
उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे घडलेल्या एका थरारक घटनेत भारतीय वायुसेनेने (Indian Airforce -IAF) आपल्या तत्परतेचे आणि व्यावसायिकतेचे उत्कृष्ट उदाहरण पुन्हा एकदा दाखवून दिले. पाण्याच्या उंच टाकीवर अडकलेल्या दोन मुलांची सुटका करण्यासाठी वायुसेनेने तात्काळ कारवाई करत विशेष मोहीम राबवली. मिळालेल्या माहितीनुसार, गोरखपूरमधील एका परिसरात दोन लहान मुले पाण्याच्या टाकीवर चढली होती. मात्र रात्रीच्या वेळी टाकीवर जाणारी शिडी अचानक खराब झाली, त्यामुळे ही मुले खाली उतरू शकली नाहीत आणि ते वरच अडकून पडले. सकाळी ही घटना लक्षात आल्यानंतर स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकांनी प्रयत्न सुरू केले, परंतु टाकीची उंची आणि परिस्थिती लक्षात घेता ही मोहीम आव्हानात्मक ठरत होती. या पार्श्वभूमीवर (Indian Airforce -IAF) भारतीय वायुसेनेच्या Central Air Command कडून तातडीने मदत मागवण्यात आली. वायुसेनेने तत्काळ Mi-17 V5 helicopter हेलिकॉप्टर घटनास्थळी पाठवले. प्रशिक्षित जवानांनी अत्यंत कौशल्याने आणि सावधगिरीने बचावकार्य हाती घेतले. हेलिकॉप्टरच्या सहाय्याने दोन्ही मुलांपर्यंत पोहोचून त्यांना सुरक्षितपणे अगोदर वर हेलीकॉप्टर मध्ये घेऊन नंतर खाली जमिनीवर आणण्यात आले. संपूर्ण मोहीम अतिशय जलदगतीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली. या कारवाईदरम्यान मुलांना कोणतीही इजा झाली नाही, ही दिलासादायक बाब आहे.
या यशस्वी ऑपरेशनमुळे (Indian Airforce -IAF) भारतीय वायुसेनेची आपत्कालीन परिस्थितीतली तत्परता, कौशल्य आणि लोकांच्या सुरक्षेसाठीची बांधिलकी अधोरेखित झाली आहे. स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने वायुसेनेच्या या धाडसी आणि त्वरित मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.ही घटना केवळ बचावकार्याची यशोगाथा नसून, देशाच्या सुरक्षेसोबतच नागरिकांच्या मदतीसाठी सज्ज असलेल्या भारतीय वायुसेनेच्या कार्यक्षमतेचे प्रतीक आहे.
समाज माध्यमावरील प्रतिक्रियेसाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
