहून पळून जातील, काहीजन म्हणतील यावेळी नाही पुढच्यावेळी मतदान करू, मग अशा रीतीने आपले काही टक्के लोक मतदान करणार नाहीत तर आणि जे मतदान करायला जातील ते आपल्या जातीच्या आणि आपल्या पार्टीच्या माणसालाच मत देतील. म्हणूनच अपक्ष, छोटी मोठी पार्टीचे नेते, जरांगेचे उमेदवार या सगळ्यामध्ये आमची मते वाटली जाणार, तुम्ही ८० टक्के आहोत, पण सगळे जन आपल्या आपल्या जातीला आपआपल्या पार्टीला मत देणार त्यामुळे तुम्ही जाती जातीत वाटले जाऊन कोणी १० टक्के, कोणी ५ टक्के, कोणी ३ टक्के, कोणी १५ टक्के असे विखुरलेले मतदान करणार आणि मग शेवटी त्यांची एकता कामी येईल आणि काहीही झाले तरीही ते विशिष्ट समाजाचे लोक जे एकता जपणारे लोक आहेत ते विकासाला, प्रगतीला मतदान करणार नाहीत तर वरून आलेल्या आदेशानुसार मस्जीदीतून मिळालेल्या संदेशानुसार सांगितल्या गेलेल्या नेत्याला त्यांचे सगळे म्हणजे एकूण लोकसंख्येच्या २५ ते ३० टक्के लोक एकगठ्ठा मतदान करतील. आणि शेवटी त्यांचा आवडता नेता सत्तेत येईल. आणि आशारीतीने केवळ विशिष्ट समाजाच्या मतांवर निवडून आलेले लोक वक्फ बोर्डाला कोट्यावधी रुपये देणे, वक्फ बोर्डाला समर्थन देणे, मौलाना लोकांना पगार चालू करणे या मुद्यांवर एकगठ्ठा मते मिळाल्यामुळे त्यांच्या प्रामाणिक कामाला लागतील. आणि तुमच्या मतांवर जे लोक निवडून आलेच नाहीत हे ज्या नेत्यांना अगोदरच माहीत आहे ते तुमच्यासाठी काम कशाला करतील.
जातीवादाने आणि आमच्यातील वैचारिक तफावतीने आम्हाला १००० वर्षे मुघल, इंग्रज आणि विदेशी शक्तीच्या गुलामीत घातले. जातीवादाने आम्हाला गेली ७० वर्षे प्रगतीपासून दूर ठेवले, “हिंदूंना जाती- जातीत वाटूनच हिंदुंवर राज्य केल्या जाऊ शकते” हा इतिहासात सिद्ध झालेला फार्मुला आहे. आता विषय असा आहे कि आपली ग्रेट संस्कृती आणि ग्रेट संविधान जगात टिकवायचे असेल तर सर्व जातीतील लोकांना एक मुठ “हिंदू” बनावे लागेल. आणि जे लोक या एकत्रित हिंदूंच्या अस्तित्वाची बाजू मांडतील ते लोग सत्तेत येणे आपल्या हिताचे असणार आहे. आमची जात तेव्हाच जिवंत राहील जेव्हा आमचा धर्म जिवंत राहील, आमचा धर्म तेव्हाच जिवंत राहील जेव्हा आमचे संविधान अस्तित्वात राहील, आमचे संविधान तेव्हाच अस्तिवात राहील जेव्हा जगातील सर्वात जास्त “सहिष्णु” असलेला समाज म्हणजे हिंदू सत्तेत राहील, हिंदू तेव्हाच सत्तेत राहील जेव्हा तो जाती विसरून “हिंदू” म्हणून एक राहील, जर लोकसंख्या नियंत्रण कायदा, त्याबद्दल कडक धोरण आणले जाणार नाही तो पर्यंत हिंदूंनो तुमचे भविष्य सुरक्षित होऊ शकणार नाही.
आम्हाला हे मान्यच करावे लागेल कि “संविधानाचे अस्तित्वच मुळात हिंदुंमुळे आहे, कारण गुलामीतून बाहेर आलेल्या हिंदूंना समजलेले आहे कि, “हिंदूंचे” अस्तित्वच बाबासाहेबांच्या संविधानामुळे शाबूत राहणार आहे. मुसलमानांना जर बाबासाहेबाचे संविधान एवढे प्रिय जर आहे तर जगातील ५६ इस्लामी देशात बाबासाहेबांचे आमचे प्रिय संविधान का लागू केले जात नाही ? असा प्रश्न बहुजन वाद्यांनी कधीतरी कट्टरवादी विचारधारेच्या मुस्लीम नेत्यांना केला आहे आहे का ? यावेळी जेव्हा ते संविधान आणि बाबासाहेबांच्या नावावर मते मागायला येतील तेव्हा एकवेळ हा प्रश्न आपण त्यांना जरूर विचारला पाहिजेत.
दलितांची मते हि सत्तेची चाबी ठरतात हे त्यांना माहित आहे म्हणून जय भीम जय मिम चे नारे लगावले जातात बाकी लोकशाहीशी त्याचे काहीही देणे घेणे नसते. कारण ज्यावेळी पाकिस्तान आणि बांग्ला देश वेगळे इस्लामी राष्ट्रे तयार झालीत तेव्हा सगळ्यात जास्त वाईट भोग दलितांच्या वाटी आले. करोडो लोकांना आपला धर्म बदलावा लागला. अगोदरच खितपत पडलेल्या या समाजाला त्या देशात ना आरक्षणाचा लाभ मिळाला ना एक माणूस म्हणून चांगले जीवन जगण्याचा लाभ मिळाला. आज कोणी दलित नेता त्या जय मिम वाल्यांना हे विचारत नाही कि पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेश सारख्या देशातील आमचे दलित कुठे गायब झाले ? त्यांची अवस्था काय आहे? मग जय मिमवाले म्हणतील तो आमचा देश नाही मग आम्हाला का विचारता ? मग त्यांना हे विचारा स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हैद्राबाद संस्थानात हिंदूंची संख्या जास्त असताना व येथे निजामशाहीची सत्ता असल्याने हे हैद्राबाद संस्थान त्यांना पाकिस्तानात विलीन करता येत नसल्याने, येथील हिंदूंची संख्या घटविण्यासाठी म्हणजेच केवळ हिंदूंची संख्या त्याची जात न पाहता कमी करण्यासाठी जी संघटना उभारली तिचे नाव “मजलिसे इत्तेहादुल मुसलमीन” आहे. ज्या संघटनेच्या लोकांनी लाखो हिंदू (सर्व आठरा पगड जातीचे धरून) मारून टाकले. जे रझाकार म्हणून भारतीय इतिहासात नमूद आहे त्याच नावाने ओवेसीने आज स्वतंत्र भारतात राजकीय पार्टी कशासाठी बनविली ? असे करण्यामागील त्यांचे इरादे काय ? औरंगजेबच्या कबरेवर जाण्याचे कारण काय ? बर ठीक आहे तो त्यांचा संवैधानिक अधिकार आहे तर मग त्यांना कधी शहीद अश्फाकुल्ला खान, जे भारतीय स्वातंत्र्य युद्धात शहीद झाले त्यांची कबर का सापडत नाही? त्यांना कधी देशासाठी युद्धात सीमेवर शहीद झालेल्या अब्दुल हमीद यांची कबर का सापडत नाही? त्यांना देशासाठी शहीद झालेले शहीद ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान यांची कबर का सापडत नाही ? स्वतंत्र सेनानी शहीद कॅप्टन अब्बास अली तसेच स्वतंत्र सेनानी आणि उद्योजक अब्दुल हबीब युसुफ मर्फानी ज्यांनी आझाद हिंद सेनेसाठी एक आझाद हिंद बँक स्थापनेसाठी सर्वात मोठी मदत केली होती यांची कबर या लोकांना का बरे सापडत नसेल ? ज्यांनी देशासाठी आपले सर्वस्व अर्पिले, ते रॉकेटमन, ग्रेट वैज्ञानिक, आपल्या देशाचा गौरव आणि देशाचे पूर्व राष्ट्रापती डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांची कबर का सापडत नाही ? हे प्रश्न त्यांना कोणीच विचारत नाही? असे करताना त्यांना कोणी देशद्रोही किंवा जातीवादी कधीच म्हणत नाही, असे का ?
जगातील कोणत्या एका देशात धर्माच्या नावावर एखाद्या शिक्षकाचे शीर धडावेगळे केले जाते, भारतात कन्हैय्या कुमार चे मुंडके मुस्लीम समाज कंटकाकडून धर्माच्या नावावर कापले जाते तरीही कोणी मुस्लीम आंदोलन करत नाही, परन्तु इस्रायल सारख्या देशात आतंकवादी हमला केल्या नंतर प्रतीउत्तरासाठी लढणाऱ्या इस्रायल विरोधात भारतात आंदोलन का बरे करत असतील ? चला आपल्याला त्याच्याशी काय करणे आहे ? नाही का ? म्हणून मतदान तर मी त्यांनाच करणार !
Maharashtra Election 2024 मुस्लीम धर्मीय संघटनेचे कॉंग्रेसला समर्थन.
आमचे इतर ब्लॉगपोस्ट :