नरेंद्र मोदींनी (LNJP Hospital) मध्ये घेतली दिल्ली स्फोटातील जखमींची भेट !

Vishal Patole

दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दिल्लीतील (LNJP Hospital ) एल. एन. जे. पी. रुग्णालयात भेट देऊन स्फोटात जखमी झालेल्या नागरिकांची विचारपूस केली. या भेटीनंतर त्यांनी समाजमाध्यम “X (पूर्वी ट्विटर)” वरून माहिती देत सर्व जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना व्यक्त केली. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “दिल्ली स्फोटातील जखमींना भेटण्यासाठी LNJP रुग्णालयात गेलो. सर्वांच्या लवकर प्रकृतीसाठी प्रार्थना करतो. या कटाच्या मागचे दोषी न्यायालयासमोर आणले जातील.”

LNJP Hospital

Delhi Blast नंतर जखमीना त्वरित LNJP Hospital ला हलवले गेले होते

दिल्लीतील या स्फोटाच्या पार्श्वभूमीवरची माहिती अशी कि, ही घटना राजधानीच्या मध्यभागात घडल्याचे समोर आले आहे. स्फोट इतका जोरदार होता की आसपासच्या परिसरात मोठा गोंधळ उडाला आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुरक्षादलांनी तत्काळ घटनास्थळ गाठून तेथील परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमींना तातडीने जवळच्या (LNJP Hospital) रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर तपास अधिक गतीने सुरू केला आहे. सुरक्षा यंत्रणा आणि तपास यंत्रणा घटनास्थळाचा सखोल तपास करत आहेत. सरकारने संबंधित सर्व संस्थांना चौकशीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश दिले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

या घटनेमुळे दिल्ली तसेच संपूर्ण देशभरात सुरक्षेबाबत सतर्कता वाढवण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या भेटीमुळे जखमी आणि त्यांच्या कुटुंबीयांना धीर मिळाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

प्राथमिक चौकशीतून असे संकेत मिळत आहेत की हा स्फोट पूर्वनियोजित असू शकतो. पोलिसांनी विविध शक्यता तपासण्यास सुरुवात केली असून घटनास्थळावरून काही पुरावे जप्त करण्यात आले आहेत. स्फोटाच्या ठिकाणी फॉरेन्सिक तज्ज्ञांचीदेखील टीम बोलावण्यात आली होती. तपास यंत्रणा स्फोटामागील संभाव्य गट किंवा कटकारस्थान याबाबत सर्वांगीण चौकशी करत आहे.

घटनेनंतर दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार दोन्हीकडून उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. गृह मंत्रालयाने दिल्ली पोलिस आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) यांच्याशी समन्वय साधून तपास प्रक्रियेचा वेग वाढवण्याचे आदेश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली आणि दोषींवर कठोर कारवाई होईल असा विश्वास व्यक्त केला.

पंतप्रधान मोदींच्या समाज माध्यमावरील पोस्टसाठी येथे क्लिक करा.

आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :

बातमीन्यूज.

Delhi Blast : दिल्लीतील लाल किल्ल्याशेजारी भीषण कार स्फोट; आठ ठार, वीसहून अधिक जखमी !

देशात मोठा घातपात घडविण्याचा कट उधळला ! तब्बल २,९०० किलो अमोनियम नायट्रेट हे स्फोटक जप्त !

गर्दी असलेल्या ठिकाणी पाणी पुरवठा आणि मंदिरातील प्रसाद विषबाधित करण्याचा कट रचित असलेल्या ISIS “आयएसआयएस” शी संबंधित तीन संशयितांना गुजरात एटीएस Gujrat Ats ने केली अटक !

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
१ प्रतिक्रिया

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत