पहलगाम (Pahalgam) दहशतवादी हल्ल्याच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त देशभरातून श्रद्धांजली; दहशतवादाविरोधात भारताचा निर्धार अधिक दृढ !

Vishal Patole

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam) येथे घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण झाले. या निमित्ताने संपूर्ण देशाने त्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. विविध राजकीय नेते, केंद्र सरकारचे मंत्री, तसेच आंतरराष्ट्रीय समुदायानेही या दुर्दैवी घटनेची आठवण काढत पीडित कुटुंबांप्रती सहानुभूती व्यक्त केली आणि दहशतवादाविरोधात एकजूट दाखवली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रसंगी भावनिक संदेश देत म्हटले की, “पहलगाम दहशतवादी हल्ल्यात गमावलेल्या निरपराध जीवांना आपण कधीही विसरणार नाही. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात संपूर्ण देश सहभागी आहे.” त्यांनी पुढे ठामपणे सांगितले की, भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही आणि दहशतवाद्यांचे कारस्थान कधीच यशस्वी होणार नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही आपल्या संदेशात या घटनेचा उल्लेख करत दहशतवाद हा मानवतेचा सर्वात मोठा शत्रू असल्याचे नमूद केले. त्यांनी देशवासीयांना एकत्र राहण्याचे आणि दहशतवादाविरोधात लढा अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले. भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन (C. P. Radhakrishnan) यांनीही हल्ल्यातील बळींच्या स्मृतींना आदरांजली वाहत म्हटले की, हे अमानुष कृत्य आपल्या सामूहिक स्मृतीत कायम राहील. त्यांनी पीडित कुटुंबांच्या दुःखात सहभागी होत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

Pahalgam

Pahalgam दहशतवादी हल्ल्याच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर व जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची प्रतिक्रिया

दरम्यान, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही या प्रसंगी देशाच्या दहशतवादाविरोधातील ठाम भूमिकेचा पुनरुच्चार केला. त्यांनी स्पष्ट केले की, भारत कोणत्याही स्वरूपातील दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्यास कटिबद्ध आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी (Pahalgam) घटनेची आठवण काढताना सांगितले की, “हा दिवस प्रत्येकासाठी अत्यंत वेदनादायी आहे. त्या दिवशी निष्पाप नागरिकांनी जीव गमावला, ज्यांची कोणतीही चूक नव्हती.” त्यांनी सरकारतर्फे भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला. या घटनेनंतर सुरक्षेच्या दृष्टीने काश्मीरमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. पर्यटकांसाठी पुन्हा काही पर्यटन स्थळे उघडण्यात आली असली तरी ती कडेकोट सुरक्षा व्यवस्थेखाली ठेवण्यात आली आहेत. यामुळे एकीकडे पर्यटन उद्योगाला चालना देण्याचा प्रयत्न होत असताना, दुसरीकडे नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जात आहे.

Pahalgam दहशतवादी हल्ल्याच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त युरोपियन युनियन तसेच अमेरिकेने भारतासोबत एकजूट दर्शवत दहशतवादाविरोधातील लढ्यात पाठिंबा व्यक्त केला

आंतरराष्ट्रीय स्तरावरही या हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. युरोपियन युनियन तसेच अमेरिकेने भारतासोबत एकजूट दर्शवत दहशतवादाविरोधातील लढ्यात पाठिंबा व्यक्त केला आहे. अमेरिकेचे भारतातील राजदूत यांनीही पीडित कुटुंबांप्रती सहवेदना व्यक्त करत “अमेरिका भारतासोबत आहे” असे स्पष्ट केले. दरम्यान, देशात सध्या उष्णतेची लाटही तीव्र होत असल्याची माहिती समोर आली आहे. पहलगाम हल्ल्याच्या स्मृतिदिनी देशभरात विविध ठिकाणी श्रद्धांजली कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मेणबत्त्या पेटवून, दोन मिनिटे मौन पाळून आणि विविध कार्यक्रमांद्वारे हल्ल्यातील बळींची आठवण काढण्यात आली.

Pahalgam दहशतवादी हल्ल्याच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त भारतीय सैन्याने दिला कठोर संदेश

Pahalgam दहशतवादी हल्ल्याच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त भारतीय सैन्याने देशविरोधी शक्तीला कठोर संदेश देत समाज माध्यमावर Operation Sindoor दरम्यान भारतीय सैन्यदल Indian Armyने केलेल्या “ऑपरेशन महादेव” या धाडसी मोहिमेबाबत सोशल मीडियावर दिलेल्या संदेशात म्हंटले कि, “भारताविरुद्ध कोणतीही कृती झाली, तर प्रत्युत्तर नक्की दिले जाईल. न्याय मिळवून दिला जाईल—नेहमीच,” असा स्पष्ट इशारा देत सैन्याने दहशतवाद्यांना कठोर संदेश दिला आहे. या मोहिमेत सुमारे ३०० चौ. कि.मी. इतक्या कठीण आणि दुर्गम भागात तब्बल ९३ दिवस-रात्र अखंड शोधमोहीम राबविण्यात आली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही भारतीय जवानांनी धैर्य, संयम आणि कौशल्य दाखवत अखेर तीन दहशतवाद्यांना ठार केले. “ऑपरेशन महादेव” ही मोहीम केवळ एक लष्करी कारवाई नसून, देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी भारतीय सैन्य सदैव सज्ज आहे, याचे प्रभावी उदाहरण आहे.

Pahalgam हल्ला केवळ एका प्रदेशावरचा नव्हता, तर संपूर्ण भारताच्या मनावर झालेला आघात होता. मात्र, या दुःखद घटनेनंतर देशाने दाखवलेली एकजूट आणि दहशतवादाविरोधातील ठाम भूमिका हेच भारताचे खरे सामर्थ्य असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

समाज माध्यमावरील प्रतिक्रियेसाठी येथे क्लिक करा.

आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :

बातमीन्यूज

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
प्रतिक्रिया नाहीत

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत