आज Mahavir Jayanti. महावीर जयंती हा जैन धर्मियांचा एक प्रमुख उत्सव आहे. जैन धर्मीय मान्यतेनुसार भगवान महावीर यांचा जन्म येशू ख्रिस्त जन्मापूर्वी म्हणजेच इसविसन पूर्व ५९९ अथवा इसवी सन पूर्व ६१५ व्या वर्षी चैत्र शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी झाला होता. या दिवशी जैन धर्मीय बांधव आपला पवित्र सण मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा करतात. आज दि. २१ एप्रिल २०२४ रोजी महावीर जयंती निमित्त नवी दिल्ली येथे महावीर जयंती निमित्त विशेष कार्याक्रमचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास जैन धर्माचे धर्मगुरु व भारताचे जगप्रसिद्ध पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमास शेकडो लोक उपस्थित होते. या कार्यक्रमाची युटूब लिंक ब्लॉगमध्ये खाली दिली आहे.
- भगवान महावीर जन्म – Mahavir Janm (Birth)
- महावीर जन्मवेळी महारणी त्रिशाला यांच्या स्वप्नात भगवान महाविरांच्या जन्माबद्दल आलेली १६ स्वप्नचिन्हे (Bhagwan Mahaveer)
- भगवान महावीर यांचे बालपण- Mahavir/ Vardhaman
- महावीर आणि हत्ती – (Mahavir and Elephant)
- महावीर दीक्षा- Mahavir Diksha
- भगवान महावीरांचे पाच वचन – Mahaveer
- महावीर आणि चंड कौशिक – Mahavir and Chand Kaushik
- सारांश
- भगवान महावीर जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना सोशल मध्यम साईट “x” च्या माध्यमातून दिल्या शुभेच्छा !

भगवान महावीर जन्म – Mahavir Janm (Birth)
भगवान महावीर जन्म भारतातील कुंडग्राम बिहार येथे ख्रिस्त पूर्व 599 वर्षापूर्वी झाला होता सध्या ठिकाण वैशाली बिहारचे वासोकुंड मानले जाते. जैन धर्मियांचे २३ वे तीर्थकार पार्श्वनाथ जी यांना निर्वाण मोक्ष मिळाल्यानंतर १८८ वर्षांनी श्री भगवान महावीर यांचा जन्म झाला. कुंडाग्राम नावाचे एक नगर होतं, येथे सिद्धार्थ नावाचा राजा राज्य करत होता त्यांच्या पत्नीचे नाव होते महाराणी त्रिशाला, त्यांचा एक नंदिवर्धन नावाचा मुलगा होता नंदिवर्धन याच्या जन्मानंतर राणी त्रिशाला यांना वेगळे स्वप्न पडू लागली, तिने आपल्या या स्वप्नांबद्दल राजा सिद्धार्थ यांना सांगितले, राजा सिद्धार्थ यांनी राणीच्या या स्वप्नांचा अर्थ समजण्यासाठी आपल्या राज ज्योतिषीला संपर्क साधला तेव्हा त्याने आपणास अद्वितीय पुत्र रत्न प्राप्त होणार असून तो जगातील कष्ट, दुख याचे निवारण करेल व प्रसिद्धी पावेल. त्यांनतर कालांतराने राणी त्रिशाला गरोदर राहून चैत्र शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले त्याचे नाव त्यांनी “वर्धमान” असे ठेवले. त्याबरोबरच जैन धर्मियांच्या २४ व्या तीर्थांकारांचे पृथ्वीवर अवतरण झाले. जैन ग्रंथानुसार महावीरांच्या (MAHAVIR) जन्मा नंतर देवांचे देव इंद्राने त्यांना सुमेरू पर्वतावर नेलेआणि मुलाला अक्षर सागराच्या पाण्याने अभिषेक केला.

महावीर जन्मवेळी महारणी त्रिशाला यांच्या स्वप्नात भगवान महाविरांच्या जन्माबद्दल आलेली १६ स्वप्नचिन्हे (Bhagwan Mahaveer)
महाराणी त्रिशाला यांना भगवान महावीर यांच्या जन्मा अगोदर वेग वेगळी स्वप्न पडू लागली, हि स्वप्ने म्हणजे भगवान महाविरांबद्दलची १६ चिन्हे होती. ज्यांची अलौकिक असे वेग वेगळे अर्थ होते. हि १६ स्वप्न चिन्हे जैन धर्मात पवित्र समजली जातात.
- पांढरा हत्ती- अद्भुत पुत्ररत्न
- पांढरा बैल– जगातील दुख कमी करून कल्याण करणारा
- कमळावर बसलेल्या लक्ष्मी माता चा अभिषेक करताना दोन हत्ती – देवलोकातील देव सुद्धा त्याचा अभिषेक करतील
- एक सिंह – सिंहासमान बलवान पुत्र
- दोन सुगंधित फुलांचे हार– धर्मतीर्थ स्थापन करणारा व्यक्ती जो जनतेकडून पुजल्या जाईल.
- चंद्र- ज्याच्या जन्माने तिन्ही लोकांमध्ये आनंद पसरेल
- सूर्य- सुर्यासामान तेज आणि पापी प्राण्यांचा उद्धार करणारा
- एक ध्वज- प्रभावशाली मार्गदर्शक
- कमळ फुलांनी भरलेले तलाव- १००८ शुभ लक्षणांनी युक्त असा
- एक स्वर्ग रथ – या जन्माअगोदर जो स्वर्गात देवता असेल
- रत्नांचा संग्रह- अनंत गुणांनीयुक्त असलेला
- धुम्रमुक्त अग्नी- सांसारिक कर्मकांडातून बाहेर पडून मोक्ष (निर्वाण) प्राप्त करेल
- कमळांच्या पानांनी झाकलेले दोन सोन्यानी भरलेले कलश- निधिपती
- सरोवरात पोहोणारी दोन मासे- दुख हरणारा आणि सुख देणारा
- हिरे मोती व रत्न जडित सिंहासन- राज्याचा स्वामी आणि प्रजेचा हितचिंतक
- नागेंद्रचा महाल– त्रिकालदर्शी
भगवान महावीर यांचे बालपण- Mahavir/ Vardhaman
Mahavir/ Vardhaman- वर्धमान लहान पणापासूनच आदर्शवादी होता त्याच्या वडिलांनी ५ वर्षाचे असतांना त्याला गुरुकुलामध्ये शिक्षणासाठी पाठवलं, तिथे त्याने आपल्या बुद्धिमत्तेने ज्ञानवर्धन केलं, खेळत असताना तिथे विषारी साप आला, त्या सापाला पाहून सर्व मुले घाबरली व इकडेतिकडे धावा लागली पळायला लागली, परंतु वर्धमान त्या सापाजवळ गेला त्याने त्या सापाच्या डोक्यावर हळुवार स्पर्श केला त्यानंतर तो साप शांतपणे तिथून निघून गेला, सर्व सर्वमुलांना आज आश्चर्य वाटले, त्यामध्ये एक मुलगा वर्धामानाचा मनोमनी द्वेष करतअसे तो वर्धमाना प्रमाणेच मजबूत आणि उंचपुरा होता, त्या मुलाच्या अंगी अहंकार होता व त्याला वाटायचे कि, मी सर्वश्रेष्ठ आहे, सापाचे असं पळून जाणे जेव्हा त्या अहंकारी मुलाने पाहिले तेव्हा त्याच्या मनात वर्धमानबद्दल राग आला व तो वर्ध्मानाला म्हणू लागला की आता तू माझा मुकाबला कर, व तो मुलगा वर्आधामानला आपल्या खांद्यावर उचलून सैरा वैरा पळू लागला, वर्धमान त्याला थांबण्याची विनंती करू लागला परंतु तो थांबत नव्हता, आणि तो ऐकाय लातयार नव्हता, शेवटी नाईलाजाने वर्धमानने त्या मुलाच्या पाठीवर हाताच्या बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली, तो वर्धमानच्या हाताने बसलेला मार तो मुलगा सहन करू शकला नाहीआणि तो रडायला लागला, शेवटी त्या मुलाने वर्धमानला सोडून दिले, सर्व मुले वर्धमान चा जयजयकार करूलागले, वर्धमान ला तू शूरवीर आहेस असं म्हणू लागले त्याला ते सर्व मुले तू तर महावीर आहेस तू तर बलवान आहेस असे म्हणून गौरव करू लागले, या घटनेनंतर सर्वजन वर्धमानला “महावीर” म्हणू लागले.
महावीर आणि हत्ती – (Mahavir and Elephant)
महावीर गुरुकुल मध्ये मन लावून शिकत होते, गुरु त्याला जीवनाचे मर्म शिकवत होते महावीर प्रत्येक विषयामध्ये अव्वल होता, गुरु त्याच्यापासून आनंदी होते, तो गुरूंचा आवडता विद्यार्थी होता, एकदा आपल्या मित्रांसह महावीर गावामध्ये सैर करताना व फेरफटका मारत असताना त्यांनी बघितले की गावातील लोक इकडेतिकडे सैरा वैरा पळतआहे, मदत मागतआहेत, जीवाच्याआकांताने ओरडत आहेत, थोड्याच वेळात त्यांना एक हत्ती दिसला, तेआपल्या समोर येणारा प्रत्येक वस्तूला पायाखाली चिरडत होता, झाडे पाडत होता झोपड्या तोडत होता, (Mahavir) महावीर चे सर्व मित्र घाबरले परंतु महावीर त्यांना म्हणाला घाबरू नका, काही तरी विलाज करतो, तू त्याचे मित्र त्याला म्हणू लागले की, तो हत्ती तुला चीरडून टाकेल, त्यावर महावीर म्हणाला चिंता करू नका शांत रहा, महावीर हळूहळू चालत जाऊन त्या हत्तीच्या समोर जाऊन उभा राहिला आणि त्याने हळुवारपणे त्या हत्तीच्या सोंडेला स्पर्श केला आणि तो हत्ती अचानक आश्चर्यकारकरित्या अतिशय शांत झाला, त्याने महावीराच्या समोर आपले गुडघे टेकले, हे पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले, सर्वांनी महावीराला धन्यवाद दिला, कारण त्याने त्यांचा जीव आणि घरे वाचवली होती.
महावीर दीक्षा- Mahavir Diksha
कालांतराने महावीर (Mahavir) मोठा झाला तो तरुण झाला सर्व जण त्याला प्रेम करू लागले, परंतु त्याचे मन राजवाड्यामध्ये व राज्यकारभारात लागत नव्हते, जगातील समस्या जसे की माणसामाणसातील सामाजिक व आर्थिक फरक भेदभाव वर्णभेद, श्रीमंत गरीब , भले बुरे, या सर्व बाबतीत तो निरंतर विचार करू लागला आणि मग शेवटी त्याने तपस्वी होण्याचा निर्णय घेतला, आई-वडिलांकडे तपस्वी बनण्यासाठीची आज्ञा घेण्यासाठी व आशीर्वाद घेण्यासाठी तो गेला, जेव्हा त्याने आपला निर्णय आई-वडिलांसमोर ठेवला त्यावेळेस आई-वडिलांनी त्याच्या निर्णयाला समर्थन दिले नाही, महावीरांची आई त्रिशाला खूप दुःखी झाली, आपल्याआईचे दुःख पाहून राजकुमार महावीर यांनी असा निर्णय घेतला की जोपर्यंतआपल्या आई वडील जिवंतआहे तोपर्यंत आपण त्यांची सेवा करायची आहे त्यांना सोडून जायचं नाही, मात्र आई आणि वडिलांच्या मृत्यू नंतर त्याने आपले मोठेभाऊ नंदीवर्धन यांच्याकडून बाहेर पडण्याचा आशीर्वाद मागितला. तो आपला भाऊ नंदीवर्धनला म्हणाला की मी मानव जातीसाठी काहीतरी करू इच्छितो दुःख कष्ट दूर करण्याचा प्रयत्न करण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करेन, नंदीवर्धनला म्हणाला की आताच आई वडील कायमचे सोडून गेलेआणि तू पण सोडून जाण्याचा प्रयत्न करत आहेस, तर कृपा करून नको जाऊ. पण काही काळ उलटून गेल्यावर (Mahavir) महावीराच्या सततच्या प्रयत्नाने नंदीवर्धनने महाविराला तपस्वी बनण्याची परवानगी दिली. त्यावेळी महावीराने आपल्या वाटेला आलेली सर्व धन संपत्ती हि गरीब आणि गरजूलोकांना वाटून टाकली. तो पालखीत बसून जंगलापर्यंत जायला निघाला त्याच्यासोबत सर्व जन त्याच्या मागेजाऊ लागले, तो जंगलाजवळ पोहोचल्यावर त्याने आपल्या अंगावर असलेले सर्व आभूषणे आणि आपल्या अंगातील कपडे आपला मोठा बंधू नंदिवर्धन जवळ सोपवून दिले, त्यानंतर त्याने दीक्षा घेतली व तो अशोक वृक्षाखाली १२ वर्षांची प्रखर तपस्या करण्यासाठी बसला.
भगवान महावीरांचे पाच वचन – Mahaveer
दीक्षा घेतल्याच्यानंतर भगवान महावीराने पाच वचन घेतले
भगवान महावीरांचे (Mahavir) पाच वचन
- अहिंसा
- सत्य
- अपरिग्रह,
- अस्तेय
- ब्रह्मचर्य
महावीर आणि चंड कौशिक – Mahavir and Chand Kaushik
तपस्वी जीवन जगात असतनाच्या भगवान महावीर एका गावातून दुसऱ्या गावालाअनवाणी पायाने पायी प्रवास करत असत, तसेच एके दिवशी ते एका गावाहून दुसऱ्या गावाला जाण्यासाठीते निघाले असतांना, त्यांना रस्त्यात काही ग्रामस्थ भेटले, तेव्हा वर्धमानजींनी त्या ग्रामस्थांना वच्छला गावाला जाण्यासाठीचा मार्ग विचारला, त्यावर ग्रामस्थ मित्रांनी सांगितले वच्छला गावाला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत, बाहेरचा रस्ता जो प्रवास करण्यासाठी सुरक्षित परंतू तो खूप लांब रस्ताआहे, दुसरा रस्ता जंगलातून जातो, तो रस्ता लहान आहे परंतु तो अत्यंत असुरक्षित आहे. या जंगलामध्ये चंड कौशिक नावाचा अत्यंत भयानक साप राहत होता, भगवान महावीर (Mahavir) निर्भय होते त्यांनी जंगलाच्या रस्त्यातून जाण्याचा निर्णय घेतलात्यावर ग्रामस्थ आश्चर्यकारक झाले व ते त्यांना विनंती करू लागले की जंगलातील रस्त्याने त्यांनी जाऊ नये कारण त्या रस्त्याने जीवास धोका आहे. परंतु भगवान महावीर त्यांना म्हणाले की चिंता करू नका सर्वकाही ठीक होईल. त्यांनी ग्रामस्थांना धन्यवाद म्हटलं आणि तेथे निघून गेले. ग्रामस्थम्हणाला की महिविरांना काय आपल्या जीवनावर प्रेम नाही का? जात असताना महावीरांना एका झाडावरती साप बसलेला दिसला, सापाने महावीरांनाआपल्याकडे येताना पाहिले आणि तो म्हणाला. ही माझी जमीन आहे , येथे पाऊल ठेवण्याची तुझी हिम्मत कशी झाली ? मग तो झाडावरून उतरून भगवान महावीरांच्या समोर आला, सापाने बघितले इतर लोकांसारखा हा व्यक्ती आपल्याला घाबरून पळत नाहीये, मग तो झाडावरून उतरून खाली आला तो महावीरांच्या अतिशय जवळ आला तरीही महावीर स्थितप्रज्ञ होते, तेव्हा सापाला राग आला व त्याने महावीरांच्या पायावर दंश केला, परंतु त्या दंशाचा महावीरांवर कोणताही परिणाम झाला नाही, परंतु साप महावीरांना आश्चर्याने पाहत उभा होता कि ते अजूनही कोणतीही हालचाल न करता स्थिर उभे आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर कोणताही राग नाही उलट चेहऱ्यावर फक्त करुणामय भाव होते, मग त्याने पहिले कि, महावीरांच्या पायातून रक्त येण्या ऐवजी महावीरांच्या पायातून दूध वाहायला लागले, आणि आपल्या जागेवर ते स्थिर उभे होते,त्यांनी प्रेमाने सापाकडेब घितले, भगवान महावीर (Mahavir) सापाला म्हणाले, कौशिक शांत हो, या रागाच्या निद्रेतून बाहेर ये. महावीरांचे करुणामय शब्द ऐकून कौशिक शांत झाला, आपलापूर्वीचा जीवन काळ आठवू लागला, राग आणि अहंकार या दुर्गुणांनी आपले जीवन कसे ध्वस्त केलं आहे हे त्याला दिसून येवू लागले, भगवान महावीरासमोरआपले शिर सापाने झुकवले, तो नतमस्तक झाला आणि शांती पूर्ण पद्धतीने तो आपल्या झाडावर निघून गेला व त्यानंतर त्याने निश्चय केला की तो आता कोणालाही त्रास देणार नाही.
सारांश
भगवान महावीर हे जैन धर्मियांचे २४ वे तिर्थंकार होते, त्यांनी दिलेली शिकवण जसे कि सत्य, अहिंसा, अपरिग्रह, अस्तेय, ब्रम्हचर्य इत्यादी चा अवलंब सर्व सामान्य व्यक्तीने अथवा समाजाने आपल्या जीवनात अंगीकारल्यास जीवन उच्चतम पातळीवर पोहोचू शकते आणि विशेष म्हणजे आजच्या परिस्थितीत जैन धर्मीय जेव्हा आम्हास समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या आदरयुक्त भूमिका निभावताना दिसतात तेव्हा जीवनात सर्वोच्चतम, सर्वोत्कृष्ट मिळविण्यासाठी आणि आजच्या जागतिक स्तरावरीलअत्यंत स्फोटक वातावरणात मानवीय अस्तीत्वाला धोका निर्माण झालेला दिसत असताना भगवान महावीरांच्या (Mahavir) विचारांना व भगवान गौतम बुद्ध यांच्या तत्वज्ञानाला आत्मसात करणे किती आवश्यक आहे ते कळून येते.
भगवान महावीर जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना सोशल मध्यम साईट “x” च्या माध्यमातून दिल्या शुभेच्छा !
आमच्या अन्य धर्म विषयक ब्लॉगसाठी येथे क्लिक करा.
आज भगवान महावीरांच्या जयंती निमित्त दिल्लीत आयोजित कार्यक्रमाची लिंक.
आमच्या अन्य ब्लॉगपोस्ट:-
