जे कारागीर त्यांच्या हातांनी आणि (टूल्स) साधनांचा वापर करून काम करतात वैविध्यपूर्ण वस्तू बनवितात, जे पारंपारिक व्यवसाय करत आहेत जसे कि झाडू बनविणे, बूट चप्पल तयार करणे, कपडे शिवणे, फुल हार तयार करणे इत्यादी प्रारंभी १८ प्रकारच्या पारंपारिक कारागीरांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी Vishwakarma Yojna “विश्वकर्मा” ही योजना सुरु केली आहे. हि योजना १७ सप्टेंबर २०२३ रोजी कारागीरांना शेवटपर्यंत समर्थन देण्यासाठी सुरू केली आहे. या योजनेत १८ व्यापारांमध्ये गुंतलेले कारागीर समाविष्ट आहेत, उदा. सुतार (सुथार/बधाई), बोट बनवणारा, चिलखत बनवणारा, लोहार (लोहार), हातोडा आणि साधन किट बनवणारा, कुलूप तयार करणारा, सोनार (सोनार), कुंभार (कुम्हार), शिल्पकार (मूर्तिकर, दगड कोरणारा), दगड तोडणारा, मोची (चर्मकार) / शूस्मिथ / पादत्राणे कारागीर, गवंडी (राजमिस्त्री), बास्केट/चटई/झाडू बनवणारा/कोयर विणकर, बाहुली आणि खेळणी बनवणारा (पारंपारिक), नाई (नाई), हार तयार करणारा (मालाकार), धुलाई (धोबी), शिंपी (दरजी) आणि फिशिंग नेट मेकर.
- (Vishwakarma Yojna) पी एम विश्वकर्मा योजनेत मिळणारे लाभ
- पी एम विश्वकर्मा (Vishwakarma) योजनेसाठी पात्रता
- (Vishwakarma Yojan) प्रारंभी पीएम विश्वकर्मा योजने अंतर्गत पात्र व्यापार आणि त्यांचे वर्णन
- पीएम विश्वकर्मा (Vishwakarma Yojna) योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे.
- पीएम विश्वकर्मा (Vishwakarma Yojna) योजनेसाठी अर्ज कसा करावा.
PM विश्वकर्मा ( Pm Vishwakarma Yojna) योजनेची ध्येय व उद्दिष्टे.
- विश्वकर्मा म्हणून ओळख: लाभार्थ्यास पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र दिले जाते.
- कौशल्य अपग्रेडेशन– लाभार्थ्यास प्रगत तंत्रज्ञान व आजच्या आधुनिक युगानुसार “प्रगत प्रशिक्षण” दिले जाते व प्रशिक्षणा दरम्यान ५०० रु रोज या प्रमाणे मानधन दिले जाते.
- टूलकिट प्रोत्साहन– लाभार्थ्यास प्रशिक्षणानंतर आवश्यक ते औजारे (टूलकीट) घेण्यासाठी १५००० रु. व्हाउचर दिले जाते.
- क्रेडिट सपोर्ट- लाभार्थ्यास मुलभूत व प्रगत प्रशिक्षण पूर्ण केल्यावर व्यवसायासाठी पहिल्या टप्प्यात ५ % व्याजदरावर १ लाख रु. कर्ज तर दुसऱ्या टप्प्यात ८ % व्याज दरावर २ लाख रुपये दिले जातात.
- डिजिटल व्यवहारांसाठी प्रोत्साहन– ऑनलाईन व्यवहार- फोनपे, गुगल पे, अन्य प्रकारचे डिजिटल व्यवहार केल्यावर १०० रु महिना दिला जातो.
- विपणन (मार्केटिंग) समर्थन– लाभार्थ्यास व्यवसाय वाढीसाठी सरकारी व्यवस्थेची मदत मिळते.
(Vishwakarma Yojna) पी एम विश्वकर्मा योजनेत मिळणारे लाभ
ओळख: पीएम विश्वकर्मा (Vishwakarma) प्रमाणपत्र आणि ओळखपत्र
Vishwakarma योजने अंतर्गत लाभार्थ्यांना डिजिटल तसेच भौतिक स्वरूपात प्रमाणपत्र आणि पीएम विश्वकर्मा ओळखपत्र दिले जाईल. एक विशिष्ठ ओळख क्रमांक असणारे ओळखपत्र आणि प्रमाणपत्र लाभार्थ्यास दिले जाईल. हे ओळखपत्र आणि प्रमाणपत्र लाभार्थ्यास “विश्वकर्मा” – (Vishwakarma) म्हणून ओळख देईल आणि त्याला/तिला योजने अंतर्गत सर्व लाभ मिळविण्यास पात्र बनवेल.
कौशल्य अपग्रेडेशन
पीएम विश्वकर्मा -Vishwakarma या योजने अंतर्गत कारागीर, जे हाताने काम करत आहेत आणि जे पारंपारिक पद्धतीने काम करत आहेत त्यांना ५ ते ७ दिवसांचे त्यांच्या व्यवसाय कौशल्याचे मुलभूत प्रशिक्षण दिले जाते आणि मग मुलभूत प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आजच्या आधुनिक युगात आवश्यक असलेले १५ दिवसांचे (कौशल्य अपग्रेडेशन) प्रगत प्रशिक्षण देऊन प्रगत कौशल्ये कारागीरांमध्ये विकसित केल्या जातात. जेणेकरून पारंपारिक कारागिरांच्या क्षमतांमध्ये वाढ होईल व शेवटी त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांची व्यावसायिक व आर्थिक प्रगती होऊ शकेल.
प्रशिक्षण स्टायपेंड
प्रधानमंत्री विश्वकर्मा (Vishwakarma) योजने अंतर्गत प्रत्येक लाभार्थी प्रशिक्षण घेण्यास पात्र असेल त्यांना ५ ते ७ दिवसांचे मुलभूत प्रशिक्षण आणि मुलभूत प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर, आधुनिकते साठी १५ दिवसांचे प्रगत प्रशिक्षण देण्यात येईल या प्रशिक्षणा दरम्यान प्रत्येक कारागिराला दररोज रु. ५०० स्टायपेंड दिला जाईल.
टूलकिट प्रोत्साहन
विश्वकर्मा (Vishwakarma Yojna) योजने अंतर्गत मिळालेल्या मूलभूत प्रशिक्षणानंतर e-RUPI/ द्वारे लाभार्थ्यांना सुधारित टूलकिट खरेदी करण्यासाठी ई-वाउचर च्या स्वरुपात १५००० रु पर्यंतचे टूलकिट प्रोत्साहनपर दिली जाते. कौशल्य मूल्यांकनानंतर लाभार्थीला ई-वाउचर प्रदान केले जाते. या ई-वाउचरचा उपयोग नेमून दिलेल्या वेळी लाभार्थ्यास टूलकीट खरेदी करण्यास करता येईल.
क्रेडिट सपोर्ट
विश्वकर्मा (Vishwakarma Yojna) योजनेमध्ये कारागीरांमध्ये व्यावसायिक दृष्टीकोण निर्माण व्हावा व त्यांनी उद्योगशीलते कडे वळावे व आपल्या अंगी असलेल्या अंगभूत कारागीरीचा विकास करून स्वत:चा व्यवसाय (एंटरप्राइज) सुरु करावेत यासाठी ज्या लाभार्थींनी मूलभूत प्रशिक्षण पूर्ण केले आहे ते रु. १ लाख पर्यंतच्या क्रेडिट लोनच्या पहिल्या टप्प्याचा लाभ घेण्यास पात्र असतील. ‘एंटरप्राइज डेव्हलपमेंट लोन्स’ नुसार रु. 3 लाख पर्यंत दोन टप्प्यांत जसे कि, १ लाख रु पहिल्या टप्प्यात आणि दुसऱ्रुया टप्प्यात २ लाख अनुक्रमे १८ महिने आणि ३० महिन्यांच्या कालावधीसह, पहिला टप्पा ५ % निश्चित केलेल्या सवलतीच्या व्याज दराने, तर दुसऱ्या टप्प्यात मिळणाऱ्या कर्जावर भारत सरकारच्या ८ % च्या मर्यादेपर्यंत व्याज सवलत दिली जाते. दुसऱ्या टप्प्यातील कर्ज अशा लाभार्थ्यांना उपलब्ध असेल ज्यांनी पहिल्या टप्प्याचा लाभ घेतला आहे आणि एक मानक कर्ज खाते राखले आहे आणि त्यांच्या व्यवसायात डिजिटल व्यवहार स्वीकारले आहेत किंवा प्रगत प्रशिक्षण घेतले आहे.
डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहन
प्रधानमंत्री विश्वकर्मा (Vishwakarma Yojna) योजनेच्या एका प्रमुख उद्दिष्टांपैकी एक असलेल्या “डीजीटल व्यवहार वाढ” करिता कारागीरांनी डिजिटल व्यवहारांकडे वळावे म्हणून कारागिरांना केलेल्या प्रत्येक डिजिटल व्यवहारावर १ रु. प्रति डिजिटल व्यवहार, या प्रमाणे महिन्याला जास्तीत जास्त १०० रु. प्रत्येक डिजिटल व्यवहारासाठी लाभार्थीच्या खात्यात जमा केले जाणार आहेत.
विपणन (Marketing) समर्थन
विश्वकर्मा (Vishwakarma Yojna) योजने अंतर्गत कारागीरांना गुणवत्ता प्रमाणपत्र, ब्रँडिंग, GeM सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ऑनबोर्डिंग, जाहिरात, प्रसिद्धी आणि मूल्य शृंखलाशी संबंध सुधारण्यासाठी इतर विपणन क्रियाकलापांच्या स्वरूपात विपणन (Marketing) समर्थन प्रदान केले जाईल.वर नमूद केलेल्या फायद्यांव्यतिरिक्त, ही योजना लाभार्थ्यांना औपचारिक MSME इकोसिस्टममध्ये ‘उद्योजक’ म्हणून उदयम असिस्ट प्लॅटफॉर्मवर ऑनबोर्ड करेल. PM विश्वकर्मा पोर्टलवर आधार-आधारित बायोमेट्रिक प्रमाणीकरणासह ग्राहक सेवा केंद्रांद्वारे- Common Service Centre द्वारे लाभार्थ्यांची नोंदणी केली जाईल. लाभार्थ्यांची नावनोंदणी तीन-चरणीय पडताळणीद्वारे केली जाईल ज्यामध्ये ग्रामपंचायत/यूएलबी स्तरावर पडताळणी, जिल्हा अंमलबजावणी समितीद्वारे पडताळणी आणि शिफारस आणि स्क्रीनिंग समितीची मान्यता यांचा समावेश असेल.
पीएम विश्वकर्मा हि संपूर्णपणे भारत सरकार द्वारे अर्थसहाय्यित योजना आहे या योजनेसाठी भारत सरकारने १३,००० कोटी रुपयांची प्रारंभिक तजवीज केली आहे.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय (MoMSME), कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय, (MSDE) आणि वित्तीय सेवा विभाग (DFS), वित्त मंत्रालय (MoF) भारत सरकार द्वारे या योजनेची संयुक्तपणे अंमलबजावणी केली जाईल.
पी एम विश्वकर्मा (Vishwakarma) योजनेसाठी पात्रता
- हात आणि (टूल्स) साधनांनीकाम करणारा कारागीर आणि कौटुंबिक-आधारित पारंपारिक व्यापारांपैकी एकामध्ये गुंतलेले असंघटित कारागीर.
- पीएम विश्वकर्मा Vishwakarma Yojna अंतर्गत नोंदणी करण्यासाठी लाभार्थीचे किमान वय १८ वर्षे असावे
- नोंदणीच्या तारखेला लाभार्थी व्यापारात गुंतलेला असावा
- नोंदणीच्या तारखेला अर्जदारार केंद्र सरकार किंवा राज्य सरकार साठी स्वयंरोजगार/व्यवसाय विकास, उदा. PMEGP, पीएम स्वनिधी, मुद्रा, तथापि, MUDRA आणि SVANidhi चे क्रेडिट-आधारित योजनांतर्गत गेल्या ५ वर्षांत कर्ज घेतलेले नसावे अथवा संबंधित योजने अंतर्गत घेतलेले थकीत लोन त्याच्या नावावर नसावे.
- वरील योजने अंतर्गत लोन घेतलेल्या अर्जदाराने कर्ज मंजूर झाल्याच्या तारखेपासून ५ वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांच्या कर्जाची पूर्णपणे परतफेड केली असेल तर, ते अर्जदार पंतप्रधानांच्या विश्वकर्मा योजनेसाठी पात्र असतील.
- पीएम विश्वकर्मा योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी योजनेंतर्गत एक कुटुंब एक लाभ या अंतर्गत लाभ मिळतो, पती, पत्नी आणि अविवाहित मुलांचा ‘कुटुंब’ म्हणून परिभाषित केले आहे. म्हणजेच या योजनेचा लाभ कुटुंबातील एका सदस्यापुरता मर्यादित आहे.
- सरकारी सेवेत असलेली व्यक्ती आणि तिचे/त्याचे कुटुंब सदस्य पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत पात्र नसतील.
(Vishwakarma Yojan) प्रारंभी पीएम विश्वकर्मा योजने अंतर्गत पात्र व्यापार आणि त्यांचे वर्णन
| अ.क्र. | श्रेणी | ट्रेड | वर्णन |
| १ | लाकूड आधारती | सुतार- (Suthar/ Badhai) | हाथ आणि (Tools) साधनांचा वापर करून लाकडी उत्पादने किंवा लाकडी वस्तूतील बदल/दुरुस्ती शी संबंधित स्वयंरोजगार करणारे कारागीर. |
| २ | लाकूड आधारती | बोट मेकर | हाथ आणि (Tools) साधनांचा वापर करून लाकडी नौका किंवा लाकडी नौकातील बदल/दुरुस्ती शी संबंधित स्वयंरोजगार करणारे कारागीर. |
| ३ | लोह-लोखंड /धातूवर आधारित/दगडावर आधारित | आर्मरर | हाथ आणि (Tools) साधनांचा वापर करून विविध प्रकारचे तलवारी, ढाल, चाकू यांसारखे शस्त्र, हेल्मेट इ. किंवा विविध प्रकारचे तलवारी, ढाल, चाकू यांसारखे शस्त्र, हेल्मेट इ. तयार करणारे व त्यात बदल/दुरुस्ती शी संबंधित स्वयंरोजगार करणारे कारागीर. |
| ४ | लोह-लोखंड /धातूवर आधारित/दगडावर आधारित | लोहार | हाथ आणि (Tools) साधनांचा वापर करून विविध प्रकारचे धातू जसे कि, लोखंड, तांबे, पितळ किंवा कांस्य इत्यादी धातू गरम करून, व त्यापासून विविध वस्तू बनविणे अथवा धातूच्या वस्तूंमध्ये बदल/ रिपेअरशी संबंधित स्वयंरोजगार करणारे कारागीर |
| ५ | लोह-लोखंड /धातूवर आधारित/दगडावर आधारित | हातोडा आणि टूल किट मेकर | हाथ आणि (Tools) साधनांचा वापर करून विविध प्रकारचे धातू जसे कि, लोखंड, धातू गरम करून, व त्यापासून विविध वस्तू, हातोडा बनविणे अथवा धातूच्या वस्तूंमध्ये बदल/ रिपेअरशी संबंधित स्वयंरोजगार करणारे कारागीर |
| ६ | लोह-लोखंड /धातूवर आधारित/दगडावर आधारित | लॉकस्मिथ | हाथ आणि (Tools) साधनांचा वापर करून विविध कुलूप एकत्र करणे, स्थापित करणे आणि दुरुस्त करणे तत्संबंधी स्वयंरोजगार करणारे कारागीर. |
| ७ | लोह-लोखंड /धातूवर आधारित/दगडावर आधारित | शिल्पकार (मूर्तिकर, स्टोन कार्व्हर), दगड तोडणारा | शिल्पी म्हणून ओळखले जाणारे शिल्पकार किंवा त्यांच्यासोबत काम करणारे मुर्तिकार जे हात आणि (Tools) साधनांचा वापरून दगडांना कोरणे, तोडणे किंवा दगडांना आकार देऊन त्यामध्ये त्रिमितीय कलाकृती तयार करणारे स्वयंरोजगार करणारे कारागीर आणि त्यांच्यासोबत काम करणारे कारागीर |
| ८ | सोने/चांदीवर आधारित | सोनार | हाथ आणि (Tools) साधनांचा वापर करून सोने आणि इतर मौल्यवान धातूचे दागिने, डिझाईन व इतर वस्तू तयार करणारे तत्संबंधी स्वयंरोजगार करणारे कारागीर आणि त्यांच्यासोबत काम करणारे कारागीर. |
| ९ | क्ले(माती/ चिखल) आधारित | कुंभार | हाथ आणि (Tools) साधनांचा व चाक वापर करून मातीची भांडी तयार करणारे, चिकणमाती मोल्डिंग करून त्यांना भट्टीत बेकिंग करून मातीची व चिकन मातीची भांडी व इतरवस्तू बनवणारे तत्संबंधी स्वयंरोजगार करणारे कारागीर |
| १० | लेदर बेस्ड | मोची (चर्मकार)/ Shoesmith/ पादत्राणे कारागीर | रस्त्याच्या कडेला असलेले छोटे स्टॉल किंवा प्रवास रस्त्यावर जे हाताचा वापर करून आणि कटर सारखी पारंपारिक साधने, हातोडा, सुई, धागे इचा वापर करून लेदर ची पादत्राणे उत्पादन, दुरुस्ती करणारे |
| ११ | आर्किटेक्चर/बांधकाम आधारित | मिस्त्री (राजमिस्त्री) | गवंडी कारागीर आणि त्यांच्यासोबत काम करणारे कारागीर जे कामे करण्यासाठी हात आणि साधने वापरून विविध संरचना घर, इतर बांधकाम तयार करणे वीट/ब्लॉक वापरणे, प्लास्टरिंग, सिमेंट, वॉटर प्रूफिंग काम इ. असंघटित क्षेत्रात काम करणारे कारागीर, राजमिस्त्री म्हणून देखील या कारागीरांस ओळखले जाते |
| १२ | इतर | बास्केट/चटई/ झाडू मेकर/ कॉयर विणकर | बास्केट मेकर्स कारागीर, लवचिक साहित्य विणणे विविध प्रकारच्या टोपल्या तयार करणारे असंघटित क्षेत्रातील कामगार बास्केट, मॅट्स इ., मॅट मेकर्स/कॉयर विणकर स्वयंरोजगार कारागीर आणि कारागीर जे कॉयर विणतात आणि या वस्तू बनवण्यासाठी जे लोक बांबूचे साहित्य वापरतात . झाडू मेकर्स कारागीर आणि कारागीर कोण गोळा केलेल्या ब्रिस्टल्सवर प्रक्रिया करून विविध गवत किंवा वनस्पती जसे नारळ व इत्यादीचा वापर करून झाडू बनवणे लाकडी हँडलसारखी साधने, कात्री, चाकू इ. बनविणे इत्यादी संबंधातील कारागीर, स्वयंरोजगार करणारे कारागीर आणि त्यांच्यासोबत काम करणारे कारागीर |
| १३ | इतर | बाहुली आणि खेळणी मेकर (पारंपारिक) | हाथ आणि त्यासारख्या साहित्याचा वापर करून खेळणी लोकर, धागे, कापूस, लाकूड इ. चा वापर करून बाहुली आणि खेळणी बनवणारे कारागीर. |
| १४ | इतर | Barber – न्हावी | हाथ, कात्री, ब्लेड, कंघी, शेव्हिंग क्रीम इ वापरून प्रामुख्याने केस कापणे, मुंडण इ. ग्रूमिंग सेवा प्रदान करणारे लोक, स्वयंरोजगार कारागीर आणि त्यांच्यासोबत काम करणारे कारागीर |
| १५ | इतर | पुष्पहार मेकर | धार्मिक विधी, सांस्कृतिक किंवा वापरण्यासाठी औपचारिक प्रसंगी वापरात येणारे फुलांचे हार, हाताने तयार करणारे कारागीर |
| १६ | इतर | धोबी | हाथ व धुण्याचे तंत्र, स्थानिक साबण, लाकडी काठी ‘थापी’ कोळसा आधारित इस्त्री इत्यादी वापरून कपडे धुणे आणि इस्त्री करणे इत्यादी कामे करणारे कारागीर |
| १७ | इतर | टेलर | हाथ व शिलाई मशीन, सुई, धागा कापड, धागे, बटन, कैची इत्यादी चा वापर करून कपडे शिलाई करणारे व ड्रेस शिवणारे कारागीर |
| १८ | इतर | मासे पकडायचे जाळे मेकर | हस्तकला व विविध (Tools) साधनांचा, जाळी दोरी, सुतळी किंवा धागे वापरूनआधुनिक यंत्रसामग्री जाळी विणणे, मासेमारी करणारे , ते मजबूत आहेत याची खात्री करणे आणि मासे आणि इतर पकडण्यासाठी टिकाऊ जाळी विणणे, विशिष्ट डिझाइन आणि आकार गाठणारे कारागीर |
पीएम विश्वकर्मा (Vishwakarma Yojna) योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे.
- सर्वात अगोदर आपला चालू मोबाईल क्रमांक आधारला जोडलेला असावा. (मोबाईल नंबर आधार लिंक असावा).
- आधार कार्ड
- स्वत:ची वैयक्तिक माहिती
- कुटुंबाविषयी माहिती
- पारंपारिक व्यवसाया बद्दल माहिती
पीएम विश्वकर्मा (Vishwakarma Yojna) योजनेसाठी अर्ज कसा करावा.
पीएम विश्वकर्मा योजनेसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो. करिता तों पद्धतीने अर्ज करता येवू शकतो. त्या दोन पद्धती खालीलप्रमाणे आहेत.
- पीएम विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी जवळच्या ग्राहक सेवा केंद्र (Common Service Center) ला आपले आधार कार्ड व आधार लिंक मोबाईलसह प्रत्यक्ष संपर्क साधावा.
- पीएम विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा व माहिती भरा.–
- पीएम विश्वकर्मा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट-https://pmvishwakarma.gov.in/Registration
MoMSME हे योजनेचे नोडल मंत्रालय आहे तसेच संपर्कासाठी ईमेल: dcmsme@nic.in ; दूरध्वनी: ०११-२३०६११७६ असा आहे.
पीएम विश्वकर्मा सुरुवातीला २०२३ ते २०२७ -२८ या पाच वर्षांसाठी लागू केली जाईल
Vishwakarma Yojna- पी.एम. विश्वकर्मा योजने विषयी अधिक महातीसाठी येथे क्लिक करा.
अधिक सरकारी माहिती संदर्भातील आमचे इतर ब्लॉग पाहण्यासाठी खाली लिंक देत आहेत.
प्रधानमंत्री आवास योजने विषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
शेळ्या, मेंढ्या वाटप राज्यस्तरीय योजनेविषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने विषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
