Election 2024- महाराष्ट्र विधानसभा इलेक्शन २०२४ साठी सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघात सध्या एकूण हिंदू मतदारांपुढे खूपच भरकटवणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. वंचित आघाडीकडून सविताताई मुंढे,तर ऐनवेळी अजित पवार गट सोडून गेलेले पूर्वीचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे हे शरद पवार गटाकडून व महाआघाडी कडून लढत आहेत, महायुतीमध्ये एकविचार नसल्याने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कडून कॉंग्रेस मधून आलेले मनोजभाऊ कायंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून डॉ. शशिकांत खेडेकर हे दोन नेते महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून उभे आहेत. त्यामुळे सिंदखेड राजा मतदारसंघातील आमदारकीसाठी लढत अधिकच किचकट होणार आहे. परंतु नेहमीप्रमाणे हिंदू मतांची विभागणी होणार असल्याने केवळ मराठा आणि मुस्लिमांचे मिळणारे एकगठ्ठा मते हे सिंदखेड राजा मतदार संघातील नेत्यांचे आणि एकंदरीत मतदार संघाचे भविष्य ठरविणार आहे.
- सिंदखेड राजा मतदार संघातील नंबर गेम- Election 2024
- जर १०० टक्के मतदान झाले तर ? Election 2024
- हिंदू कधीही एकत्र येवून एकगठ्ठा मतदान करत नाही
- मराठा आणि मुस्लिमांसाठी विकास आणि प्रगती पेक्षा मिळालेल्या आदेशानुसार एका ठिकाणी मतदान करणे जास्त महत्वाचे ?
- औरंग्याच्या कबरेवर फुले चढविणारे लोक जरांगे पाटलांना का मान्य आहेत?
- शेवटी आम्हा हिंदुचेच पानीपत होणार हाच इतिहास आहे
सिंदखेड राजा मतदार संघातील नंबर गेम- Election 2024
सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघात २०११ च्या जनगणने नुसार एकूण ३,१९,२९४ मतदार आहेत. त्यापैकी सर्वात जास्त संख्या ग्रामीण मतदारांची म्हणजे २,७९,५७४ एवढी आहे. जर प्रवर्ग निहाय ,मतदारांची संख्या बघितली तर मतदार संघातील एकूण एस.सी.प्रवर्गातील मतदारांची संख्या ६८,१०५ आहे. एस.टी. प्रवर्गाची संख्या २,६१८ आहे, शहरी भागातील मतदारांची संख्या ३९,७२० एवढी आहे. तर एकूण मुस्लीम मतदारांची संख्या २२,३५१ एवढी आहे. आता हि आकडेवारी २०११ ची आहे आजची परिस्थिती खूप वेगळी आहे. ग्रामीण भागातील पुष्कळ मुस्लीम व ओ.बी.सी. मतदार शहरी भागात वाढले आहेत.तसेच एकूण मतदारसंघात सर्वच प्रवर्गाच्या मतदार संख्येत वाढ झाली आहे. त्यापैकी विशेषकरून मुस्लीम मतदारांची टक्केवारी कमीत कमी ३ ते ५ पटीने वाढलेली आहे. कारण हिंदू हम दो हमारे दो नुसार तर मुस्लीम हम दो हमारे ५ ते १० अशा प्रमाणात मतदार वाढवत आहेत.
जर १०० टक्के मतदान झाले तर ? Election 2024
जर संपूर्ण मतदारसंघात १०० टक्के मतदान झाले आणि जर एस सी प्रवर्गाची मते एकत्रितपणे एकाठिकाणी पडले आणि त्यातही वंचित बहुजन आघाडीला मिळाले तर ६८,१०५ एस सी प्रवर्गाची मते, काही वंजारी मते तर काही अन्य मते मिळून ७५००० मते सविताताई यांना मिळतील असे आपण पकडूयात. किवा जर एस सी मते विखुरली गेली तर मुस्लिमांची २२३१५ सोडून उरलेली २९६९४३ हिंदू मते ही उर्वरित चार मातब्बर नेते श्री डॉ. राजेंद्र शिंगणे, डॉ. शशिकांत खेडेकर आणि मनोजभाऊ कायंदे आणि सविताताई मुंढे यांच्यामध्ये विखुरली जाणार आहेत हे नक्की. जर या २,९६,९४३ हिंदू मतांची सारखी विभागणी झाली तर या चार उमेदवारांना प्रत्येकी ७४२३५ मते मिळू शकतील. जर कमी अधिक वोटिंग झाली तरीही कोणा एकाला ९०००० देखील वोट मिळू शकतील जे कि सद्य परिस्थितीत शक्य वाटत नाही.कारण मागील २०१९ च्या विधानसभा इलेक्शन मध्ये निवडून आलेल्या डॉ. राजेंद्र शिंगणे यांना एकूण ८१७०१ मते मिळाली होती आणि त्यावेळी ६४.४१ टक्के मतदान झाले होते पण येथे आपण १०० टक्के मतदानाची कल्पना करत आहोत त्यामध्ये समजा एखाद्या नेत्याला जर एकहाती ९०००० मते मिळाली तरीही जर मुस्लीम मते त्याच्या विरोधात जात असतील तर तो नेता निवडून कसा येणार, याउलट ९०००० पेक्षा कमी मते म्हणजे दुसर्या क्रमांकाच्या नेत्याला जर ८०००० हिंदूंची मते मिळाली असतील आणि त्याला जर मुस्लिमांची २२००० मते एकगठ्ठा मिळाली तर तो दुसऱ्या क्रमांकाचा नेता २००० मतांनी निवडून येईल, जर हि मुस्लीम मते दोन क्रमांकाच्या नेत्याला न मिळता तीन क्रमांकाच्या नेत्यांना जर मिळाली ज्यांना हिंदूंची ७५००० मते मिळाली आहेत तर त्याची टोटल होईल ७५००० अधिक मुस्लिमांची २२००० एकगठ्ठा मते त्या तिसऱ्या क्रमांकाच्या नेत्याची टोटल होईल ९७००० मते म्हणजेच ज्यांना हिंदूंनी ३ क्रमांकाचा नेता निवडला तो नेता हिंदुनी निवडलेल्या एक क्रमांकाच्या नेत्याला ७००० मतांनी हरवणार आहे. म्हणूनच शेवटी मुस्लिमांची एकगठ्ठा मते ज्याला मिळतील तोच नेता आमदारकीला निवडून येणार हे स्पष्ट गणित आहे. कारण मुळात हिंदू संख्येनुसार १०० टक्के मतदान करत नाहीत परंतु मुस्लीम संख्येनुसार ९० ते ९५ टक्के मतदान करतातच मग त्यांची एकूण होणारी एकगठ्ठा वोटिंग ज्या नेत्याला होणार तो नेता निवडून येणार. कारण जरांगे यांच्या सरकारविरोधी भूमिका मुळे मराठा वोटर सत्तेत असलेल्या नेत्याच्या विरोधात जाऊन मतदान करू शकतात जसे त्यांनी लोकसभेत केले. त्यामुळे मुस्लीम आणी मराठ्यांची एकत्रित मते या निवडणुकीचा निकाल ठरवणार आहे.
हि आकडेवारी झाली १०० टक्के मतदारांची परंतु मतदान १०० टक्के कधीच होत नाही मागच्या २०१९ च्या विधानसभेत एकूण ६४.४१ % मतदान झाले होते. जेवढी मतदानाची टक्केवारी घटेल तेवढीच मुस्लिमांचे ९० ते १०० टक्के एकगठ्ठा मतदानाचे महत्व वाढत जाते.
मुरलेल्या राजकारण्यांना हे माहित असल्याने त्यांनी लोकसभा इलेक्शन २०२४ अगोदर पासूनच तसी फिल्डिंग लावलेली आहे आणि त्याचे परिणाम देख्हील त्यांना मिळालेले आहेत.
त्यांनी हिंदूंना गृहीतच धरून ठेवलेलं आहे. एक हिंदू म्हणून तुमची किंमत ते करत नसतात तर एक मराठा म्हणून, एक महार, एक मांग, एक चांभार, एक वंजारी, अशा अठरा पगड जाती मध्ये तुमच्या वाटण्या ते करत असतात जेणे करून तुम्ही कधीही विकासाच्या मुद्यावर किंवा “हिंदू” या एका संज्ञेखाली एका ठिकाणी येऊन एकत्र मतदान करू नये.
आजपर्यंत भारतातील राजकारण याच धर्तीवर चालू राहिले आहे केवळ २०१४ मध्ये कॉंग्रेस च्या भ्रष्ट सत्तेला कंटाळून हिंदू जागा झाला त्याने एकत्र येऊन एकगठ्ठा मतदान केले म्हणून सत्ता बदलल्या गेली. ज्याचा फायदा देशाला मिळाला आहे. हे सत्य नाकारून चालणार नाही.
जर श्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांना हि मुस्लिमांची पारंपारिक एकगठ्ठा २२,३१५ मते मिळाली तर त्यांची मते ९८,००० अधिक २२००० = १२०००० मते म्हणजे ते २०००० मतांनी निवडून येवू शकतात. जर हीच मुस्लीम मते वंचित आघाडीला मिळाली तर वंचित आघाडीची जीत होऊ शकते. हीच २२००० मते जर एक गठ्ठा राष्ट्रवादीच्या मनोजभाऊ यांना जर मिळाली तर त्यांची काही न काही मताधिक्याने जीत होऊ शकते. हीच एक गठ्ठा मते जर डॉ खेडेकर यांना मिळाली तर ते निवडून येऊ शकतात परंतु मुस्लिमांची हि मते कधीही हिंदुत्ववादी शिवसेनेला जाणार नाहीत हे मात्र खरे.
हिंदू कधीही एकत्र येवून एकगठ्ठा मतदान करत नाही
हिंदुच्या हिताची आणि प्रगती विकासाची कामे करण्याऱ्या नेत्यांना हिंदू कधीही एकत्र येऊन मत्ते देत नाही हीच एक मोठी शोकांतिका आहे.
एस सी समाजाचे एकूण ६८००० मते आहेत परंतु आमच्या पुष्कळ जाती आहेत आणि आमचे नेते देखील पुष्कळ आहेत त्यामुळे आमची ६८००० मते कोण्या एका नेत्याला पडूच शकणार नाहीत आणि जर आम्ही एक झालो एकी करून जर वंचित आघाडीला मतदान केले तरीही आमचे नेते केवळ आमच्या मतांवर निवडून येणार नाहीत तर त्याला साथ लागेल इतर समाजाच्या मतदानाची, एवढी मातब्बर मंडळी उभी असताना ते आपणास मते देणार का ? हा मोठा प्रश्न आहे?
जरांगेची हवा आणि सत्तेविरोधात असलेली भूमिका हि मराठा मतदारांना एक होऊन मतदान करण्यास भाग पाडू शकते जर त्यांनी एकत्रित येऊन सत्तेविरोधात मतदान करण्याचे ठरविले तर हि मते मुस्लीम मते जिकडे जातील तिकडेच जाणार आहेत. परंतु मराठा मतदार हा समजदार आहे. लोकसभेतून बऱ्याच गोष्टी शिकल्या नंतर जर हि मराठा लॉबी एकगठ्ठा मते न टाकता जर वेगवेगळी झाली तर मात्र किती मते कोणाच्या बाजूने जातील त्यावर उमेदवारांचे मताधिक्य ठरणार आहे. मात्र संपूर्ण मतदान प्रक्रियेत जर आपण पहिले तर मुस्लिमांची मिळणारे एकगठ्ठा मते हि आपल्या मतदार संघातील मातब्बर नेत्यांचे व आपले भविष्य ठरविणार आहे.

मराठा आणि मुस्लिमांसाठी विकास आणि प्रगती पेक्षा मिळालेल्या आदेशानुसार एका ठिकाणी मतदान करणे जास्त महत्वाचे ?
लोकसभा इलेक्शन २०२४ च्या निकालांनी आपणास स्पष्ट सांगितले कि विकास आणि प्रगती हे मतदानाचे विषय आपल्यासाठी गौण आहेत तर वरून आलेल्या आदेशानुसार मतदान करणे हेच आपले कर्तव्य समजणारा मुस्लीम समाज आणि आता जरांगेच्या आदेशावरून एकत्रितपणे मतदान करणारा मराठा समाज संपूर्ण मतदारसंघाचे व येथील नेत्यांचे भविष्य ठरवीत आहे.महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी भाजपा आणि शिवसेनेचे उमेदवार पडले तिथे मुस्लीम आणि मराठ्यांची एकगठ्ठा मते त्यासाठी जबाबदार होती. कोणतीही योजना वाईट नसताना आणि केंद्राने आणलेल्या प्रत्येक योजनेचा लाभ सर्वांनी घेऊन देखील लोकांनी सत्तेविरुद्ध मतदान केवळ आदेशावरून केले. हे आपणास लोकसभा इलेक्शन २०२४ च्या निकालात पाहायला मिळालेलेच आहे.
मराठ्यांना सर्वात पहिले एस.ई.बी.सी. आरक्षण फडणवीस सरकारने दिले आणि ते सत्तेत असे पर्यंत हे आरक्षण हाय कोर्ट आणि सुप्रीम कोर्टात देखील टिकले मात्र नंतर सत्ता बदल झाला व कानुनी डावपेच खेळून महाघाडीने हे आरक्षण घालविले. नंतर पुन्हा आरक्षण देण्यासाठी अडीच वर्षे काहीच केले नाही. एवढेच काय तर गेली ७० वर्षे राज्यात व केंद्रात शासन चालविताना देखील मराठा आरक्षण कोणत्याही मराठा नेत्याने दिले नव्हते हेच सत्य आहे. आजही १० टक्के आरक्षण मराठ्यांना लागू आहे तेही एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यांच्या कार्यकाळात. जे आजही टिकून आहे. परंतु जरांगे मराठ्यांना सरळ सरळ फडणवीस आणि बी जे पी शिवसेने विरुद्ध मतदार करायला लावतात आणि मतदार देखील तसेच करतात.हे आपण लोकसभेच्या निकालातून पहिलेच आहे.
लोकांनी १२००० रु वर्षाला प्रधानमंत्री सन्मान निधीचे घेतले, त्यांनी पीकविमा घेतला, त्यांनी अनुदानावर शेती अवजारे घेतली, त्यांनी नुकसान भरपाई घेतली, त्यांनी दवाखाण्याच्या खर्चासाठी ५ लाख रुपये आयुषमान भारत योजनेतून घेतले, टोयलेट घेतले, कोणी घरकुले घेतली, फुकट मिळनारे रेशन घेतले, फुकटात मिळणारी कोरोन लस घेतली, हजारो अशा योजना आणि फायदे सत्तेत असलेल्या लोकांकडून आम्ही घेतले आम्ही रस्ते आणि इतर बऱ्याच योजना घेतल्या. त्या योजना घेणे वाईट नाही किंवा त्या सरकारने देणे म्हणजे आपल्यावर त्यांचे उपकार नाहीत. पण अडचण याची आहे की आम्ही मतदान करताना विकास हा विषय निवडला नाही तर जातिवाद निवडला त्यामुळे मतदान करताना आम्ही आदेशावरून मतदान केले आणि निकाल बदलला. आम्ही कोणाला पाडले, ज्यांनी भारतात होणारे बॉम्बस्फोट बंद केले त्यांना आम्ही पाडले, ज्यांनी ५०० वर्षे तंबूत वाट पाहत बसलेले हिंदूंचे दैवत “प्रभू श्रीराम ” यांना मंदिराच्या गाभार्यात आणले त्यांना आम्ही पाडले, ज्यांनी दिवसरात्र केवळ विकास आणि विकासच करण्याचे ध्येय ठेवले त्यांना आम्ही पाडले, जो नेता आपल्या देशाला जगात वेगळी ओळख देऊन बसला आहे त्याला आम्ही पाडले, जो दिवसतील २४ पैकी २० -२० तास केवळ सर्व सामन्यांसाठी काम, काम आणि कामच करत आहे त्याला आम्ही पाडले. आम्ही महाराष्ट्राला मिळालेला रेल्वेमंत्री पाडला, जगात सर्वात जास्त नोकऱ्या देणारा विभाग म्हणजे भारत सरकाचा रेल्वे विभाग आहे. आज आम्ही पाहतो रेल्वेत सर्वात जास्त लोक हे बंगाली आणी बिहारी आहेत परंतु महाराष्ट्रातील मुले खूप कमी, याचे कारण असे कि कधीच आमच्या महाराष्ट्राच्या वाट्याला रेल्वेमंत्रीपद आले नव्हते. पहिल्यांदा मोदीसरकारने ती संधी रावसाहेब दानवे यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला दिली होती परंतु आपण रेल्वे मंत्री पाडला. त्या रेल्वे मंत्र्यांनी आपल्या महाराष्ट्राची कित्येक मुले रेल्वे भरतीमधून रेल्वे विभागात कायमस्वरूपी केंद्र शासनाच्या नोकरीला लावली असती. मराठी मुलांना काही न काही फायदा आपल्या रेल्वे मंत्र्यांचा आपल्या राज्याला घेता आला असता. नवीन प्रकल्प महाराष्ट्रराज्याला मिळाले असते. आपल्याला हक्काने नवीन नवीन रेल्वे मार्ग महाराष्ट्रात बनवून घेता आले असते परंतु एका आदेशाने हे सर्व बदलेले. तर विचार करा त्या आदेशाने आपले काय वाटोळे केले ? आणि ज्यांना निवडून दिले त्यांना कुठे बसविले आहे तर विरोधी पार्टीमध्ये, आज या लोकसभेत निवडून आलेल्या लोकांना कोणी आरक्षण या मुद्द्यावर विचारत देखील नाहीये. मग जरांगेंचा आरक्षण हा खरोखरच मुख्य मुद्दा आहे का? परंतु आमच्या साठी आदेश महत्वाचा आहे. म्हणून कोणत्याही गोष्टीचा विचार न करता आम्ही मतदान करतो हेच यातून सिद्ध होते.
आता ५ वर्षे विरोधात बसविलेले नेते आपणासाठी काय करणार आहेत्त याचा विचार त्यांना निवडून देणाऱ्यांनी करायला पाहिजे, बर त्यांना काही बोलताही येत नाही कारण ते सत्तेत नाहीत.
औरंग्याच्या कबरेवर फुले चढविणारे लोक जरांगे पाटलांना का मान्य आहेत?
ज्याने ४० दिवस छत्रपती संभाजी राजे यांचा छळ केला, धर्म बदलविण्यासाठी दबाव आणला तरीही राजे मागे हटले नाहीत, तेव्हा राजेंची जीभ कापली गेली, दोन्ही डोळे गरम सळयांनी फोडले गेले, मग हाथ आणी पायाची नखे चिमट्यात घेऊन ओढली गेली, त्यांच्या शरीरावरची चामडी सोलून काढली गेली, त्याच्यावर मीठ चोळले गेले, तरीही राजेंनी हार मानली नाही हे पाहून एका एका दिवसी एकेक हाथ व पायाची बोटे तोडली गेली, नंतर हाथ व पाय छाटल्या गेले, चाळीस दिवस हे अत्याचार सुरु होते. मग छत्रपती संभाजी महाराजांचे शीर धडावेगळे केल्या गेले, तेथेच औरंगजेब थांबला नाही तर त्याने उरलेल्या देहाचे बारीक बारीक तुकडे केले ते तुकडे त्याने इंद्रायणी नदीत फेकून दिले. ज्या औरंगजेबाने स्वत:च्या बापाला मारले, ज्याने स्वत:च्या भावाचा खून केला. ज्याने महाराष्ट्रावर लाखोंचे सैन्य घेऊन हल्ला केला त्याने येथील हिंदू आया बहिणींची अब्रू लुटली त्या औरंग्याच्या कंबरेवर श्री इम्तियाझ जलील आणि अन्य नेते फुले चढवितात आणि इतर नेत्यांना भेट नाकारत जरांगे पाटील त्यांना भेटतात. मग औरंग्याचे चेले जरांगेना का बरे चालतात ? असा प्रश्न कोणी मराठा त्यांना का विचारत नाहीत ? काय जरांगे छत्रपती संभाजीराजे पेक्षा मोठे झाले आहेत का ? आणि त्यावर कळस म्हणजे जे लोक विकास आणि फक्त विकासाच्या नावावर मते मागत आहेत त्यांना पाडायचे आदेश जरांगे देतात तर हे सर्व कशासाठी ?? यावर आमच्या मराठा बांधवांनी मतदान करण्या अगोदर विचार जरूर करावा.
शेवटी आम्हा हिंदुचेच पानीपत होणार हाच इतिहास आहे
भारताचा इतिहास जर बघितला तर आमचे पानिपत आमच्या चुकांमुळेच झालेले आहे.आम्ही कधीही एक होत नाही म्हणून दुसर्यांना तुमचे भाग्य ठरवावे लागते. सिंदखेड राजा मतदार संघात तुम्ही हिंदू २,९३००० मतदार जरी असले तरी संख्येत केवळ २२००० असलेले अल्पसंख्यक मुस्लीम आपल्या नेत्यांचे आणि आपले भाग्य ठरवितात आपण स्वत: नाही. कारण हिंदू मतदार कधीच एकजुटीने आपला नेता ठरवत नाही तो हिंदू म्हणून तो केव्हाच मतदान करत नाही. कारण मतदान करताना तो हिंदू नाही तर कोणी एस.सी., कोणी एस.टी. कोणी मराठा, कोणी कुणबी , कोणी वंजारी म्हणून मतदान करत असतो. हीच परिस्थिती एकंदरीत संपूर्ण राज्यभरात आणि देशभरात आहे.
ज्या दिवशी तुम्ही एक होऊन लाखोच्या संख्येत एका इमानदार आणि विकासाला प्राधान्य देणाऱ्या नेत्याला मोठे कराल तेव्हा तो नेता एवढा शक्तिशाली होईल कि त्याच्या प्रत्येक शब्दाला विधानभवनात मान असेल. तो तुमचा नेता असेल जो केवळ तुमच्यासाठी कार्य करत असेल.
परंत्तू असे होणे शक्य नाही आणि म्हणून सिंदखेड राजा मतदार संघात मराठा आणि मुस्लीम यांचे एकगठ्ठा मतदान उमेदवारांचे भविष्य ठरविणार आहे हे मात्र नक्की !
जरांगे पाटील आणि अन्य मुस्लीम नेत्यांची भेट युटूब व्हिडीओ येथे पहा.
हिंदू संतांच्या विरोधात मुस्लिमांचे मुंबईवर धडक मोर्चा
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
महाराष्ट्राचे “हिंदुहृदयसम्राट” आणि राजकारणातील प्रखर सूर्य : बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thakre)
तुमचे वोट तुमचेच नाही तर तुमच्या येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य ठरविणार आहे ! Maharashtra Election 2024
