
आज, जागतिक वन्यजीव दिन (World Wildlife Day) साजरा करताना संपूर्ण जग वन्यजीवांच्या संरक्षणासाठी आपल्या जबाबदारीची जाणीव करून घेत आहे. या दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म “X” वर संदेश देत भारताच्या वन्यजीव संरक्षणातील योगदानाचा अभिमान व्यक्त केला. एक व्हिडीओ क्लिप जाहीर करत,
पंतप्रधानांनी आपल्या संदेशात लिहिले, “आज #WorldWildlifeDay च्या निमित्ताने, आपल्या ग्रहाच्या अविश्वसनीय जैवविविधतेच्या संरक्षणासाठी आपली वचनबद्धता पुन्हा व्यक्त करूया. प्रत्येक प्रजातीचा पर्यावरणीय समतोल राखण्यात महत्त्वाचा वाटा असतो—त्यांच्या भविष्याची काळजी घेणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. तसेच, वन्यजीवांच्या संरक्षणासाठी भारताच्या योगदानाचा आम्हाला अभिमान आहे.”
World Wildlife Day निमित्त भारताचे वन्यजीव संरक्षणातील योगदान
भारत हा जैवविविधतेने समृद्ध देश असून येथे 50हून अधिक व्याघ्र प्रकल्प, अनेक नॅशनल पार्क्स आणि अभयारण्ये आहेत. गेल्या काही दशकांत व्याघ्रसंख्या वाढ, हत्ती आणि गेंड्यांचे संरक्षण, तसेच एकशिंगे गेंड्याच्या अवैध शिकारीवर कठोर कारवाई या क्षेत्रांत भारताने उल्लेखनीय कार्य केले आहे.
“प्रोजेक्ट टायगर”, “प्रोजेक्ट एलिफंट” आणि “NAMAMI GANGE” यांसारख्या विविध उपक्रमांद्वारे भारताने वन्यजीवांचे संवर्धन करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
World Wildlife Day प्रत्येकाच्या सहभागाची गरज
जागतिक वन्यजीव दिन हा केवळ सरकारांसाठीच नव्हे, तर सर्व नागरिकांसाठीही प्रेरणादायी असावा. पर्यावरण संवर्धनासाठी झाडे लावणे, प्लास्टिकचा कमीत कमी वापर करणे, नैसर्गिक अधिवास वाचवणे आणि वन्यजीवांवरील अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे—यामुळे आपणही योगदान देऊ शकतो.
निसर्गाच्या रक्षणासाठी पुढे येऊया!
आजच्या दिवशी आपण वन्यजीव आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आपली जबाबदारी लक्षात घेऊया. विश्वातील “प्रत्येक प्रजाती महत्त्वाची आहे” म्हणून त्यांचे संरक्षण करणे म्हणजे भविष्यातील पिढ्यांसाठी एक संपन्न पर्यावरण राखणे हि काळाची गरज झाली आहे !
अधिकृत वेबसाईट साठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
भारताची न्यूझीलंडवर शानदार विजयाने सेमीफायनलमध्ये धडक ! – IND Vs NZ
AIIMS मध्ये नर्सिंग अधिकारी पदभरतीसाठी अर्ज सुरू: NORCET-8 परीक्षेसाठी अर्ज करा!
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत कार्यकारी पदांसाठी भरती: ऑनलाईन अर्ज सुरू! – IPPB
