सरकारी क्षेत्रातील आघाडीची सर्वसाधारण विमा कंपनी (New India Assurance) द न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड (NIACL) ने 2026-27 या वर्षासाठी 550 अप्रेंटिस पदांच्या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. देशभरातील विविध राज्यांमध्ये ही भरती होणार असून महाराष्ट्रातील उमेदवारांसाठीही मोठी संधी उपलब्ध झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावेत. कंपनीकडून ही भरती Apprentices Act, 1961 अंतर्गत करण्यात येणार असून निवड झालेल्या उमेदवारांना 12 महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षण कालावधीत दरमहा ₹12,300 स्टायपेंड दिला जाणार आहे.

New India Assurance भरतीचा संक्षिप्त तपशील
- संस्थेचे नाव: द न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड (NIACL)
- पदाचे नाव: अप्रेंटिस (Apprentice)
- एकूण जागा: 550
- प्रशिक्षण कालावधी: 12 महिने
- स्टायपेंड: ₹12,300 प्रति महिना
- नोकरीचे ठिकाण: भारतातील विविध राज्ये
New India Assurance मध्ये महाराष्ट्रासाठी सर्वाधिक 138 जागा
राज्यानुसार जाहीर करण्यात आलेल्या जागांमध्ये महाराष्ट्रासाठी सर्वाधिक 138 जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील पदवीधर युवक-युवतींसाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे.
New India Assurance : पगार (Stipend)
उमेदवारांना 12 महिन्यांच्या प्रशिक्षणा दरम्यान दरमहा १२३०० रुपये (Stipend) दिला जाणार आहे.
New India Assurance : पात्रता
शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराने पदवी 1 जानेवारी 2022 ते 1 जून 2026 या कालावधीत पूर्ण केलेली असावी. यापूर्वी किंवा त्यानंतर पदवी पूर्ण केलेले उमेदवार पात्र राहणार नाहीत. उमेदवार फ्रेशर असावा आणि यापूर्वी कोणत्याही संस्थेत अप्रेंटिसशिप पूर्ण केलेली नसावी.
वयोमर्यादा
1 जून 2026 रोजी उमेदवाराचे वय खालीलप्रमाणे असावे:
- किमान वय: 21 वर्षे
- कमाल वय: 30 वर्षे
आरक्षित प्रवर्गांना शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. SC/ST उमेदवारांना 5 वर्षे, OBC (नॉन-क्रीमी लेयर) उमेदवारांना 3 वर्षे तसेच PwBD उमेदवारांना 10 वर्षांची सवलत लागू आहे.
New India Assurance : निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाईल:
- ऑनलाइन लेखी परीक्षा
- प्रादेशिक भाषेची चाचणी (आवश्यक असल्यास)
- कागदपत्र पडताळणी
- वैद्यकीय पात्रता तपासणी
ऑनलाइन परीक्षेत एकूण 100 प्रश्न आणि 100 गुण असतील. परीक्षेचा कालावधी 60 मिनिटे असेल.
परीक्षेतील विषय:
- सामान्य व आर्थिक जागरूकता
- इंग्रजी
- संख्यात्मक व तर्कशक्ती
- संगणक ज्ञान
अर्ज शुल्क
- General / EWS / OBC (पुरुष): ₹944
- General / EWS / OBC (महिला): ₹708
- SC / ST / PwBD: ₹236
अर्ज कसा करावा?
उमेदवारांनी प्रथम NATS पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर BFSI SSC पोर्टलवर अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत आणि अर्ज शुल्क भरावे.
महत्त्वाच्या तारखा
- ऑनलाइन अर्ज सुरू: 23 जून 2026
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 जुलै 2026
- ऑनलाइन परीक्षा: 12 जुलै 2026
महत्त्वाच्या सूचना
- उमेदवाराला केवळ एका राज्यासाठी अर्ज करता येईल.
- ही भरती केवळ अप्रेंटिस प्रशिक्षणासाठी असून यामुळे कंपनीमध्ये कायमस्वरूपी नोकरीचा कोणताही अधिकार मिळणार नाही.
- प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतरही कंपनीकडून नियमित नोकरीची हमी दिली जाणार नाही.
- अर्ज करण्यापूर्वी पात्रता, वयोमर्यादा आणि आवश्यक कागदपत्रांची खात्री करूनच अर्ज करावा.
अधिकृत जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
