MPSC Group C Mains – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Public Service Commission) महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025 संदर्भातील महत्त्वाची जाहिरात प्रसिद्ध केली असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ आयोजित करण्यात येणार असून, राज्य शासनाच्या सेवांमधील विविध गट-क संवर्गातील पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. आयोगाने जाहिरात क्रमांक १४/२०२६ अंतर्गत ही भरती प्रक्रिया जाहीर केली असून, यापूर्वी संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी पार पडली होती. शासनाकडून प्राप्त अतिरिक्त व सुधारित मागणीपत्रांनुसार काही नवीन पदांचा समावेश करण्यात आला असून, त्यासाठी २५ मार्च, २१ एप्रिल आणि ३० एप्रिल २०२६ रोजी शुद्धिपत्रके प्रसिद्ध करण्यात आली होती. पूर्व परीक्षेचा निकाल ०४ मे २०२६ रोजी जाहीर करण्यात आला असून, पात्र उमेदवारांसाठी मुख्य परीक्षा रविवार, दिनांक १२ जुलै २०२६ रोजी अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे या जिल्हा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे.
पात्र उमेदवारांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना संवर्गनिहाय पात्रता तपासून अर्ज करावा लागणार आहे. तसेच लिपिक-टंकलेखक पदांसाठी नियुक्ती प्राधिकरणानुसार पसंतीक्रम देणे बंधनकारक असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.जाहिरातीनुसार, उमेदवारांनी ऑनलाइन प्रणालीमध्ये लॉगिन करून संबंधित जाहिरातीसमोरील “View” बटणावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर “Check Eligibility” पर्यायाद्वारे उमेदवार कोणत्या संवर्गासाठी पात्र आहे हे दिसणार आहे. पात्र संवर्गासमोरील चेक बॉक्स निवडून अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.विशेष म्हणजे, लिपिक-टंकलेखक संवर्गासाठी उमेदवारांना नियुक्ती प्राधिकरणानुसार पसंतीक्रम देणे आवश्यक आहे. उमेदवार ज्या क्रमाने पसंती देईल, त्याच क्रमाने नियुक्ती प्रक्रियेत विचार केला जाणार आहे. आयोगाने यासाठी “Review” पर्याय उपलब्ध करून दिला असून अर्ज अंतिम सबमिट करण्यापूर्वी पसंतीक्रम तपासण्याची सुविधा देण्यात आली आहे.

MPSC Group C : पदनिहाय रिक्त जागांचा तपशील
| पद क्रमांक | पदाचे नाव | विभाग | पद संख्या |
|---|---|---|---|
| 1 | उद्योग निरीक्षक | उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग | 09 |
| 2 | कर सहायक | वित्त विभाग | 73 |
| 3 | तांत्रिक सहायक | वित्त विभाग | 04 |
| 4 | लिपिक-टंकलेखक | शासनाचे विविध विभाग | 1673 |
| एकूण | 1884 |
MPSC Group C Mains : पात्रता
शैक्षणिक पात्रता
उद्योग निरीक्षक:
सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा अथवा विज्ञान शाखेतील पदवी आवश्यक आहे.
कर सहायक:
उमेदवार पदवीधर असणे आवश्यक असून मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट गती आवश्यक आहे.
तांत्रिक सहायक:
कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.
लिपिक-टंकलेखक:
पदवीधर उमेदवारांसाठी संधी असून मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट आवश्यक आहे.
MPSC Group C Mains : वयोमर्यादा
01 फेब्रुवारी 2026 रोजी उमेदवारांचे वय खालीलप्रमाणे असावे:
- उद्योग निरीक्षक: 19 ते 38 वर्षे
- कर सहायक: 18 ते 38 वर्षे
- तांत्रिक सहायक: 19 ते 38 वर्षे
- लिपिक-टंकलेखक: 19 ते 38 वर्षे
मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथ उमेदवारांना 5 वर्षांची वयोमर्यादा सवलत देण्यात आली आहे.
परीक्षा शुल्क
- खुला प्रवर्ग: ₹544/-
- मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ: ₹344/-
परीक्षा केंद्रे
मुख्य परीक्षा अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे.
MPSC Group C Mains : अर्ज प्रक्रिया व महत्त्वाच्या तारखा
उमेदवारांना अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावा लागणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 04 जून 2026 निश्चित करण्यात आली आहे. तर पूर्व परीक्षा 12 जुलै 2026 रोजी घेण्यात येणार आहे.
राज्यातील हजारो स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी ही भरती अत्यंत महत्त्वाची मानली जात असून सरकारी सेवेत प्रवेश मिळवण्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आयोगाने उमेदवारांना 25 मार्च 2026 आणि 30 एप्रिल 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या शुद्धीपत्रकांचा देखील संदर्भ घेण्याचे आवाहन केले आहे. नियुक्ती प्राधिकरणांची यादी आणि इतर सुधारित माहिती लक्षात घेऊनच पसंतीक्रम निश्चित करावा, असे सूचविण्यात आले आहे.
याशिवाय, जाहिरातीत विविध दिव्यांग प्रवर्गांसाठी पात्रता व आरक्षणासंबंधी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यात Blind, Low Vision, Deaf, Hard of Hearing, One Arm, Both Arm, Cerebral Palsy, Autism Spectrum Disorder, Specific Learning Disability, Mental Illness यांसारख्या विविध दिव्यांग श्रेणींचा समावेश करण्यात आला आहे.
उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचूनच परीक्षा शुल्क भरावे आणि अर्ज अंतिमरित्या सबमिट करावा, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. राज्यभरातील हजारो उमेदवार या मुख्य परीक्षेकडे लक्ष ठेवून असून, या भरती प्रक्रियेमुळे सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
अधिकृत वेबसाईट साठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
