(Gaziabad) गाझियाबादमध्ये १७ वर्षीय हिंदू युवकाला बकरी ईद ची कुर्बानी दाखवण्याच्या बहाण्याने नेऊन केली हत्या; तीन आरोपी ताब्यात, मुख्य आरोपीचा एन्काउंटर !

Vishal Patole
By
Vishal Patole
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News...

उत्तर प्रदेशातील Ghaziabad येथील खोडा कॉलनी परिसरात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. १७ वर्षीय सूर्या प्रताप (काही वृत्तांतांमध्ये सूर्या चौहान असेही नाव नमूद) या इयत्ता ११ वीतील विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला करण्यात आला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले असून मुख्य आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २८ मे रोजी दुपारी सूर्या आपल्या मित्रांसह खोडा कॉलनीतील एका ठिकाणी गेला होता. पीडित कुटुंबीय आणि काही प्रत्यक्षदर्शींनी आरोप केला आहे की आरोपींनी त्याला बकरी ईदशी संबंधित गोष्ट दाखवण्याच्या बहाण्याने बोलावले होते. असद व त्याचे सहकारी असे एकूण ५-७ जण अगोदरच त्याची वाट पाहत होते, त्यानंतर त्यांच्यात वाद निर्माण झाला आणि मग आरोपी असदने सूर्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला व तो त्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला. सूर्याला प्रथम स्थानिक रुग्णालयात आणि नंतर नोएडातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Ghaziabad

Ghaziabad मर्डर केसमध्ये तीन दिवसांच्या आत आरोपीचा एन्काउंटर

Ghaziabad मधील 17 वर्षीय सूर्या (Surya Pratap Chauhan) हत्या प्रकरणाने पुन्हा एकदा संपूर्ण परिसरात खळबळ उडवली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आसाद याचा शनिवारी रात्री पोलिस एन्काउंटरमध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खोडा परिसरात तपास आणि नाकाबंदी दरम्यान असद आणि त्याचा साथीदार मोटरसायकलवरून दिसल्यानंतर त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, आरोपीने पोलिसांवर गोळीबार केल्याने प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत तो गंभीर जखमी झाला आणि नंतर रुग्णालयात मृत घोषित करण्यात आला.

हा एन्काउंटर सूर्या हत्या प्रकरणातील तपासासाठी मोठी प्रगती मानली जात आहे. काही दिवसांपूर्वी ईदच्या पार्श्वभूमीवर झालेल्या वादातून सूर्या याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता, ज्यात त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर परिसरात तीव्र तणाव निर्माण झाला असून स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण होते.

या Ghaziabad प्रकरणात पोलिसांनी यापूर्वीच काही आरोपींना अटक केली होती, तर मुख्य आरोपी आसाद फरार होता आणि त्याच्यावर ₹50,000 चे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. एन्काउंटरनंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून पुढील कायदेशीर तपास सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

घटनेनंतर खोडा कॉलनी परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्थानिक नागरिक आणि विविध संघटनांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासन सतर्क आहे. दरम्यान, सोशल मीडियावर या घटनेसंदर्भात विविध दावे आणि सांप्रदायिक रंग देणाऱ्या पोस्ट्स व्हायरल होत आहेत. मात्र, अधिकृत तपास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही निष्कर्षापर्यंत न पोहोचण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून मुख्य आरोपीला अटक झाल्यानंतर हत्येमागील नेमके कारण अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

समाज माध्यमावरील प्रतिक्रियेसाठी येथे क्लिक करा.

आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :

बातमीन्यूज

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
प्रतिक्रिया नाहीत

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत