Narendra Modi यांच्या इटली दौऱ्यातील एका छोट्याशा भेटवस्तूने सोशल मीडियावर मोठी चर्चा निर्माण केली आहे. इटलीच्या पंतप्रधान Giorgia Meloni यांना पंतप्रधान मोदी यांनी भारतीय (Melodi) ‘मेलोडी’ टॉफी भेट दिल्यानंतर या टॉफीची जगभर चर्चा सुरू झाली. मेलोनी यांनी स्वतः हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि काही तासांतच तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. भारतीय संस्कृती, मैत्री आणि हलक्याफुलक्या राजनैतिक शैलीचा हा अनोखा नमुना म्हणून या घटनेकडे पाहिले जात आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर “Melodi diplomacy” आणि “Why Melodi is so popular?” अशा अनेक मजेशीर प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. अनेकांनी “मेलोडी इतकी चॉकलेटी का आहे?” या जुन्या जाहिरातीची आठवण काढत मीम्स आणि पोस्ट्स शेअर केल्या. भारतातील सर्वसामान्यांना परिचित असलेली ही टॉफी अचानक आंतरराष्ट्रीय चर्चेचा विषय बनली. या चर्चेचा परिणाम शेअर बाजारातही पाहायला मिळाल्याची चर्चा रंगली. ‘मेलोडी’ या नावाशी साधर्म्य असलेल्या काही कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांची उत्सुकता वाढल्याचे सोशल मीडियावर सांगितले गेले. जरी त्याचा प्रत्यक्ष व्यावसायिक संबंध नसला तरी “Melodi effect” हा शब्द इंटरनेटवर ट्रेंड झाला. अनेकांनी याला सोशल मीडिया आणि ब्रँड व्हिजिबिलिटीची ताकद असे संबोधले.

Melodi नंतर केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री Piyush Goyal यांची पोस्ट
दरम्यान, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री Piyush Goyal यांनीही या चर्चेत सहभागी होत भारताच्या प्रगतीची माहिती दिली. त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले, “India’s TOFFEE TALE would surely be melody to the ears! Exports have grown nearly 166% since 2013-14.” म्हणजेच भारताच्या मिठाई आणि टॉफी उद्योगातील निर्यातीत २०१३-१४ पासून तब्बल १६६ टक्क्यांनी वाढ झाल्याचे त्यांनी नमूद केले.
गोयल यांच्या पोस्टमधून भारताच्या खाद्यप्रक्रिया आणि कन्फेक्शनरी उद्योगाची जागतिक पातळीवरील वाढ अधोरेखित झाली. भारतीय उत्पादने आता केवळ देशांतर्गतच नव्हे तर जागतिक बाजारातही आपली वेगळी ओळख निर्माण करत असल्याचे त्यांनी सूचित केले. “लोकल टू ग्लोबल” या संकल्पनेला या घटनेमुळे आणखी बळ मिळाल्याचे मानले जात आहे.
तज्ज्ञांच्या मते, राजनैतिक भेटींमध्ये अशा सांस्कृतिक आणि भावनिक प्रतीकांचा वापर केल्याने देशांमधील मैत्री अधिक दृढ होते. पंतप्रधान मोदी यांनी दिलेली साधी ‘मेलोडी’ टॉफी आता भारत-इटली मैत्रीचे एक वेगळे प्रतीक बनली आहे. सोशल मीडिया, ब्रँडिंग आणि आंतरराष्ट्रीय संबंध यांचा अनोखा संगम या घटनेतून पाहायला मिळत असल्याची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे.
Narendra Modi आणि Giorgia Meloni यांच्या वाढत्या मैत्रीला सोशल मीडियावर आता “Melodi” नवे नाव
Narendra Modi आणि Giorgia Meloni यांच्या वाढत्या मैत्रीला सोशल मीडियावर आता “Melodi” हे नवे नाव मिळाले आहे. मेलोनी आणि मोदी यांच्या नावांतील “Melo” आणि “di” एकत्र करून तयार झालेला हा शब्द इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला आहे. दोन्ही नेत्यांमधील मैत्रीपूर्ण संवाद, एकत्रित फोटो, व्हिडिओ आणि सार्वजनिक कार्यक्रमांतील सहज वागणूक यामुळे “Melodi” हा शब्द भारत-इटली संबंधांचे प्रतीक बनला आहे. विशेषतः G20 परिषदांपासून सुरू झालेली ही सोशल मीडिया चर्चा आता राजनैतिक संबंधांबरोबरच जनतेच्या चर्चेचाही विषय ठरली आहे. अनेक नेटकऱ्यांनी “Melodi diplomacy” असे म्हणत या मैत्रीचे कौतुक केले असून, दोन्ही देशांतील संबंध अधिक मजबूत होत असल्याचेही यातून अधोरेखित होत आहे.
समाज माध्यमावरील प्रतिक्रियेसाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
