मुंबई, ५ डिसेंबर २०२४ – (maharashtra cm) मुंबईतील आझाद मैदानावर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या द्वारे श्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि श्री. अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदासाठी पद व गोपनीयतेची शपथ दिली. शपथविधी कार्यक्रमासाठी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री श्री अमित शाह, उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ, श्री चंद्राबाबू नायडू, श्री नितीन गडकरी, बिहारचे मुख्यमंत्री श्री नितीश कुमार व अन्य मान्यवर तसेच मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रभरातून राजकीय नेते, कार्यकर्ते आणि नागरिक या शपथविधीसाठी उपस्थित होते.
उद्योग जगतातील नामवंत हस्ती जसे कि मुकेश अंबानी व अन्य, क्रिकेट जगतातील सचिन तेंडूलकर व अन्य, हिंदी चित्रपट श्रुष्टीतील श्री शाहरुख खान व अन्य मान्यवर या कार्यक्रमासाठी हजर होते.

(oath ceremony) शपथविधीच्या प्रसंगी महाराष्ट्र भाजपचे वरिष्ठ नेते, शिवसेनेचे पदाधिकारी, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पदाधिकारी तसेच महायुती मध्ये सहभागी अन्य घटकपक्ष तसेच अपक्ष उमेदवारांसह अन्य राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. फडणवीस यांच्या शपथविधीला मोठा उत्साह दिसून आला, आणि सर्वत्र उत्सवाचे वातावरण होते.
सुप्रसिद्ध संगीतकार अजय -अतुल यांच्या संगीताने या शपथविधीची शोभा वाढवली.

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र BJP विधानमंडळ पक्षनेते म्हणून एकमताने निवडले
यागोदर काल दि ४ डिसेंबर २०२४ रोजी भारतीय जनता पार्टीचे (BJP) नेता देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र BJP विधानमंडळ पक्षनेते म्हणून बुधवारी एकमताने निवडले गेले. या निवडीच्या पार्श्वभूमीवर, फडणवीस ५ डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची (maharashtra cm) शपथ घेणार आहेत.
मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव BJP च्या कोअर कमिटीच्या बैठकीत अंतिम करण्यात आले होते. या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. BJP ने महाराष्ट्र विधानमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी यांना केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून नियुक्त केले आहे.
महायुतीने राज्यपालाकडे केला सरकार स्थापनेचा दावा (maharashtra cm)
बुधवारी झालेल्या विधानमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर BJP चे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यासह देवेंद्र फडणवीस, श्री एकनाथ शिंदे, श्री अजित पवार आणि महायुतीचे सर्व भागीदार यांनी ३.३० वाजता राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन राज्यात सरकार स्थापन करण्याचा दावा मांडला आहे. यावेळी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
राज्यातील विविध पक्षांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अपक्ष, जनसुराज्य पक्ष, युवा स्वाभिमान पक्ष यांचा समावेश आहे. भाजपाच्या नेतृत्वाखाली असलेल्या महायुती सरकारला राज्यात सर्वांगीण समर्थन मिळणार असल्याची अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.
(maharashtra cm) फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपाची सरकार स्थापनेसाठीची तयारी अंतिम टप्प्यात आहे, आणि आगामी शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन पर्व सुरू होईल.
सोशल मिडिया वरील प्रत्तीक्रिया
आमचे अन्यब्लॉग:
पुष्पा २: द रूल – २०२४ चा आगामी Action ड्रामा चित्रपट- Pushpa 2
भारतीय कोस्ट गार्ड (ICG) मध्ये नोकरी संधी: सहायक कमांडंट पदासाठी अर्ज करा