Gautam Buddh- गौतम बुद्ध

Gautam Buddh

Vishal Patole
Gautam Buddh

पृथ्वीवरील एकूण ५० कोटी बौद्धांचे व एकंदरीत मानव जातीसाठी एकमेव प्रेरणा स्थान म्हणजे “भगवान गौतम बुद्ध” (Gautam Buddh) मानवीय जीवनाला खरा मार्ग दाखवणारा महामानव जो मानवजातीत सदैव सर्वश्रेष्ठच राहील. कारण त्यांनी सांगितलेले तत्वज्ञान आणि विचार मानवीय सभ्यता जगात असे पर्यंत मानवाला मार्गदर्शन करतच राहील. सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी आर्यवर्तांत शाक्य राजकुळात गौतम नावाचा राजपुत्र जन्मला. ज्याने पुढे बौद्ध धर्माची स्थापना केली. सुमारे १००० ते १२०० वर्षे बुद्ध धर्माचे भारतात वर्चस्व राहिले.

विद्वानांच्या व निपक्षपाती पाश्चात्य पंडितांच्या मते ख्रिस्ताशिवाय अन्य दुसरा कोणी गौतम बुद्ध या महात्म्यासमान उंची गाठू शकेल असा मानव या पृथ्वी तलावर जन्मला नाही.

मार्ग आकाशात नाही. मार्ग हृदयात आहे !

भगवान गौतम बुद्ध

आज रोजी भगवान गौतमबुद्धांच्या तत्व व सिद्धांतांचा अवलंब करून पृथ्वीतलावर एकूण ५० कोटी लोक बौद्ध विचारांचे पालन करतात आणि अन्य इतरही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे त्यांच्या विचारांचे पालन करतात. जेव्हा कि जगातील एकूण लोकसंख्येपैकी ३२ कोटी ख्रिस्ती, २० कोटी हिंदू, १५ कोटी मुस्लीम या प्रकारचे धार्मिक सिद्धांत आपल्या जीवनात अंगिकारतात.

भगवान गौतम बुद्धांनी त्याकाळी उपाध्याय वर्गाचा हल्ला कमजोर केला. एका पुरुषाने अनेक स्त्रियांशी लग्न त्यांनी अनैतिक ठरवले, दास्याची पद्धती सदोष आहे असे त्यांनी सर्व प्रथम प्रतिपादन केले, स्त्री हि पुरुषाची फक्त मालमत्ता नाही असे विचार मांडणारे ते प्रथम महामानव होत, पशु हिंसा निषिद्ध आहे हा करुणामय विचार जगाला देणारे ते एकमेव महापुरुष आणि म्हणूनच भगवान मानल्या गेले. गौतम बुद्धांनी हव्यासापोटी होणारे युद्धकर्म सर्वथा निषिद्ध मानली. जगात सर्व प्रथम धर्मकार्य संघाच्या माध्यमातून कसे करावे, देशोदेशी स्वधर्म प्रचार कसा करावा, देशोदेशी फिरून धर्म प्रचार करणाऱ्यांचे संघ आणि या धर्म प्रचार करणाऱ्या संघास धर्म उपदेश करणारा उपदेशक अशी संपूर्ण धार्मिक व्यवस्था पृथ्वीतलावर सर्वप्रथम निर्माण केली आणि असे करणारे ते जगातील पहिले महामानव म्हणजे साक्षात भगवान गौतम बुद्ध.

गौतम बुद्धांच्या अनुयायांनी इस ५ व्या शतकात अमेरिकेत जाऊन पशुयज्ञ बंद करवले अशा इतिहासात नोंदी आढळतात, भारतातील कोरलेल्या लेण्या, हजारो स्तंभ, देशो देशी केला गेलेला बौद्ध धर्म प्रचार इत्यादी सर्व काही करून जगात आपले विचार आणि तत्वज्ञान पोहचवणारा व त्याकरिता कोणतीही हिंसा न करता, उलटपक्षी प्रेम आणि करुणेच्या आधारे जग जिंकणारा एकमेव महापुरुष म्हणजे भगवान गौतम बुद्ध.अशा महापुरुषाचा जन्म आपल्या देशात झाला, व हजारो वर्षांचा इतिहास सांगणाऱ्या सनातनी हिंदू धर्माच्या विचारातून नवीन विचारांचा जन्म होऊन एक विचार जगमान्य झाला याचा आम्हा भारतीय जनास सदैव अभिमान असला पाहिजे.

Gautam Buddh-गौतम बुद्धपूर्व धार्मिक परिस्थिती

प्राचीन भारतीय संस्कृतीतील अतिप्राचीन ग्रंथ ऋग्वेदातील प्राचीन देवांची उपासना ऋषी ज्या प्रेमाने आणि उत्कंठेने करत होते कालांतराने तशी होणे बंद झाली. इंद्र, इशा, वरून इत्यादी देवी देवतांच्या नामोच्चाराने प्राचीन आर्यांच्या उरात जी भक्ती व कल्पना उत्पात होत असत तशा आता कोणाच्याही मनात येणे बंद झाले. या देवता यावेळेस केवळ नामशेष झाल्या. सोम, दुग्ध, मांस, इत्यादी पदार्थांचे अर्पण प्राचीन ऋषी जसे आपल्या आराध्य देवतास मोठ्या भक्तीने करत असत तसे आता काहीच होईनासे झाले. हि साधी अर्पणाची रिती जाऊन तिच्या जागी मोठ्या बिकट आणि नियमांचे अवडंबर माजवून निरर्थक अश्या यज्ञाच्या पद्धती सुरु झाल्या. सध्या सरळ भावाने केवळ प्रेमाने अर्पण करण्याखेरीस स्वदेवताअर्पण करणाऱ्या प्राचीन ऋषींच्या पुढील पिढीची एक जात / वर्ग तयार झाला. यज्ञआदी विधी करण्याचा आपलाच अधिकार आहे.हि या वर्गाची मक्तेदारी झाली. अन्य कोणा सर्व सामन्यास हे अधिकार नाहीत. देवतांचे आव्हान आणि आराधना करण्याचा अधिकार केवळ या वर्गाचाच होऊन बसला. या उपाध्याय वर्गाकडून आपले विधी करून घेतले असता आणि देवतांची आराधना त्यांच्या मुखातून केली असता आपणास पुण्या प्राप्त होईल तशी ती होणार नाही अशी समजूत या वर्गाने इतर सर्वांची करून दिली.

धर्म भावना व प्रेमळ गुण नष्ट होऊन त्यांच्या जागी बिकट नियम व यज्ञादी पद्धती सुरु झाल्या. पुढे या व्यवस्थेला कित्येक विचारवंतांकडून प्रतिकार सुरु झाला. आजच्या काही इतिहासकरांच्या मते इस ११ व्या शतकापासून या प्रतिकारास सुरुवात झाली, पृथ्वितलावर बुद्ध अवतरण्यापूर्वी ५ शतके हा प्रतिकार येन केन प्रकारे सुरु होता असे ऐतिहासिक ग्रंथांमधून लक्षात येते. त्यानंतर आलेला ब्राम्हण काळ.

दरम्यानच्या काळात कित्येक विचारवंत जीवात्मा व परमात्मा याविषयी विचार करू लागले, त्यावर गहरे चिंतन व मनन करू लागले. त्यांचे तत्व विचार उपनिषद ग्रंथात नमूद केलेले आपणास दिसून येते. या सर्व विचारांचे सार असे होते कि चराचर विश्व एका ब्रह्मापासून निर्माण झाले असून ते त्यांचे केवळ अंश रूप होय. त्याचप्रमाणे मृत्यू, पुनर्जन्म इत्यादी गूढ गोष्ठींचे त्यात विवेचन आहे. येणाऱ्या पिढ्यामध्ये ज्या तत्वज्ञान पद्धती निर्माण झाल्या त्याचे मूळ या उपनिषदांमध्ये आढळून येते. अशाप्रकारे त्याकाळच्या महान विचारवंताच्या मनात स्वतंत्र विचार जागृत होऊन मोठमोठे तत्वज्ञान, तत्व विचार निर्माण झाले होते. हे खरे आहे तरी त्याकाळी उपलब्ध असलेले कर्मकांड विसरणारे खूप कमी प्रमाणात होते. याउलट त्याकाळचे सामान्य जन यज्ञ आदी कर्मकांडातच आपला वेळ घालवत असत. हे कर्मकांड प्राचीन ग्रंथ व वेद आधारित आहे असा त्यांचा दृढ विश्वास होऊन बसला होता. आणि उपाध्याय वर्गला हेच हवे होते. लोकांचा हा विश्वास कमी होऊ नये म्हणून ते अनेक उपाय करत असे. कर्मकांड प्रशंसेवर विविध ग्रंध लिहून ते सामान्य जनात प्रसिद्ध करत. आणि सर्व सामन्यांची आपल्याकडे वृत्ती राहण्यास्ठी वेगवेगळ्या योजना करत असे.

इस पूर्व६ व्या शतकात हि परिस्थिती होती. उच्च नीच वर्ग तयार झाले होते, एक वर्ग लोभी, गर्विष्ठ, अहंकारी, अज्ञानी झाली तर आर्यांचा आश्रय धरून राहणाऱ्या इतरांना शुद्र म्हणण्याचा प्रगाढ पडला होता. त्यांना आर्य धर्म ग्रंथ वाचन व धार्मिक कार्य करण्यास बंदी असे. तसेच आर्यांचे कोणतेही धर्म विधी करण्यास त्यांना बंदी असे. त्यांना समाजात कोणताही मान नसे. त्यंना हीन लेखून उच्च वर्गातील लोक त्याचं तिरस्कार करू लागला.

यज्ञादी करणाऱ्या वर्गाला विशेषाधिकार प्राप्त झाले तर इतर वर्गाला अत्यंत हीन वागणूक, त्यामुळे हि स्थिती पालटावी अशी मनोमन इच्छा या वर्गात सतत निर्माण होत असे. पुढे या शुद्र वर्गातील लोकांची संख्या वाढून ते निरनिराळे धन प्राप्तीचे व्यवसाय व उद्योग धंदे करू लागले. त्यामुळे त्यांच्या ताब्यात मोठमोठ्या जमिनी व गावे येऊ लागली. ते मोठे वजनदार गृहस्त झाले. असा त्यांच्या स्थितीत चांगला पालट झाला अस्तानाही तेव्हाचा धर्म आणि व्यवहार त्यांच्याविषयी अन्यायाचे नियम मात्र कायम होते. परंतु ज्याच्या मनात सत्य व न्याय या विषयीची प्रीती वसत असते ज्याच्या बुद्धीला सद्विचाराचा आदर असतो, ज्याचे हृदय पर दुख: पाहून दुख होते, ज्याच्या मनाला परोपकरताच समाधान प्राप्ती वाटत असते त्याला या परिस्थितीविषयी वाईट वाटल्या वाचून राहत नाही.

त्याकाळी उपलब्ध असलेली सर्व आर्य ग्रंथे व तत्वज्ञान गौतम बुद्धांनी वाचलेले होते. तरीही आपण जे काही शिकलो ते कितपत हितावह आणि सत्य आहे याचा विचार त्यांच्या मनात उत्पन्न झाला. विचार करता करता त्यांना असे दिसून आले कि, मानवामध्ये जे हे जातीविषयी निर्बंध रूढ आहेत ते सर्वथा आयोग्य होत. आणि त्यांच्या दयामय अंतकरणात अशी उत्कट इच्छा उत्पन्न झाली कि हीन, दिन व त्रस्त जणांची स्थिती सुधारण्यासाठी काहीतरी उपाय योजला पाहिजे. वरती सांगितल्याप्रमाणे यज्ञ आदीच्या खटपटीत सर्वदा बरबाद होण्यात काहीच अर्थ नाही असे ज्यांना वाटत असे त्यांच्या मनात कर्मकांडाविषयी आणि एकंदर संसाराविषयी उपरती होऊन त्यांच्या मनाची प्रवृत्ती याहून काहीतरी उच्चतर धर्म मार्ग आहे किंवा कसे याचा विचार करण्याकडे होत असे. असे जन वानप्रस्थ होऊन अरण्यात जाऊन पर्णकुटिका बांधून एकांतात राहत असत. अशा रीतीने संसाराचा व्याप सोडून मोकळे झालेले म्हणजे त्यांचे चित्त आध्यात्मिक विचारांकडे निर्वेधपने लागत असे ते शृष्टीचे अवलोकन करून स्वत:च्या मनाशी तिचा पुन्हा पुन्हा विचार करून आत्मा, परमात्मा परलो आदी करून धर्मतत्वाबाबत अनुमान करत असे. यापैकी बहुतांश ऋषी पुरातन वेदांच्या आधारेच आपले विचार रचत असे. परंतु सर्वांचे साधारण धोरण असे असायचे कि, यज्ञे आदी कर्मे करून स्वकार्य सिद्धीसाठी पशु हत्या करणे हे योग्य नाही. असे प्रतिपादन करून जनचित्तामध्ये उच्चतर धर्म कल्पनांचा प्रवेश होईल असे करावे फारतर काय पण यज्ञ आदी प्रसंगी इतर ब्राह्मणांप्रमाणे निमंत्रण गेल्यावर ते त्या समयी तेथे अवश्य येत आणि पूर्वापार चालत आलेल्या यज्ञादी कर्मकांडाऐवजी आध्यात्मिक विषय काढून त्यावर आप आपले विचार मांडत व भवती न भवती करत. अशा प्रकारे तत्वविचारांकडे विचारी जणांचे लक्ष वेधत असे. त्यामुळे त्यापुढील काही विचारवंत ऋषींनी यज्ञकर्म कांडात पशु हत्या करण्याऐवजी आपल्या आतील असत्य वृत्ती, व वासनावृत्ती ज्या आपणास पाप करण्यास प्रवृत्त करतात त्यांची हत्या केली पाहिजे असे विचार रूढ केले याप्रमाणे यज्ञकर्मास आध्यात्मिक स्वरूप प्राप्त झाले बाह्यकर्मापेक्षा आत्मोन्नती विशेष हितकार असून ती आतून सुखाची प्राप्ती करून देणारी आहे. असा उपदेश कित्येक धर्म गुरूंकडून होऊ लागला. या उपनिषद कालीन तत्वांच्या आधारे आध्यात्म पसरवणारे जे जन निर्माण झाले त्याचं साधारण धोरण सर्व चराचर विश्व एका ब्रम्हा पासून उद्भवले असून ते पुन्हा त्यातच लीन होणार आहे नामरूपी भेद जो आज दुर्ग्प्चार केवळ मायेचा खेळ आहे. हि सारी भ्रांती आहे. हा सर्व पसारा केवळ चंचल व अशाश्वत आहे. वास्तव अचल आणि शाश्वत असे एक ब्रम्हच आहे याशिवाय अन्य काहीच नाही. नामरूपी भेद उत्पन्न होऊन आत्म्यास उपाधीत्रायाच्या योगाने शोक, जन्म आणी मृत्यू प्राप्त झाले आहे. यातून मुक्ती हवी असल्याने ऐहिक किंवा पारलौकिक सुख विषयांच्या प्राप्तीची लालसा धरू नये. त्याविषयीच्या कामनांचा समूळ उच्छेद करावा. म्हणजे मोक्ष सिद्धी सुगम होऊन प्रत्येक आत्मा जड कालेवारामुळे प्राप्त झालेल्या बंधनांचा छेद करून परमात्म्याच्या ठायी लीन होतो. याप्रमाणे परमात्म्यात लीन होई पर्यंत जीवात्म्यास जन्म मृत्यू संस्कृती भोगावी लागते, नामरूप धारण करणाऱ्या प्रत्येक जीवाला त्याच्या कर्माप्रमाणे उच्च नीच स्थिती प्राप्त होते.
संस्मृतीचे पाश तोडण्याचे दोन मार्ग

  1. मनुष्याने कामनांचा जय करावा आणि प्रारब्ध प्राप्त देह कर्मे फळआशा न धरता जीवनमान आहे तो पर्यंत केवळ अलिप्तपणे करत राहावी म्हणजे त्यास कर्म संग न घडून तन्मुलक सुख दुखापासून तो मुक्त होऊ शकतो.
  2. आत्मविषयक अज्ञानामुळे मनास भ्रांती होऊन अशाश्वत काय, शाश्वत काय याचा विवेक होत नसतो तो सद्य ज्ञानाच्या योगाने झाला म्हणजे अज्ञान तिमिर नाश होऊन परब्रम्ह प्राप्त होते यास्त मानवाने दुख: आणि क्लेश यांनी युक्त अश्या या ऐहिक जीवनाची मुळीच पर्वा करू नये. तर शाश्वत व सतत परमानंद प्राप्तीचे आस्पद जे परब्रम्ह आहे त्याच्या प्राप्तीच्या मार्गाचा अवलंब प्रत्येकाने करावा. क्षणभंगुर संसाराविषयी प्रीती मनात क्षणभरसुद्धा येऊ देऊ नये. तर त्याचा होईल तितक्या लवकर त्याग करून परमात्मा प्राप्तीविषयी प्रयत्नशील असावे.

हा असा धर्म विचार आणि तत्वविचार उपनिषद कालीन भारतखंडात कित्येक भागांमध्ये प्रचलित झाला या विचाराप्रमाणे आपला वर्तनक्रम ठेवणारे कित्येक महात्मे वेळोवेळी निर्माण होऊन ते इतर जनास आपल्यासारखे करण्याविषयी सतत परिश्रम करी हा त्यांचा क्रम बुद्धांच्या काळापर्यंत अविरत चालला होता. हा तत्व विचार केवळ वेदांत आधार घेऊन प्रचलित केला गेला होता. म्हणून त्यास कोणी वेदांत असेही म्हणतात. परंतु बुद्धाच्या वेळी यास ब्रम्हविद्या म्हणत असून ती प्रतिपादन करणाऱ्यास ब्राम्हण असे संबोधले जात असे. म्हंणून ब्रम्ह जाणती ब्राम्हण. अशी ब्राम्हण शब्दाची उत्पती पुरातन काळापासून सर्वसंमत आहे व त्याकाळच्या अशाच ब्रम्हनिष्ठ ब्राम्हणास देवासारखा मान होता. आता या स्वतंत्र विचाराच्या युगामध्ये वेदाचा आधार न घेता केवळ आपल्या बुद्धीच्या सहायाने जो काही होईल तो तत्व विचार करणारे कित्येक महात्मे निर्माण झाले असे दिसून येते. उपनिषद काळास आरंभ होऊन बुद्धाच्या आगमनापर्यंत असे स्वतंत्र विचार करणारे लोक पुष्कळ निर्माण झाले होते त्यांनी आप आपली बुद्धीच्या आणि विचारशक्तीच्या जोरावर निरनिराळे विचार स्वशिष्याद्व्रे त्याकाळच्या लोकात प्रचलित केले होते. उपनिषद काळानंतर जे मोठमोठे विचार करणारे विचारीजन झाले ते बहुतेक असे म्हणत कि आपल्या विचारस उपनिषदांचा आधार आहे आणि हे त्याचे म्हणणे खोटे नसे. कारण उपनिषद कालीन सर्व प्रकारचे धर्म विचार आणि तत्व विचार बीज रूपाने किंवा विस्तारत: होऊन चुकले होते. तेव्हा प्रत्येकाने आपल्या मताला उपनिषद ग्रंथाचा आधार आहे असे प्रतिपादन करून जन माणसात आपले विचार सर्वसंमत केले. आजच्या प्रकारे तत्कालीन उपनिषदांची उपलब्धता नसल्याने विविध धर्माधारित विचार व विरोधी विचार सर्वमान्य होत असे. या पद्धतीने जे वाटतील ते विचार जनात प्रसिद्ध करण्याची मोकळीक असल्याने आर्यावर्तात त्याकाळी अनेक धर्मग्रंथ व विचारपद्धती निर्माण झाल्या. बौद्ध धर्म हा अश्या पैकीच एक होय.

बुद्धाचे म्हणणे असे कि चालू असलेले यज्ञ आदिकाचे सुष्क कर्म कांड केवळ निरर्थक आणी अप्रयोजक असून पुरातन व खरा कैवल्यप्रद जो धर्ममार्ग आहे त्याकडे सामान्य जणांची प्रवृत्ती होणे हे इष्ट आहे. आणि सांप्रद जी बुद्ध धर्माची जी मते उपलब्ध आहेत त्यातील बहुतेकात उपिषदांचा आधार आहे. यावरून पाहता बुद्ध मत हे काहीतरी नवीनच वैचारिक मंथन असून आमच्या पुरातन धार्मिक विचारांपैकी आणि तत्व विचारांपैकी काही विचारांचे मंथन करणारे होते असे म्हणावे लागते.

Gautam Buddh-गौतम बुद्धाचा जन्म


इसवी सन पूर्व ५५७ व्या वर्षी कपिलवस्तू नामक एका प्राचीन नगरामध्ये गौतम बुद्धाचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शुध्धोधन असे होते व आईचे नाव मायादेवी असे होते.शुध्धोधन त्याकाळचे शाक्य नामक क्षत्रिय वंशाचे प्रमुख होते. कपिलवस्तू हे त्यांच्या राजधानीचे नाव होते. हा शाक्य वंश कोसल नामक एका मोठ्या प्राचीन क्षत्रिय वंशाची उपशाखा आहे. शुध्धोधन आदी राजे आपणास इक्वाषु राजाचे वंशज म्हणत असे. शाक्यांच्या ताब्यात असलेली जमीन बरीच सपाट व ताप्ती नदी आणि हिमालयातून उगम पावणारी रोहिणी नदी च्या मध्ये वसलेला असल्याने नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाने अतिशय सुपीक असलेली जमीन शाक्यांना प्राप्त होती.या प्रांतात भाताचे उत्पन्न उत्तम पद्धतीने होत असे. शाक्य वंशातील मोठमोठे सरदार आप आपली जमीन स्वत: नांगरत आणि कसत असे. खुद्द शुध्धोधन राजा आपल्या शेतात स्वत: काम करून भाताची शेती घेत असे. त्यांच्या प्रांतात अम्ब्याची व चिंचेची पुष्कळ झाडे होती. एका बाजूकडे पांढराशुभ्र हिमालय पर्वत तर दुसरीकडे या प्रांतात जिकडे तिकडे झुळझुळ वाहणारे झरे पुष्कळ आहेत त्यामुळे हा प्रांत अतिशय रमणीय असा आहे. त्यांच्या राज्याच्या आसपास कोसल व मगध असे दोन मोठमोठे राज्ये असतांनाही शुध्धोधन राजे कोणाचेही मांडलिक राजे नव्हते. त्यांचे राज्य छोटेसे होते परंतु कोणाच्या आधीन नव्हते. शाक्य वंशातील राजे अतिशय बाणेदार व स्वाभिमानी होते, त्यांचे स्वातंत्र्य प्रेम अतोनात होते. अनेक लुटारू टोळ्यांचे आक्रमण त्यांच्यावर सतत होत असे त्यातही स्वत:चे स्वतंत्र अबाधित ठेवण्यासाठी लागणारे सामर्थ्य, शौर्य व ऐक्य शाक्य राजांकडे होते. रोहिणी नदीच्या पलीकडे कोलियन नावाच्या राजाचे राज्य होते. ते देखील कोसल वंशाचेच होते. रोहिणी नदीच्या पाण्यावरून त्यांच्यात वाद होत असे परंतु नंतर सामोपदेशाने त्यातून मार्ग काढला गेला. याच कोलियन राजाने आपल्या दोन मुलींचा विवाह शुध्धोधन राजा सोबत करून दिला होता. त्यापिकी एकीचे नाव मायादेवी असे होते. या दोघींच्याही पोटी संतान नसल्याने शुध्धोधन राजे फार कष्टी होते मृत्यू आल्यास आपल्या मागे श्राद्धादी करण्यास व आपल्या कुळाचे नाव पुढे चालविण्यास कोणी नसल्यास आपणास व आपल्या पूर्वजनास नरकवास घडतो अशी समजूत आजच्या प्रमाणेच त्याकाळी देखील लोकांची होती तशीच ती शुध्धोधन राज्यांची देखील होती. शेवटी मायादेवी आपली वयाच्या ४५ व्या वर्षी गर्भवती झाली तेव्हा शुध्धोधन राजांना अतिशय आनंद झाला. पहिली प्रसूती माहेराकडे करण्याची प्रथा त्याकाळी सुद्धा असल्याने मायादेवी आपल्या माहेरी जाण्यासठी मोठ्या परिवारासह निघाली परंतु ती वाटेत लुम्बिनी नामक एका अति रमणीय ठिकाणी शाल वृक्षाखाली प्रसूत झाली. त्यांना मुलगा झाला. शुध्धोधन राजास अतिशय आनंद झाला. नगरात आनंदोत्सव झाला. नामकरण होऊन बाळाचे नाव सिद्धार्थ असे ठेवले. असे म्हणतात गौतम बुद्धांची आई त्यांच्या जन्मानंतर ७ दिवसांनी मरण पावली. आपल्याला पुत्ररत्न प्राप्त व्हावे व त्याने वंश पुढे न्यावा तो संस्कारी व कर्तुत्ववान निपजावा म्हणून त्या माउलीने कित्येक उपवास व व्रते धारण केल्यामुळे त्यांचे शरीर क्षीण झालेले होते आणि त्यातच त्यांचा अंत झाला असे म्हणतात. त्यांच्या मृत्यू नंतर सिद्धार्थांच्या माउशीने म्हणजेच मायादेवी यांची बहिण महाप्रजापती हिने गौतामाचे संगोपन स्वपुत्राप्रमाणे केले.त्याला त्याकाळी उप्लाब्ध असलेल्या विद्या शिकविण्याकरिता गुरु ठेवला होता. अतिशय तीक्ष्ण बुद्धीच्या Gautam Buddh-सिद्धार्थने अतिशय कमी वयात त्याकाळी उपलब्ध असलेल्या सर्व विद्या प्राप्त केल्या होत्या. असे म्हणतात तो आपल्या बालपणीच्या सवंगड्यात मिसळून कधीही खेळत नसे. त्याला बालिश खेळ आवडत नसे. परंतु आसपासच्या निसर्ग व व्यवस्थेचे बारीक निरीक्षण व चिंतन मनन तो करत असे. एके दिवशी तो आपल्या मित्रासोबत आसपासच्या शेतात गेला. तिथे त्याने ज्या गोष्टी अतिशय सूक्ष्म नजरेने पहिल्या त्या त्याचे चित्त विचलित करणाऱ्या ठरल्या. तिथे त्याने कष्ट करणारा शेतकरी पहिला आणि त्याची आपल्या स्थितीशी तुलना करून पाहिल्यावर त्याच्या लक्षात आले कि सर्व सामान्य कष्टकरी माणसांनी उष्ण, शीत, वातावरणात उन्हात राबावे आणि त्यंनी दिलेल्या कराच्या जीवावर सावकारांनी व सत्ताधार्यांनी मौज करावी हे त्यांच्या मनाला पटेनासे झाले. जनावराने राब राब राबावे अंगावर वजन वाहावे, कोडे सहन करावे, अंगात त्राण नसतानाही कोड्याच्या भीतीने कष्ट करत राहावे, आणि मानेवर ओझे वाहून जखमाही कोणाला दिसू नये हे किती निंदनीय आहे. केवढा हा निर्दयीपणा. दुसरीकडे पशु पक्षी त्यांना दिसले जे स्वच्छंद विहार करत होते मात्र सिद्धार्थ त्यावर देखील मनातल्या मनात खोल विचार करत होता कि वर वर आनंदी वाटणारे हे पक्षी आनंदी नाहीत यांच्याही जीवनात कितीतरी मोठा संघर्ष आहे, वातावरणाशी, निसर्गाशी त्याची लढाई, जिवंत राहण्यासाठी प्रत्येक जीव दुसऱ्या जीवाचा जीव घेतो. त्यांनी पहिले कि पाल किडे खातात, पालींना साप आपले भक्ष्य बनवतो, आणि गिधाड या सर्व प्रकारच्या जीवांना मारून खाऊन पोट आपले पोट भरतो. हि केवढी विपत्ती, अशी विपत्ती चोहोकडे त्यांच्या नजरेत पडायला लागली.तेव्हा कोण बिचारा पुरुष दुसऱ्यास असा त्रास देऊन मौजेत आणि आनंदात जीवन जगेल असा विचार त्यांनी आपल्या सोबत्यास बोलून दाखविला. पण त्या मित्राच्या काहीच लक्षात न आल्याने त्याच्याशी न बोलता तो जवळच्या अरण्याकडे वळला तो कित्येक तास या सर्व गोष्टींवर विचार करत हिंडत होता. शेवटी त्याचे वडील त्याच्या शोधात जंगलात आले तेव्हा तो त्यांना एका जंबू वृक्षाखाली शांत विचार करत बसलेला आढळला. कळवळून जाण्याचा गौतम बुद्धांच्या ठाई असलेला स्वभाव बालपणापासूनच त्यांच्या अंगी होता. दुसऱ्या एका प्रसंगात आकाशात उडत जाणाऱ्या हंसपक्ष्यास त्याचा चुलत भाऊ देवदत्त याने बाण मारला तेव्हा तो पक्षी खाली पडला तो पक्षी रक्ताने माखलेला असून धडपडत आहे असे त्यांना लक्षात आले तो तत्काळ उठला व त्या पक्ष्याकडे जाऊन त्या पश्याला उचलून त्याची अशी अवस्था कश्यामुळे झाली हे पाहू लागला तेव्हा त्याच्या लक्षात आले कि या पक्ष्याला बाण लागून त्याला मोठी जखम झाली आहे. त्यानानी मोठ्या ममतेने त्या पक्ष्याला एका हातात घेऊन दुसऱ्या हाताने पक्ष्याच्या अंगात शिरलेला त्याचा बाण काढला व त्याला एका झाडाच्या पानात लपेटून ठेवले. हे करत असताना त्याला अतीव दुख: होत होते परंतु तो अधिक विचार करू लागला कि याला लागलेल्या बाणामुळे माझ्या मनाला वेदना होत आहेत तर या पक्ष्याला बाण लागल्यामुळे किती वेदना होत असतील. मग तो त्या पक्ष्याला दुख:तून बाहेर काढण्यासाठी तो अत्यंत कासोसीचे प्रयत्न करू लागला. तेवढ्यात त्यांना आवाज आला कि आमच्या छोट्या राजांनी या पक्षाला बाण मारून खाली पाडले आहे तरी आपण याला आमच्या स्वाधीन करावे. त्यावर सिद्धार्थ म्हणाला – नाही, मी तो तुझ्या स्वाधीन करीत नाही, माझ्या बंधूच्या बाणाने हा पक्षी मेला असता तर तो त्याच्याकडे पाठवून देणे ठीक होते परंतु तो अद्यापही जिवंत आहे. त्याने त्याच्या बाणाने या पक्षाचा पंख जायबंदी केला आहे व त्याची गती मंद केली आहे. एरव्ही त्याच्या जीवास मुळीच धक्का लागलेला नाही या त्याच्या बोलण्यावर देवदत्ताने असे प्रतिउत्तर दिले कि वनपक्ष्यास जो तीर मारून खाली पाडतो त्याचा त्या पक्ष्यावर स्वामित्व होते. मग तो त्याच्या बाणाने मेलेला असो वा नसो. तेव्हा सिद्धार्थने त्या पक्ष्याची मान आपल्या कोमल गालावर ठेऊन म्हंटले – ‘नाही, असे मी कदापि करणार नाही’ हा पक्षी माझा आहे याच्यावर दया करून मी याला वाचवला आहे. याला मी पुन्हा मृत्युमुखी पाठवणार नाही. देवदत्तला जर वाटत असेल कि हा मी त्याच्यावर अन्याय करत आहे तर त्याचा निर्णय त्याने शहाण्या लोकांकडे जाऊन करावा. देवदत्तला हे म्हणणे पटले व तो दरबारातील शहाण्या लोकांकडे गेला तिथे त्याची वाटाघाटी झाली परंतु तिथे कोणताच पक्का निर्णय होईना. शेवटी एक पंडित उठून म्हणाला कि, जीव म्हणून काही आहे असे आपण मानीत असेल तर तो कोणी एखादा जीव वाचवितो त्याची त्या जीवावर जेवढी सत्ता असते तितकीच त्याचा नाश करणाऱ्या मनुष्याची त्याच्यावर नसावी कारण हिंसा करणारा जीवाची हानी करतो आणि रक्षण करणारा त्याचे परिपालन करतो. ह्यास्तव या पक्षाचा ज्याने जीव वाचवला त्यासच हा पक्षी मिळावा हा निर्णय सर्वात योग्य वाटला आणि देवदत्तला आपला हेका सोडवा लागला. याप्रमाणे बुद्धाच्या ठाई मननशीलता व कोमलता अल्पवयातच दिसून येऊ लागली.

गौतम बुद्ध – विवाह


शुध्धोधन राजाने सिद्धार्थला निरनिराळ्या ऋतूत राहण्यासाठी तीन मंदिरे बांधून दिली. त्यांची अंतर्बाह्य रचना इतकी सुंदर केली होती कि, त्यात राहिल्याने सिद्धर्थच्या चित्तास नेहमी करमणूक होऊन ऐहिक सुखविषयी गोडी लागावी त्याचप्रमाणे परदुख पाहून बुद्धी उद्वेग पावते व त्यास इहलोकातील सुखाचा वीट येतो. ते राजाच्या लक्षात येऊन. तो सिद्धार्थ च्या दृष्टीस दुख, कष्ट व विपत्ती मुळीच पडू नये म्हणून योग्य ती खबरदारी शुध्धोधन राजा घेत होता. आपल्या पुत्राचे औदासीन्य कमी होऊन त्याच्या अंगी संसार सुख लालसा निर्माण व्हावी म्हणून तो या प्रकारे निरनिराळ्या योजना व उपाय करत असे. तरीही त्याचे ते सर्व प्रयत्न विफल झाले. गौतम बुद्धाची उदासीन वृत्ती वाढत जाऊन संसाराविषयीचे त्याचे अप्रेम वाढतच गेले. आपल्या पुत्राचे संसाराबद्दल प्रेम निर्माण झाल्याशिवाय आपल्या संस्थानाचे भविष्य व्यवस्थित राखले जाणार नाही याची चिंता शुध्धोधन राजांना सतत होती. त्याकाळी संसार त्यागून जिकडे तिकडे फिरणाऱ्या लोकांचा समूह त्यांच्या दृष्टीस पडत असे. Gautam Buddh-सिद्धार्थ सन्यास वृत्ती धारण करून वनात निघून जाईल या भीतीमध्ये रात्रंदिवस कायम शुध्धोधन राहताना दिसत असे. हे पाहून राजाच्या मंत्री मंडळातील लोकांनी राजाला मार्गदर्शन केले कि, एखाद्या लावण्यवती मुलीशी Gautam Buddh-सिद्धार्थचा विवाह करून द्यावा जेणेकरून त्याच्या वृत्तीत बदल होऊन तो सांसारिक सुखाकडे आकर्षित होईल मग राजस चिंता राहणार नाही.सिद्धार्थला आवडेल अश्या पद्धतीने निरनिराळ्या सरदारांच्या मुली सिद्धार्थच्या नजरेस पडतील या पद्धतीची व्यवस्था राजाने केली. काहीही उत्सव आयोजित करून आपल्या मित्र सरदारांच्या रूपवान मुली दरबारात येतील अशी व्यवस्था केली गेली. त्य मुलींना कित्येक प्रकारचे खेळ खेळावयास सांगितल्यावर त्यांना बक्षीस देण्याचे ठरवले. ती बक्षिसे सिद्धार्थ राजपुत्राने आपल्या हथाने त्यांना द्यावी अशी व्यवस्था केली गेली. पिताच्या आज्ञेप्रमाणे सिद्धार्थ बक्षीस देण्यास बसला प्रत्येक मुलगी त्याच्याकडे येऊन आप आपले बक्षीस घेऊन जाऊ लागली या प्रमाणे बक्षिसे देण्याचा क्रम चालू असताना सिद्धार्थचे लक्ष कोणत्या मुलीकडे विशेष प्रकारे जाते यावर लक्ष देण्यासाठी राजाने कित्येक हुशार लोक लाऊन ठेवले होते व जवळ उभे करून ठेवले होते. त्यांनी राजास असे सांगितले कि, सुप्रबुद्धाच्या कन्येकडे सिद्धार्थने पहिले तेव्हा त्याच्यात चर्येत बदल झाला व तो तिला न्याहाळून पाहू लागला व इतर कोणत्याही मुलीकडे त्याचे लक्ष गेले नाही. आम्हालाही वाटते कि राजदरबारात जमलेल्या एकूण मुलींपैकी सुप्रबुद्धाची कन्या रूपवान आणि गुणी आहे त्यामुळे सिद्धार्थचा विवाह तिच्याशी करून द्यावा असा प्रस्ताव ठेवला. तेव्हा शुध्धोधन राजास अतिशय आनंद झाला व त्याने तत्काळ कोलीयन संस्थानचा राजा सुप्रबुद्धला मुलीची मागणी घातली. यास राजा सुप्रबुद्ध ने उलट संदेश पाठवला कि, आपल्या क्षत्रिय कुळाच्या परंपरेनुसार आपली मुलगी ज्यास द्यावयाची त्याच्या अंगी इतर क्षत्रिय मुलांपेक्षा अधिक बळ, क्षत्रिय कौशल्य आहे याची खात्री करून घ्यावी पण आपल्या पुत्राचा लौकिक आम्ही ऐकतो त्यावरून असे कळते कि, त्याच्या अंगी हे कसोटीस लावावयाचे गुण मुळीच वृद्धीपावलेले नाहीत.कारण तो सदोदित आपल्या महालात आपल्याशीच गुंतलेला असतो. त्याला मर्दुमकीचे खेळ व व्यायाम अजिबातच आवडत नाही. अशा स्थितीमध्ये माझ्या मुलीच्या स्वयंवरची योजना करून तिला वरु इच्छिणाऱ्या तरुण क्षत्रियास बोलाविले असता त्या सर्वांवर सरशी करून माझ्या मुलीस वरण्याचे सामर्थ्य सिद्धार्थच्या अंगी असेल असे मला वाटत नाही. म्हणून आपण या आपल्या मागणीविषयी आग्रह धरू नये हेच योग्य दिसते. सुप्रबुद्धाचा निरोप एकूण शुध्धोधन राजा मोठ्या विचारात पडला. त्याला काय करावे असे सुचेना.हि परिस्थिती सिद्धार्थच्या कानी पडली असता. सुप्रबुद्धाचा इच्छेप्रमाणे सर्व व्यवस्था राजाने बेशक करावी आणि माझ्या अंगी युद्ध कौशल्य आदी गुण कितपत आहेत किंवा नाही याची कसोटी खुशाल पहावी. या प्रकारे राज्पुत्राकडून आश्वासन मिळाल्यावर. सुप्रबुद्धाच्या म्हणण्यास कबुल होऊन त्याने चोहोकडे अशी दवंडी पिटवली कि Gautam Buddh-सिद्धार्थ राजपुत्राच्या मनात सुप्रबुद्धाच्या मुलीशी विवाह करण्याचे आहे. तरीही त्या मुलीस वरु इच्छिणाऱ्या एकंदर तरुण क्षत्रियांनी आजपासून सात दिवसांनी ठरलेल्या ठिकाणी यावे आणि आपल्या अंगचे युद्ध कौशल्य आदी गुण दाखवावेत. असे केल्यानंतर ज्याची सरशी होईल त्यास ती मुलगी वरेल. अशाप्रकारे जमलेल्या सर्व तरुणांनी आपापल्या कला गुणांची व युद्ध कौशल्याची शिकस्त केली पण त्या सर्वांमध्ये सिद्धार्थ वरचढ ठरून त्याने त्या मुलीशी विवाह करावा असे ठरले त्या मुलीचे नाव होते यशोधरा. त्यानंतर दरबारातील सर्वांचे समाधान झाले आणि युद्ध कौशल्य व इतर क्षत्रिय कृतीच्या अन्य गोष्टीबाबतीत शंका कुशंका घेणाऱ्या लोकांना उत्तर मिळाले.

गौतम बुद्ध – संसार त्याग


शुध्धोधन राजाने आपल्या पुत्राच्या मनाचा कल घेऊन अशी व्यवस्था तयार केली कि त्याच्या दृष्टीस कोणतीही नकारात्मक गोष्ट पडणार नाही. दीन, दुबळे, अपंग, लाचार इत्यादी लोकांचा वापराच काय पण दृष्टीस हि अशी लोक पडू नये अशी व्यवस्था त्याने करून दिली उपवने तयार केली जेणेकरून सिद्धार्थचे मनोरंजन होईल व संसारिक सुखाकडे तो आकर्षित होईल. सुप्रबुद्धाच्या लावण्यवती मुलीशी विवाह त्याचा लाऊन दिला जेणेकरून संसारात तो गुंतून जाईल व रममाण होईल. पण गौतम बुद्धाच्या मनात संसारातील दुखाचे विचार सतत घोळत राहतअसे, मानवीय जीवनातील दोन टोके, संसारातील प्रत्येक जीव, पशु, पक्षी इत्यादीच्या आयुष्यात दुख:, कष्टे का आहेत ? असे प्रश्न सतत गोंगावत असे. या आणि अश्या असंख्य प्रश्नांचे चिंतन, मनन त्यांचे मन सतत करत राहत असे. तरीही गौतम बुद्धाच्या मनात संसार द्वेष निर्माण होण्यासाठी ज्या महत्वपूर्ण चार गोष्टी इतिहासकारांनी आणि चरित्रकारांनी सांगितल्या आहेत त्या आपण बघू- जेव्हा जेव्हा Gautam Buddh-सिद्धार्थला बाहेर फिरावयास जावेसे वाटे तेव्हा तेव्हा शुध्धोदन राजा दवंडी पिटवून ज्या मार्गाने सिद्धार्थचा रथ जाणार असेल त्या मार्गावर कोणीही विपन्नावस्थेत असू नये, सर्वांनी नवीन कापडे घालून आनंदी चेहऱ्याने त्याचे समोर वावरावे असे जनतेला कळवत असे. मग त्याच मार्गे सिद्धार्थ जात असे. एका दिवशी राजपुत्राच्या मनात नगरात फिरावयास जाण्याचे येऊन त्याने राजाची आज्ञा मागितली फिरावयास निघाला, त्याला सर्वत्र आनंदच आनंद दिसला परंतु एके ठिकाणी एक वयोवृद्ध व्यक्ती दिसला Gautam Buddh-सिद्धार्थने बघितले कि त्या व्यक्तीच्या अंगावर वस्त्र नव्हते शरीराचा काडीचा सारखा सापळा झाला होता. त्याचे प्रत्येक हाड साफ दिसत होते. त्याच्या अंगाच्या कातडीला सुरकुत्या पडल्या होत्या. त्याचे सर्व दात पडलेले असून चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या Gautam Buddh- सिद्धार्थने बघितल्या. त्याचे डोळे खोल गेलेले होते. तो अगदी वाकलेला होता आणि थरथर कापत असल्यामुळे पाउल टाकण्यास त्याला जड जात होते. त्याच्या एका हाथात काठी होती आणि तो मोठ्याने ओरडत होता कि “मजवर दया करून मला काहीतरी द्या ! मी दोन -चार दिवसांचा सोबती आहे रोष करीत तो चालला असतांना त्याच्या अश्रुधारा वाहत होत्या. अशा अवस्थेत त्याला पाहून राजाच्या सैनिकांनी त्याला लगेच रस्त्याआड कुठेतरी लपून ठेवण्याचा प्रयत्न केला. आपले मनुष्य त्या जरठ पुरुषास ढकलत आहेत हे पाहून त्याने सैनिकांना सांगितले कि ‘अरे त्याला तेथेच राहू द्या ‘, मला त्याला पहावयाचे आहे, ती त्याची अतिशय दीन परिस्थिती राजपुत्राच्या मनात आली व त्याने आपल्या सारथीस विचारले कि ते माणसासारखे काय दिसते रे ? हा प्राणी अत्यंत विपन्नलेला व वाकलेला असून याची स्थिती फारच भयंकर व दुख:कारक दिसत आहे. कधी कधी मनुष्य या स्थितीत जन्मास येतात काय रे ? मी चार दिवसाचा सोबती आहे असा जो हा आक्रोश करत आहे त्याचा अर्थ काय ? याला अन्न कधीच मिळत नाही काय रे ? याचे असे दिसण्याचे कारण काय ? याची अशी स्थिती कशामुळे झाली ? सारथी छंदने सांगितले हे दयाळू Gautam Buddh-राजपुत्रा हा वृद्ध पुरुष आहे काही वर्षांपूर्वी हा असा वाकलेला नसून चांगला होता, त्याचे डोळे चांगले, गाल व शरीर चांगले होते. व तो गुटगुटीत होता पण आता तो विद्रूप झाला आहे. वयोमानाने याच्या बुद्धीचा व शरीराचा ऱ्हास झाला आहे. याचे आयुष्यमय जीवन खलास होऊन ज्योती मालवण्याच्या स्थितीत आहेत म्हणून तो म्हणत आहे कि मी दोन चार दिवसांचा सोबती आहे. प्राप्त झालेल्या मनुष्याची अशीच अवस्था होत असते. त्याकडे लक्ष देण्याचे आपणास काय प्रयोजन आहे. असे सारथी म्हणाला मग Gautam Buddh-सिद्धार्थ म्हणाला हि वृद्धपण इतरासही प्राप्त होते कि लक्षावधी लोकामधून एकासच प्रफ्त होते. सारथी म्हणाला महाराज यांच्यासारखी इतरांचीही वृद्धावस्था व्हावायाची आहे. मी व माझी पत्नी यशोधरा व माझे इतर सहकारी यांच्या इतके जगलो तर आमचीही अवस्था अशीच होणार ना ? सारथी म्हणाला होय महाराज ! मी पहिले तेवढे पुरे आणखी पाहण्याची मला इच्छा नाही. मग त्या वृद्धाकडे पाहत तो अत्यंत खिन्न व उदास झाला. राजमहालात परत आल्यावर तो एकांतपणे विचार करत बसला. जे विषय आल्हाददायक व सुखप्रद वाटतात नंतर तेच विषय दुख:द व क्लेशदायक होतात. तो त्याच्या सुखविषयांकडे अजिबात लक्ष देईनासा झाला. गायन, वादन, इत्यादींपासून त्याची करमणूक होईना त्याची अशी परिस्थिती पाहून याशोधारेने त्यास विचारले कि महराज, आज अगदीच उद्विग्न झाला आहात याचे कारण काय ? सिद्धार्थ म्हनला “हे प्रिये, हि सारी सुखे लवकरच आपणासाठी नाहीशी होणार आहेत , शाश्वत असे कोणतेच सुख नाही. तुझी माझी प्रीतीही काळाने विलयपावून आम्हास अतिशय दुर्बल असे वार्धक्य प्राप्त होईल आपले जीवन अत्यंत पराकाष्ठेचे होईल. मग अशा अशास्वत व क्षणभंगुर सुखासाठी मी आपनास का बरे कष्टी करून घेऊ. प्रिये मला हे ऐशोआराम विषतुल्य वाटत असून त्याचा त्याग कारावासा वाटतो. हा समाचार शुद्धोधन राजस कळला तर त्यास अतिशय दुख: झाले. तो आणखी सजग झाला व Gautam Buddh-सिद्धार्तच्या दृष्टीस विपत्ती न पडो म्हणून त्याने अजून व्यवस्था उभी केली. व त्या साठी विशेष प्रयत्न करू लागला.

कालांतराने पुन्हा सिद्धार्थला बाहेर फिरावयास जाण्याची इच्छा झाली आणि यावेळी त्याने राजाला विशेष विनंती केली कि त्यास प्रजेची सद्यस्थिती जाणून घ्यावयाची आहे त्यामुळे मागच्यावेळी जासी विपत्ती माझ्या दृष्टीस पडू नये म्हणून आपण व्यवस्था केली होती तशी येळी करू नये अशी त्याने विनंती केली. जसे लोक नेहमीच्या व्यवहारात वागत असतात तसेच ते मला पहावयाचे आहेत. व्वास्ताविक स्थितीचे आवलोकन केल्याने मला आनंद व शांती वाटेल आणि विशेष शहाणपण अंगी येऊन त्यायोगे चांगल्या प्रकारे सत्ता चालविण्यास मला मदत होईल यासाठी मला सेवकांसह वाटेल तिकडे फिरावयास जाऊ द्यावे. हि त्याची विनवणी एकूण राजाला वाटले त्याला परवानगी दिल्यास त्याच्या मनावर जीवनाविषयी अगोदर झालेला प्रतिकूल ग्रह नाहीसा होऊन त्याचा जीवनाविषयीचा विचार पालटेल. आणि राजाने Gautam Buddh-सिद्धार्थला नगरात फिरण्याची मोकळीक दिली. त्यानंतर Gautam Buddh- सिद्धार्थ व्यापाऱ्याचा वेश धारण करून आपल्या सेवकासह नगरात फिरावयास गेला. त्याने लोकांमध्ये मिसळून निरनिराळ्या लोकांचे रीतीरिवाज, वागणुकीचे प्रकार व व्यवहार पाहून त्याचे त्याने अवलोकन केले. सुख दुखाचे बहुतेक प्रकार पाहावयास मिळून परिस्थितीविषयी बरीच यथार्थ बुद्धी झाली. या प्रमाणे तो सर्व प्रकारचे व दर्जाचे लोक पाहत चालला असता. एका बाजूने रोष त्याच्या कानी पडला मला हाथ देऊन उन्हा करा, अहो मजवर दया करा कि हो, मदत केली नाही तर मी आज आपली घरी पाहुचत नाही. ते एकूण सिद्धार्थ अगदी चपापला व तो आवाज जिकडून आला तिकडे तो वळून पाहू लागला. मग अगदी पिळलेला मनुष्य त्याच्या दृष्टीस पडला. तो धुळीत विव्हळत पडला होता. अंगास वेदना होत असल्याने तो गयावया करत जमिनीवर लोळत होता. उठण्याच्या इराद्याने तो उठण्याचा प्रयत्न करी पण पुन्हा खाली कोसळू लागला. हि त्याची अत्यंत हृदय द्रावक अवस्था पाहून Gautam Buddh-सिद्धार्थचे हृदय अगदी कळवळून गेले. तो त्याच्याकडे धावत गेला आणि त्याला उचलून त्याचे मस्तक आपल्या मांडीवर ठेवले. त्याला आपल्या मऊ हाथाने चेपून म्हणाला ‘बांधव तुला काय होत आहे, काय इजा झाली आहे. सांगता येत नाही तो मोठ्याने कण्हत असल्याचे पाहून, राजपुत्राने आपल्या सार्थ्यास पुसले, हा असा श्वास टाकीत असून याचे काय बरे कारण, महाराज याला काहीतरी जबर रोग जडला आहे, याच्या अंगात तो अगदी विकोपास गेला आहे. सपाटून ताप भरला आहे. शरीर उडत आहे, याचे स्नायू अगदी कमकुवत झाले आहेत. रोगात माणसाची अशीच अवस्था होत असते महाराज, रोगाच्या असह्य वेदनांमुळे हा असे डोळे फिरवीत आहे. हाथपाय आपटीत आहे. श्वास रोखल्या जात आहे. या रोगाने याचा लवकरच अंत होईल. परंतु ते होण्या अगोदर पुष्कळ वेळेपर्यंत याचे असेच हाल होत राहणार आहेत. महाराज हा याला लागलेला रोग स्पर्श संचारी आहे. याला असे धरून बसू नका कदाचित याचा रोग आपणासही पछाडील आणि मग तुमचीही अशीच दश होईल त्याने Gautam Buddh-सिद्धार्थला असे भय घातले तरीही ते मनास न आणून तो त्याची शुश्रूषा करीत बसला. त्याने पुन्हा सारथीस विचारले कि याला जो रोग जडला आहे तसाच तो इतरांना सुद्धा जडण्याचा संभाव आहे का ? याशिवाय दुसरे हि भयंकर रोग मनुष्यस होतात काय ? सारथी म्हणाला याच प्रकारचे इतरही अनेक रोग मनुष्यास पिडीत असतात. हे रोग मनुष्यास नकळत होतात काय ? ते सर्पाप्रमाणे नकळत येवून मनुष्यास घेरतात, सर्पाप्रमाणे मनुष्यावर घाला घालायला सदैव टपलेले असतात. यांच्या पायी कोणाचा कितपत नाश होईल ते सांगवत नाही. असा रोग कोणासही होऊ शकतो का ? होय महाराज कोणासही होऊ शकतो. मग मी जर निजेल आणि निजून उठेल तर उठल्यावर मला हा रोग जडलेला असेल किंवा नाही याची काही शाश्वती नाही असेच का ? होय महाराज. म्हणजेच याचा सारखा रोग झाल्यास प्रत्येक मनुष्याची याच्यासारखी स्थिती होणार आणि खूप काळ जगला तर वार्धक्य येऊनही दयनीय प्रत्येक मानुशायची अवस्था होणार हे खरे का ? होय महाराज ! अशी अवस्था झाल्यावर वर शरीर जर्जर झाल्यावर त्याचा काय परिणाम होतो बरे ? हे राजपुत्र मग ते मृत्यू पावतात. मृत्यू पावतात ? होय शेवटी त्यास मरण येते राजपुत्रा ! जे कमी वयात रोगाने ग्रस्त होतात ते जर्जर होऊन कमी वयात मृत्यू पावतात व जे थोडे जास्त दिवस जगतात ते नंतर वार्धक्याने जर्जर होऊन मृत्यू पावतात.

गौतम बुद्ध आणि एका मनुष्याचे प्रेत !


असा त्यांचा संवाद सुरु असताना तिकडून एक प्रेत चालले होते. तर छंदाने त्याच्याकडे बोट दाखवून त्याला Gautam Buddh-सिद्धार्थला सांगितले कि, महाराज ते बघा मनुष्य मरण पावला म्हणजे त्याचे संबंधी जन त्याला असे स्मशानभूमीला नेऊन त्याचा अंत्यविधी करतात. सिद्धार्थने वर बघितले तर त्याला दिसले कि एका माणसाला बांबूच्या तिरडीला बांधलेले होते व चार माणसे नदी किनारी घेऊन चालले होते व त्याचे सगे सोयरे शोक करीत होते. मग त्याच्या मागून जाऊन त्याने त्या मनुष्याचा दहन विधी पहिला. त्या मनुष्याच्या संबंधी जणांचा आक्रोश त्याची मरणोत्तर झालेली अवस्था त्याने पाहिली. त्याचे चित्त अतयंत खिन्न झाले. मृत्यूपूर्वी त्याची कोणती स्थिती होती ? आणि मरण पावल्यावर त्याची कोणती दशा झाली ? अशापाराकारचे कित्येक प्रश्न त्याच्या मनात घोळू लागले. त्याला वाटू लागले कि जिवंत असतांना मनुष्यांनी आपल्या देहाचा आपल्या वित्ताचा आपल्या स्त्री पुत्राचा संबंधी जनाचा अभिमान व प्रेम मनात वागवावे आणि अंतिम वेळी सर्वास सोडून विनाशपावावे हि केवढी मोठी आपत्ती. हे विचार मनात सुरु असताना त्याने छंदास विचारले.हा असा अंत एकांदर जिवंत प्राण्यांचा होतो काय ? छंदाने उत्तर दिले शेवट सर्वांचा व्हावयाचा महाराज, यातून कोणीही चुकणे नाही, मनुष्याने आपल्या देहाचे कितीही जतन केले एकंदर इंद्रीच्याचे विषय त्याने कितीही भोगिले तरीही त्याच्या देहाची अशी राख खात्रीने व्हावयाची. देहवासन झाल्यावर एकंदर गात्रे निर्जीव होऊन सडू लागतात. सर्व ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये निर्व्यापार होऊन विगलित होतात ज्यावर आपण पराकाष्ठेचे प्रेम केलेले असते ते जीवाची माणसे आपली अत्न्यावस्था पाहून शोकाकुल होतात, आक्रोश करतात परंतु त्या आक्रोशाचा एकही शब्द त्या मृतास ऐकू जात नाही.असे पंचत्वास पावणे हे समग्र शृष्टीस कधीही तळेले नाही. मनुष्य उच्च वर्णातला असो कि नीच वर्णातला, तो सदाचारी असो कि दुराचारी, त्याला हि अवस्था प्राप्त झाल्यावाचून राहावयाची नाही. हि अवस्था त्याची एकदाच होऊन त्याचे सर्व आटोपते असे समजू नका शास्त्र सांगतात कि प्राण्यांचे इथे देहावसान झाल्यावर त्यास पुन्हा कुठेतरी दुसरा जन्म घ्यावा लागतो. पुन्हा बाल्यावस्था, तारुण्य व वार्धक्य प्राप्त होऊन तर्हे तर्हे च्या रोगांपासून पिडा सोसावी लागते. त्यामध्ये रखडता रखडता अखेरीस त्यास मरण प्राप्त होते. असे रहाट गाडे एकसारखे सतत चालू असते. यात खंड पडत नाही. हे ऐकून राजपुत्राची मुद्रा अगदी काळवंडून गेली डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागल्या. त्याचा कंठ सद्गादिद झाला. संपूर्ण मानव जातीस हि आपत्ती सोसावी लागणार आणि कदापि चुकणे नाही. हे ऐकून त्याचे हृदय अगदी कळवळून गेले. त्याच्या मनात अनेक दुखाचे विचार येऊन तो गाडी अस्वस्थ झाला. हे माझे एकंदर ज्ञात व अज्ञात बांधव विपत्ती आणि मृत्यू यांच्या जालात गुरफटलेले पाहून मला अत्यंत खेद वाटतो. मनुष्यास ऐहिक जीवनाविषयी कितीही प्रेम असले तरीही या लोकी त्यास प्रचंड विपत्ती व दुख: हि भोगावे लागत आहे. जे विषय एकेकाळी अगदी सुखकारक भासतात ते परिणामी अत्यंत दुखदायी व वीट आणणारे होतात. आपणास इहलोकी अतिउत्तम अशा वाटतात त्या केवळ भास असते. त्यात खरेपणाचा वास यत्किंचितही नसतो. येथील सुख विषयाचा शेवट दुखताच होतो. तारुण्याचा शेवट वार्धक्यात होतो. प्रेम विषयाचा विनाश होऊन होतो. अत्यंत प्रिय वाटणाऱ्या जीविताला भयंकर मरण प्राप्त होऊन होतो. असा मृत्यू एकदा प्राप्त झाला असता तरी ठीक. पण पुन्हा पुन्हा जन्म आणी मरण हे चक्र सतत चालू असते. मी आजपर्यंत अश्या भ्रमात होतो कि ऐहिक जीवन अत्यंत सुखकारक असावे आणि परिणामी अखंड शांतीचा लाभ होत असावा. माझी भ्रांती आज अगदी फिटली. नेत्रावारचे अज्ञान पटल आज दूर होऊन मला आज इहलोकीच्या वास्तविक स्थितीचे दर्शन होऊ लागले. हे माझे बांधव मजप्रमाणेच या विपत्तीतून मुक्त होण्यासाठी आपआपल्या देवाची करुणा भाग=कित असतील पण त्यांची करुणारव देव ते ऐकत नाहीत. या विपत्तीचे निवारण होऊन मानवास साध्य होण्यासारखा उपाय असावा. ज्या देवाची हे लोक करुणा भाकीत असतात ते स्वत: कदाचित दुर्बल असावेत त्याला कदाचित आपल्या उपासाकाचे संकट निवारता येत नसावे. ब्रम्हदेवाने अशी शृष्टी निर्माण करून तिला सदैव विपत्तीत रखडू द्यावे हे काही चांगले दिसत नाही. तो स्वत: अशी दुस्थिती राहू देत असेल तर त्याला चांगला म्हणवत नाही. किंवा नसल्यास त्याला देव म्हणता येत नाही. माझा रथ मागे फिरवून माझ्या मंदिरास चल. जेवढे पाहिले तेवढ्याने माझ्या नेत्राचे पारने फिटले. मग मागे वळून राजमहला कडे जात असताना एका सरदाराच्या कन्येनी त्याला बघितले त्याचे सौंदर्य, पुरुषार्थ पाहून त्याला म्हणाली ज्यांनी तुला जन्म देऊन लहानच मोठा केला ते माता, पिता धन्य होय, ज्या स्त्रीस तुझा लाभ झाला ती स्त्री धन्य होय. हे अभिनंदनाचे शब्द एकूण Gautam Buddh-सिद्धार्थ म्हणाला ज्या मोक्ष मिळाला तो धन्य होय असे म्हणून त्याने आपल्या गळ्यातला हार काढून त्या सरदार कन्येला दिला. तो महालात आल्यावर, मंदिरात जाऊन तो विचारात मग्न झाला. त्याला मुळीच शांती मिळेना. संसार मूलक विपत्तीतून मार्ग कसा काढावा त्याला काहीच सुचेना. संपत्ती, वैभव व ऐशोआराम, याचा त्याला अगदी वीट आला. याशोधारेने त्याला विचारले महाराज आपले चित्त आज पराकाष्ठेचे उद्विन्ग्न का झाले आहात ? व आपण असा खेद का करत बसला आहात ? तर तो म्हणाला मला सभोवतालच्या वस्तू व माणसे यांच्या स्थितीमध्ये बदल होताना दिसत आहे तो पाहून मला अतीव वेदना होत आहेत. मनुष्य वृद्ध होतात, आजारी पडतात व शेवटी मरतात. हि स्थिती ज्याच्या लक्षात येते त्याला त्या जीवितात सौख्य कसे वाटेल बरे.त्यांनतर काही दिवसांनी त्याला पुत्ररत्न प्राप्त झाले. परंतु त्याच्या मनातील विचार थांबले नाहीत वैराग्या कडील कल कमी झाला नाही.

गौतम बुद्धांचा संन्याश्याशी संवाद

एके दिवशी Gautam Buddh-सिद्धार्थ जम्बो वृक्षाखाली संसार त्यागाविषयी मनन करत बसला असताना तिथे अचानक एक याती त्याच्या दृष्टीस पडला. त्याचा तो उंच बांधा व मुखचर्यां पाहून सिद्धार्थाने त्याला विचारले तू कोठून आलास ? तू कोण आहेस ? तो याती म्हणाला मी श्रमन आहे, या जगातील विपत्तीला व संकटाला त्रासून मी गृहत्याग करून मोक्ष साधण्यास लागलो आहे. येथील सर्व वस्तूंचा एकसारखा नाश होत चालला आहे. एक सत्य काय ते अविनाशी आहे इतर सर्व वस्तू जात सतत बदलत असून ते केवळ नश्वर आहे. यास्तव ज्यास कदापि नाश नाही असे सुख प्राप्त करून घेण्याचा मी निर्धार केला आहे. अनाद्य, अनंत असे जीवन प्राप्त व्हावे अशी मला इच्छा आहे, यास्तव मी ऐहिक गोष्टींचा विचार मनात यत्किंचितही येवू देत नाही. हि उदासीनता माझ्या अंगी पूर्णपणे बाणावी म्हणून मी अगदी निर्जन प्रदेशात एक गुहा शोधून काढून तीत राहून बहुतेक काळ मी एकांतात घालवीत असतो. मी भिक्षा मागण्यापुरता जनात येत असतो. बाकी सगळा वेळ मी एकांतात बसून मनन व ध्यान करण्यात घालवीत असतो. या दुख:मय संसारामध्ये शांतता लाभ होणे अशक्य आहे. ऐहिक सुख विषयाची व्यर्थता माझ्या मनावर पूर्णपणे ठसली आहे. आणि या विषय सुखाचा मला वीट आला आहे. या लोकांची स्थिती पाहून मला पराकाष्ठेचा खेद होत आहे. फार काय पण या विपन्मय जगामध्ये क्षणभरही राहू नये असे मला वाटते. हे राजपुत्रा जेथे उष्णता असते तेथे शीततेचाही संभव असतो. ज्या प्राण्यास दुख: अनुभव घडत असतो त्यांच्या अंगी सुखानुभव घेण्याचीही योग्यता असते. या जगात दुख: निर्माण झाले आहे त्यावरून असे वाटते कि, येथे सुखही विस्तार पावेल, कारण उष्णता व शितलता, सुख व दुख: हि परस्पर सावे आहेत जेथे एकाचे अस्तित्व असते तेथे दुसऱ्याचाही समभा असतो. याच न्यायाने जेथे पुष्कळ विपत्ती अनुभवास येते. तेथे सुखही पुष्कळ असे येते. हि गोष्ट तू नीट पाहशील तर तुझ्या अवलोकनास सहज येईल. एकदा मनुष्य चिखलात फसला असता, जसा तो जवळपास असलेल्या पुष्पकर्णीचा आश्रय करून आपली अंगास किंवा वस्त्रास चिकटलेल्या मळाचे क्षालन करितो. त्याच्या ठाईचा पापमळ धुवून टाकण्यासाठी. मोक्षमार्ग रुपी सरोवराचा शोध केला नाही तर त्यात सरोवराचा काही एक दोष नाही. त्याचप्रमाणे मोक्षमार्ग संनिध असताना त्याचा अवलंब पापिजानांनी केला नाही तर त्यात दोष कोणाकडे बरे. एखाद्या रोग्यास रोगाने घेरले असता. तो जर रोग बारा करणाऱ्या एखाद्या वैद्याचे सहाय्य घेणार नाही तर तेथे या वैद्याकडे काय दोष आहे. अशीच गोष्ट पापरूपी रोगाने पिडलेल्या मानवाची आहे. तो जर सत्य , ज्ञानाचा उपदेश करणाऱ्या धमर्गुरूचा शोध करून त्याचे सहाय्य घेणार नाही तर तो त्या धर्मगुरूचा दोष आहे असे कोण म्हणेल. यावर सिद्धार्थ म्हणतो- हा तुझा बोध फारच उत्तम आह्रे. आता माझा हेतू सिद्धीस जाईल असे वाटते. माझा पिता मला असा उपदेश करत असतो कि, या संसाररुपी सुखाचा मी उपभोग घ्यावा आणि या लोकीचे माझे कर्तव्य उत्तम प्रकारे बजावून माझा व माझ्या घराण्याचा लौकिक वाढवावा. त म्हणतो कि भर ज्वानीत आहे. तेव्हा धर्म पारायणतेमध्ये आयुष्य घालविण्या जोगे माझे अद्यापि वय झाले नाही. श्रमन म्हणतो, सत्य धर्म मार्गाचा शोध केव्हाही करण्यास प्रवृत्त व्हावे. त्याला अमुकच वय लागते किंवा अमुकच प्रसंग लागतो अशातला काहीही अर्थ नाही हे त्याचे म्हणणे एकूण राजपुत्राच्या मानस आनंद वाटतो व तो म्हणतो धर्म मार्गाचा शोध करावयास निघण्याची हीच वेळ आहे. धर्माचे पूर्ण ज्ञान प्राप्त करून घेण्यास हीच योग्य वेळ आहे. भिक्षुकवृत्तीचा अवलंब करून मोक्षमार्ग सिध्यर्थ वनात संचार करण्याची हीच संधी आहे. हे राजपुत्रा, हा तुझा निर्धार परमस्त्युत्य आहे. तू आजपासून सदाचाराचा कडकडीत व्रत धारण करून धर्म मार्गाचा शोध अविश्रांतपणे कर. आपला हा स्तुत्य उपक्रम

अधिक माहितीसाठी https://en.wikipedia.org/wiki/The_Buddha

या सारख्याच आपणास आवडतील अश्या इतर पोस्ट :-

Yeshu (Jesus)- येशू

Gurunanak / गुरुनानक

अवध में फिर लौट कर आये राम ! – Ram

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
4 Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत