Narak Chaturdashi-2024- नरक चतुर्दशी हा सण कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला साजरा केला जातो. नरक चतुर्दशीला “काळ चतुर्दशी” तसेच “छोटी दिवाळी” असेही म्हणतात. हा सण मुख्यतः दिवाळी सणाच्या आठवड्यात साजरा केला जातो.”नरक चतुर्दशी” हा संस्कृत शब्द आहे, ज्याचा अर्थ असा होतो कि, “नरक” म्हणजे “मृतांचे निवासस्थान” किंवा “नरक” आणि “चतुर्दशी” म्हणजे “चौदावा” (चंद्राच्या काळातील -कृष्ण पक्षातील चौदावा दिवस).हिंदू पंचांगानुसार नरक चतुर्दशी हा कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चौदावा दिवस आहे. या दिवशी भगवान कृष्णाने , सत्यभामेच्या हातून नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जाचातून मुक्त केले यामुळे या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. भक्तजन या दिवशी पूजा, उपासना आणि दीप प्रज्वलित करून या घटनांची स्मृती करतात, जेणेकरून चांगल्याच्या विजयाचे आणि दुष्टतेच्या पराभवाचे स्मरण होईल. याच दिवसाला यमदिपदान देखील केले जाते, “यमदिपदान” याचा अर्थ “यम” म्हणजे यमराज, जो मृत्यूचा देव आहे त्याला “दिपदान” म्हणजे दीपकाचे दान केले जाते. असे करणे म्हणजे पितरांच्या आत्म्यांच्या शांतीसाठी आणि त्यांना नरकातील दुःखातून मुक्त करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे मानले जाते. यामध्ये आपणास श्रद्धा आणि भक्ति यांचे मिश्रण दिसून येते.तसेच नरक चतुर्दशीच्या दिवशी भक्तजन घरातील “अलक्ष्मीला” हटविण्यासाठी लक्ष्मीमातेची पूजा व उपासना करतात. या सणाचे सांस्कृतिक महत्व देखील आहे कारण या दिवशी कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येतात, दीपकांची सजावट करतात, आणि एकमेकांना भेटून शुभेच्छा देतात. या दिवशी अनेक ठिकाणी विविध उत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले जातात.

अलक्ष्मी ला शक्तिहीन करण्यासाठी लक्ष्मीमातेची पूजा-Narak Chaturdashi-2024
Narak Chaturdashi-2024- हिंदू धर्मात समृद्धीच्या आणि समृद्ध जीवनाच्या विरोधात मानली गेलेली “अलक्ष्मी” ही एक शक्ती आहे. अलक्ष्मीला ‘अभाव’, ‘कष्ट’ आणि ‘दुःख यांचे प्रतीक मानले गेले आहे. जिचा उल्लेख पौराणिक कथेत येतो. म्हणून नरकचतुर्दशी या दिवशी या “अलक्ष्मी” ला हटवण्यासाठी भक्तजन सकाळी उठल्यावर, विशेषत: ताज्या पाण्यात स्नान करतात. स्नानानंतर, “लक्ष्मी मातेचे” जी कि, धन, समृद्धी, आणि ऐश्वर्याची देवी आहे तिची पूजा अर्चना केली जाते.

नरकचतुर्दशी संदर्भातील पौराणिक कथा -Narak Chaturdashi-2024
Narak Chaturdashi 2024 – नरक चतुर्दशी या सणाशी संबंधित नरकासुरवधाची आख्यायिका पौराणिक कथेत प्रचलित आहे. या दिवशी कृष्णाने सत्यभामेच्या मदतीने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलुमी राजवटीतून सोडवले. कारण नरकासुराने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले व अवध्यत्वाचा म्हणजेच कोणत्याही नराकडून त्याचा वध होणार नाही असा वर मागून घेतला. त्या वराचा त्याने अत्यंत चुकीचा उपयोग करत अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व त्या राज्यांतील स्त्रियांचे अपहरण केले. अशाप्रकारे नरकासुराने एकूण १६,१०० स्त्रियांना पळवून नेले व मणिपर्वतावर एक नगर तयार करून त्यात त्यांना बंदी बनवून ठेवले. त्याने अगणित संपत्ती लुटली व याच हव्यासापोटी त्याने देवमाता अदितीची कुंडले व वरुणाचे विशाल छ्त्रही लुटले. त्याला मिळालेल्या वरामुळे तो देव, गंधर्व व मानवांना त्रासदायक झाला होता. प्राग्ज्योतिषपूर हे अनेक गिरिदुर्गांनी वेढलेले नगर त्याची राजधानी होती. ही राजधानी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या खंदकांनी, अग्नी आणि पाण्याने वेढलेली होती. या दुर्जय राजधानीवर कृष्णाने सत्यभामा यांच्यासह गरुडावर स्वार होऊन आश्विन कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी आक्रमण केले. घनघोर युद्ध सुरु झाले त्यामध्ये नरकासुराच्या त्रिशुळाच्या हमल्याने “श्रीकृष्ण” मूर्च्छीत झाले व मग श्रीकृष्णांची पत्नी सत्यभामा यांनी नरकासुराच्या देहाचे दोन तुकडे करत त्याचा वध केला. नरकासुरवधाने देव, गंधर्व तसेच प्रजेला आनंद झाला. परंतु या युद्धानंतर एक नवीन समस्या निर्माण झाली कारण नरकासुराच्या बंदिवासातील कुमारिकांना त्यांचे स्वजन स्वीकारावयास तयार झाले नाहीत, हे जाणून कृष्णाने या स्त्रियांना समाजात मनाचे स्थान प्राप्त करून देण्यासाठी १६,१०० स्त्रियांसोबत विवाह केला व त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. म्हणून कृष्ण आणि त्यांची तिसरी पत्नी सत्यभामा यांच्या संयुक्त व अद्वितीय पराक्रमाचे स्मरण म्हणून आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो. हा सण नरकातील दुःखातून मुक्त होण्याचा, आणि प्रेम आणि एकतेच्या प्रतीकाचा असतो. प्रत्येकजन या दिवशी पूजा करून आपल्या पितरांना स्मरण करतो आणि चांगल्या कार्याची प्रार्थना करतो.

यमदीपन- Narak Chaturdashi-2024
Narak Chaturdashi-2024- नरक चतुर्दशीच्या संदर्भात अनेक पौराणिक कथा आहेत. यामध्ये सर्वात प्रसिद्ध कथा म्हणजे यमराज आणि नरकासुर यांची कथा. त्यापैकी यमदेवतेवर यमदीपन संबंधातील पौराणिक कथेनुसार – हेमा राजाच्या पुत्राचा त्याच्या वयाच्या सोळाव्या वर्षी मृत्यु होईल अशी भविष्यवाणी झालेली असते. परंतु आपल्या पुत्राचा असा अकाली मृत्यू होऊ नये व राजपुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न लाऊन देतात. लग्नानंतर चौथा दिवस हा राजपुत्राचा मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवते. महालाचे प्रवेशद्वारही असेच सोन्या-चांदीने भरून ठेवले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून पत्नी राजपुत्राला जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सापाच्यारुपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या-चांदीने दिपतात. वेळ निघून जाते व यम राजपुत्राचा प्राण हरण न करता तसाच माघारी परतून आपल्या यमलोकात जातो. अशा प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचतात अशी आख्यायिका आहे. म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून दिव्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात.असे केल्याने अपमृत्यू टळतो असा समज आहे.तसेच यमराजाच्या प्रतीकासाठी एक ताट तयार करण्यात येते, ज्यामध्ये दिवा, फुलं, कंद-तुरें, आणि खास मिठाई ठेवली जाते.या दिवशी, विशेषतः मसालेदार आणि चवदार जेवण टाळले जाते, कारण हा दिवस उपवासाचा आहे. काही ठिकाणी, नरक चतुर्दशीच्या दिवशी भक्तजन आपल्या घरांच्या दरवाज्यावर दीपक लावतात.
निष्कर्ष: Narak Chaturdashi-2024
नरक चतुर्दशी एक अत्यंत धार्मिक आणि सांस्कृतिक सण आहे, जो अन्यायाविरुद्ध न्यायाचा विजय साजरा करण्याची संधी देतो. तसेच हा सण अलक्ष्मी ला दूर करण्यासाठी आपणास प्रेरित करतो तसेच अकाली मृत्युपासून बचाव व आपल्या पितरांच्या आत्म्यांच्या शांतीसाठी साजरा केला जातो. हा दिवस आपल्या कुटुंबाच्या एकतेचा, प्रेमाचा, आणि श्रद्धेचा प्रतीक आहे. यामध्ये केलेल्या उपासना आणि धार्मिक कार्यामुळे भक्तजन नरकातील दुःखातून मुक्तता मिळवू शकतात. या दिवशी एकत्रित येऊन केलेली उपासना, प्रार्थना, आणि विविध धार्मिक कार्ये जीवनात चांगले परिणाम घडवतात.
आमच्या इतर ब्लॉगपोस्ट :
जगाला भारताने दिलेली अमूल्य देणगी – Dhanteras 2024
वसुबारस: गोमाता आणि गोवंशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा पर्व – Vasubaras 2024
होय , महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ घोषित – YES, MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
नरक चतुर्दशी संदर्भातील युटूब व्हिडीओ साठी येथे क्लिक करा.
