नवी दिल्ली, प्रतिनिधी : देशभरात चर्चेत असलेल्या Cockroach Janta Party (CJP) या डिजिटल जनआंदोलनाने शनिवारी राजधानी दिल्लीत मोठे आंदोलन आयोजित केले. NEET पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री (Dharmendra Pradhan) धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत हे आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे, प्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही या आंदोलनाला पाठिंबा देत सहभाग नोंदविला. दिल्ली पोलिसांनी आंदोलनासाठी जंतर-मंतर येथे परवानगी दिली असून, सहभागी नागरिकांना थेट आंदोलनस्थळी पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. संसद मार्गाकडे मोर्चा काढण्यास मात्र परवानगी देण्यात आली नव्हती.

CJP संस्थापक अभिजीत दिपके दिल्लीत दाखल
दरम्यान, Cockroach Janta Party (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके हे आंदोलनासाठी दिल्लीत दाखल झाले. दिल्ली विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने समर्थक जमल्याचे पाहायला मिळाले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये दिपके हे हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तक घेऊन विमानतळाबाहेर येताना दिसत आहेत. विमानतळावर पत्रकारांशी बोलताना अभिजीत दिपके यांनी सरकारवर टीका करत म्हटले, “देशातील विद्यार्थी, पालक आणि सामान्य नागरिक किती दिवस भीतीच्या वातावरणात जगणार? शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे.”
“विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न” – सोनम वांगचुक (Sonam Wanghchuk)
लडाखचे सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षण क्षेत्रातील सुधारणा समर्थक सोनम वांगचुक यांनी आंदोलनात सहभागी होत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना पाठिंबा दिला. त्यांनी सांगितले की, देशातील शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास टिकवून ठेवण्यासाठी पारदर्शकता आणि जबाबदारी आवश्यक आहे वांगचुक म्हणाले की, “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवर सरकारने गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. गुणवत्तापूर्ण आणि विश्वासार्ह परीक्षा प्रणाली ही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.”
(Dharmendra Pradhan) धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी
CJP च्या प्रमुख मागण्यांमध्ये केंद्रीय शिक्षणमंत्री (Dharmendra Pradhan) धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी प्रमुख आहे. आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, NEET आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहारांमुळे लाखो विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत झाला आहे. CJP ने केंद्र सरकारकडे स्वतंत्र चौकशी, परीक्षा प्रक्रियेत सुधारणा आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी राजधानीत कडक सुरक्षा व्यवस्था लागू केली. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (IGI Airport), दिल्लीच्या सीमावर्ती भागांमध्ये तसेच संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रशासनाकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष दक्षता घेण्यात आली. जंतर-मंतर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी आणि सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आल्या होत्या.
सोशल मीडियावर CJP आंदोलनाची संमिश्र चर्चा
“Cockroach Janta Party”, “Abhijeet Dipke”, “Dharmendra Pradhan Resignation”, “NEET Paper Leak Protest” आणि “Sonam Wangchuk Delhi Protest” हे हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. आंदोलनाशी संबंधित व्हिडिओ आणि छायाचित्रांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः युवक आणि विद्यार्थ्यांमध्ये या आंदोलनाबाबत मोठी उत्सुकता दिसून येत असून, आगामी काळात शिक्षण क्षेत्रातील सुधारणा आणि परीक्षा व्यवस्थेवरील चर्चेला या आंदोलनामुळे अधिक वेग मिळण्याची शक्यता समाज माध्यमावर व्यक्त केली जात आहे.
तर दुसरीकडे, सोशल मीडियावर CJP शी संबंधित काही असेही व्हिडिओ आणि पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ज्या पोस्टमध्ये CJP चे कथित प्रवक्ते म्हणून समोर आलेल्या लोकांचे Umar Khalid याच्याशी असलेल्या संबंधाचे विविध दावे करण्यात आले आहेत. काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्यांच्या भूतकाळातील वक्तव्यांवर टीका करत त्यांना हिंदुत्वविरोधी किंवा विभाजनवादी विचारसरणीशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच त्यांचे Aam Aadmi Party किंवा इतर राजकीय गटांशी संबंध असल्याचाही दावा काही पोस्टमध्ये करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत नीट पेपरलिक प्रकरणाच्या आडून देशविरोधी आणि सरकार विरोधी शक्तींना मजबूत करण्याचा प्रयत्न असल्याचे समाज माध्यमातून बोलल्या जात आहे.
समाज माध्यमावरील प्रतिक्रियेसाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
