पुणे, दि. २९ मे – पुण्यातील हडपसर तसेच पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू (Liquor) सेवनामुळे १२ नागरिकांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून या प्रकरणातील दोषींना कोणतीही दया दाखवली जाणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले आहे. या घटनेची गंभीर दखल घेत त्यांनी प्रशासनाला सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी तसेच स्थानिक प्रशासनाशी तातडीने संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. या प्रकरणाशी संबंधित अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत ८ जणांना अटक करण्यात आली असून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग संयुक्तपणे तपास करत आहेत. संबंधित विषारी दारूचा (Liquor) पुरवठा नेमका कुठून झाला, त्यामागील मुख्य सूत्रधार कोण आहेत, तसेच या अवैध जाळ्यात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. अनेक नागरिकांनी प्रशासनाकडून अवैध (Liquor) दारूविक्रीवर कायमस्वरूपी कठोर कारवाईची मागणी केली आहे. स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करताना सांगितले की, “नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांविरोधात शासन कठोर भूमिका घेणार आहे. कोणत्याही दोषीला पाठीशी घातले जाणार नाही.” राज्य शासनाने या घटनेनंतर राज्यभरातील अवैध मद्यविक्री आणि हातभट्टी दारू निर्मितीविरोधात विशेष मोहीम राबविण्याचे संकेत दिले असून संबंधित विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पुण्यात बनावट (Liquor) दारू प्रकरणानंतर खडबडून जागे झालेल्या महाराष्ट्र पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची कार्यवाही
पुण्यातील विषारी दारू(Liquor) प्रकरणानंतर महाराष्ट्र पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने राज्यभरात अवैध दारूविक्री, हातभट्टी आणि भेसळयुक्त मद्यनिर्मितीविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, रायगड, नवी मुंबई तसेच इतर संवेदनशील भागांमध्ये संयुक्त पथकांकडून धाडसत्र राबवण्यात येत असून अनेक ठिकाणी हातभट्टी उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी संशयित पुरवठादार, वाहतूकदार आणि अवैध दारू (Liquor) अड्ड्यांवर छापे टाकून मोठ्या प्रमाणात गावठी व विदेशी दारू जप्त केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत अनेक आरोपींना अटक करण्यात आली असून मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथके कार्यरत आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हानिहाय विशेष स्क्वॉड तयार करून अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक आणि विक्रीवर लक्ष केंद्रित केले आहे. काही प्रकरणांमध्ये निष्काळजीपणा आढळल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाईही करण्यात आली आहे. राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस अधीक्षकांना सतर्क राहण्याचे आदेश देत अवैध दारूविरोधातील कारवाई आणखी तीव्र करण्याचे निर्देश दिले आहेत
समाज माध्यमावरील प्रतिक्रियेसाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
