अग्रवाल (Murder Case) मर्डर केस: आरोपी सियाचे पोलिसांसमोर धक्कादायक विधान; लग्न नकोसे वाटण्यामागे ही होती कारणे? आरोपींचे परस्परविरोधी जबाब, पोलिसांकडे डिजिटल पुराव्यांचा भक्कम आधार; फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालणार !

Vishal Patole
By
Vishal Patole
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News...

पुणे, दि. 26 जून : पुण्यातील व्यावसायिक केतन विशाल अग्रवाल यांच्या गाजलेल्या (Murder Case) हत्या प्रकरणात तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. सुरुवातीला अपघाती मृत्यू वाटणाऱ्या या घटनेने आता नियोजित हत्येचे स्वरूप धारण केले असून, पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून मिळालेली माहिती, डिजिटल पुरावे आणि फॉरेन्सिक तपासामुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. चौकशीत आणखी धक्कादायक दावे समोर येत आहेत, पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान मुख्य आरोपी सिया गोयल हिने केतन अग्रवालबाबत काही धक्कादायक दावे केल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सियाने सांगितले की केतन डोक्यावर केस कमी असल्यामुळे तो डोक्यावर हेअर पॅच (डुप्लिकेट केस) वापरत होता. तसेच तो बोलताना अडखळत असल्याने त्याच्याबद्दल आपल्याला चीड निर्माण झाली होती आणि त्यामुळे आपण त्याच्याशी लग्न करण्यास इच्छुक नव्हतो, असा दावा तिने चौकशीत केल्याचे वृत्त आहे. दरम्यान, केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत, सियाच्या कुटुंबाला केतन हेअर पॅच वापरत असल्याची माहिती आधीपासूनच होती, त्यामुळे आता हा मुद्दा पुढे करणे हा केवळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. या सर्व दाव्यांची सत्यता तपासाअंती आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे.

Murder Case

केतन अग्रवाल Murder Case मध्ये वडील विशाल अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट

दरम्यान, केतन अग्रवाल (Murder Case) हत्या प्रकरणात मुलाला लवकरात लवकर न्याय मिळावा, या मागणीसाठी केतन यांचे वडील विशाल अग्रवाल यांनी शुक्रवारी पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतांना या प्रकरणाचा खटला जलदगतीने चालविण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना करण्याची तसेच देशातील ज्येष्ठ फौजदारी विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील (Special Public Prosecutor) म्हणून नियुक्ती करण्याची मागणी केली. मुख्यमंत्री कार्यालयाने (CMO) दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन कोणतीही कसर सोडणार नसल्याचे स्पष्ट आश्वासन दिले. दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी सर्व आवश्यक कायदेशीर आणि प्रशासकीय पावले उचलली जातील, असे त्यांनी सांगितले. तसेच, फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याची मागणी तात्काळ मान्य करत विधी व न्याय विभागाच्या सचिवांना आवश्यक निर्देश देण्यात आले. याचबरोबर, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांनीही या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून काम करण्यास संमती दिल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली. त्यामुळे राज्य सरकारने या गाजलेल्या प्रकरणात जलद आणि प्रभावी न्यायप्रक्रियेसाठी ठोस पावले उचलण्यास सुरुवात केल्याचे स्पष्ट झाले आहे.

केतन अग्रवाल Murder Case : सुरुवातीला अपघात, नंतर समोर आला हत्येचा संशय

केतन अग्रवाल यांच्या मृत्यूनंतर सुरुवातीला ही घटना अपघात असल्याचे मानले जात होते. मात्र तपासादरम्यान मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल डेटा, कॉल रेकॉर्ड आणि इतर डिजिटल पुराव्यांच्या आधारे पुणे ग्रामीण पोलिसांनी हा मृत्यू पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचा संशय व्यक्त केला. त्यानंतर केतन यांची मैत्रीण सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली.

आरोपींचे परस्परविरोधी जबाब

पोलिस कोठडीत केतन अग्रवाल (Murder Case) चौकशीदरम्यान दोन्ही आरोपी एकमेकांवर जबाब ढकलत असल्याचे समोर आले आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, सिया गोयलने पोलिसांना दिलेल्या प्राथमिक जबाबात संपूर्ण कट चेतन चौधरीने रचल्याचा दावा केला आहे. त्यानेच आपल्यावर दबाव आणल्याचेही तिने सांगितल्याचे समोर आले आहे. मात्र अंतिम क्षणी नेमका धक्का कोणी दिला, याबाबत तिच्या जबाबात विसंगती आढळल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे.

दुसरीकडे, चेतन चौधरीने पोलिसांसमोर संपूर्ण योजना सिया गोयलचीच असल्याचा दावा केला आहे. सियानेच योग्य वेळ आणि ठिकाण निश्चित केले असून आपण केवळ तिच्यासोबत असल्याचे त्याने सांगितले आहे.

त्यामुळे दोन्ही आरोपी एकमेकांवर दोषारोप करत असले तरी तपास यंत्रणा उपलब्ध पुराव्यांच्या आधारे सत्य पडताळत आहेत.

केतन अग्रवाल (Murder Case) मध्ये पोलिसांकडे कोणते आहेत महत्त्वाचे पुरावे?

केतन अग्रवाल (Murder Case) या प्रकरणातील डिजिटल तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. पोलिसांच्या तपासानुसार आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यात सुमारे २,००४ फोन कॉल्स झाले होते. या दोघांमध्ये जवळपास २३८ तासांहून अधिक काळ संभाषण झाल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय आरोपींच्या मोबाईलमधून “एखाद्याचा खून कसा करावा”, अशा स्वरूपाचे इंटरनेट सर्च केल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे. घटनेच्या आदल्या दिवशी दोघे पुण्यातील एका कॅफेमध्ये भेटल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून, त्या भेटीत लोहगड परिसरातील व्हिडिओ पाहून अंतिम योजना ठरवल्याचा तपासाचा दावा आहे.

सीक्रेट सिग्नल”चीही चर्चा

केतन अग्रवाल (Murder Case) तपासादरम्यान पोलिसांनी आणखी एक महत्त्वाचा दावा केला आहे. आरोपींनी आधीच एक गुप्त संकेत (Secret Signal) निश्चित केला होता. सिया गोयलने ठराविक हालचाल किंवा इशारा केल्यानंतर चेतन चौधरीने कारवाई करायची, अशी योजना असल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र केतन अग्रवाल यांना अंतिम धक्का नेमका कोणी दिला, याबाबत अद्याप निश्चित निष्कर्ष समोर आलेला नाही. या संदर्भात फॉरेन्सिक अहवाल आणि इतर वैज्ञानिक पुराव्यांची पडताळणी सुरू आहे.

याआधीही खुनाचे प्रयत्न?

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, ही घटना अचानक घडलेली नसून यापूर्वीही केतन अग्रवाल यांना संपविण्याचे प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या दाव्यानुसार, ३१ मे रोजी पहिला प्रयत्न झाला होता. त्यावेळी केतन बचावले. त्यानंतर परिस्थिती झाकण्यासाठी “साप दिसला” असे सांगण्यात आल्याचा तपासातील दावा आहे. यानंतर ४ जून आणि १४ जून रोजीही प्रयत्न झाल्याची माहिती तपासातून समोर आली असून, अखेर १८ जून रोजी ही घटना घडल्याचा पोलिसांचा दावा आहे.

केतन अग्रवाल (Murder Case) : मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

दरम्यान, शुक्रवारी केतन अग्रवाल यांचे वडील विशाल अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात भेट घेतली. मुलाला लवकर न्याय मिळावा म्हणून त्यांनी फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालविण्याची तसेच ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याची मागणी केली. मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री फडणवीस यांनी या दोन्ही मागण्या तत्काळ मान्य करत संबंधित विभागाला आवश्यक निर्देश दिले आहेत. तसेच या प्रकरणातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी शासन कोणतीही कसर सोडणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

तपास अजूनही सुरू

केतन अग्रवाल (Murder Case) या प्रकरणातील अनेक महत्त्वाचे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. अंतिम धक्का नेमका कोणी दिला? या कटाचा मुख्य सूत्रधार कोण होता? या कटाची माहिती आणखी कोणाला होती का? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी पोलिसांकडून डिजिटल पुरावे, कॉल रेकॉर्ड, सीसीटीव्ही फुटेज आणि फॉरेन्सिक अहवालांची सखोल तपासणी सुरू आहे. दरम्यान, सोशल मीडियावर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याच्या विविध अफवा पसरत असल्या तरी पोलिसांनी अधिकृतरीत्या अशी कोणतीही संपूर्ण कबुली दिल्याचे जाहीर केलेले नाही. उपलब्ध माहितीनुसार दोन्ही आरोपी एकमेकांवर दोषारोप करत असून, तपास यंत्रणा वैज्ञानिक आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे संपूर्ण सत्य न्यायालयासमोर मांडण्याच्या तयारीत आहेत.

समाज माध्यमावरील प्रतिक्रियेसाठी येथे क्लिक करा.

आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :

बातमीन्यूज

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
प्रतिक्रिया नाहीत

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत