Pushpa 2- BOX OFFICE वरील पुष्पा-२ ची जादू अजून कायम असून. या चित्रपटाबद्दल चे आकर्षण कमी झालेले नाही. पुष्पा २: द रूल हा ओरीजनली तेलुगू भाषेतील व हिंदी भाषेत डब केलेला Action ड्रामा चित्रपट आहे जो दिनांक ०५ डिसेंबर २०२४ रोजी जगभरात रिलीज झाला होता. या चित्रपटाने दि. १८ जानेवारी २०२५ पर्यंत म्हणजे रिलीजच्या ४९ दिवसात भारतातून १२२९.९३ करोड रुपयाची नेट कमाई केली आहे, विदेशातून २७०.५ कोटी तर एकंदरीत जगभरातून एकूण १७३६.१५ करोड रुपयांचा गल्ला गोळा केला आहे. आज या चित्रपटाचा रिलीजचा ५० वा दिवस आहे. चित्रपट अतिशय भव्य दिव्य, उत्कृष्ट असा बनला आहे. खासकरून या चित्रपटाचे हिंदी स्वरूप व श्रेयस तळपदे यांनी पुष्पाला दिलेला आवाज आणि त्यातही संवादांना दिलेला मराठी तडका मराठी प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. नुकताच २० मिनिटांचे वाढीव फुटेज सहित हा चित्रपट पुन्हा रिलीज केला गेला होता. त्याचाही फायदा चित्रपटाला होताना दिसत आहे.
- Pushpa Box Office Collection
- Pushpa Movie (Pushpa 2) चित्रपटाची घोषणा आणि उत्पादन प्रक्रिया
- Pushpa 2: The Rule निर्मिती आणि टीम
- Pushpa 2 कास्ट आणि कॅरेक्टर
- Pushpa 2: The Rule आयटम नंबरसाठी अभिनेत्रींची निवड
- Pushpa 2 Release Date
- Pushpa 2: The Rule चित्रपटाची तांत्रिक माहिती:
- Pushpa Movie (Pushpa 2- The Rule) – रिव्हिव
- आला पुष्पा ३ चा ट्रेलर- Pushpa 3

पुष्पा २: द रूल या चित्रपटासाठी प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचलेली होती. कारण पुष्पा २ मधील अल्लू अर्जुनने साकारलेले पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून गेले होते आणि पुढील भागात काय होईल याची उत्सुकता या सर्व बाबींचा परिणाम BOX OFFICE वर पुष्पा-२ च्या कमाईच्या रुपात दिसला आहे. चित्रपटाचे जवळपास सर्व शो अजूनही जवळपास हाउस फुल जातआहेत. त्याचे एक प्रमुख कारण म्हणजे चित्रपटात नाते संबंधांची केलेली गुंफण, पती पत्नी प्रेम, एक चांगली स्टोरी लाईन, उत्तम निर्देशन जे प्रेक्षकांना खिळवून ठेवते. चित्रपटातील मारधाड, नायकाची चित्रपटातील एन्ट्री या गोष्टी प्रेक्षकांचे लक्ष विचलित होऊ देत नाहीत, गाणी व नृत्य मनोरंजनात भर घालते सोबतच भारतीय व विशेषत: हिंदू संस्कृती मंदिर, पूजा -अर्चा इत्यादी बाबी या चित्रपटाची खासियत म्हणायला हरकत नाही. तसेच हा चित्रपट पुष्पा चित्रपट मालिकेतील दुसरा भाग आहे. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या पुष्पा: द राइज या चित्रपटाचा तो सिक्वेल आहे. पुष्पा चित्रपटाने BOX OFFICE वर धुमाकूळ घातला होता आणि तरुणांच्या गळ्यातला ताईत तो चित्रपट ठरला होता त्याचा फायदा सिक्वल असलेला Pushpa 2 या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी झाला. म्हणून पुष्पा-२ प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचत आहे. चित्रपट पाहून येणाऱ्या कडून होणारी माउथ पब्लिसिटी आणि आजच्या सोशल मिडिया वरील जनतेतून होणाऱ्या वेगळ्या प्रकारच्या प्रचाराने देखील या चित्रपटाच्या प्रसिद्धीत भर घातली आहे. अजून किती दिवस हा चित्रपट BOX OFFICE वर धुमाकूळ घालतोय आणि किती रुपये कमावतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Pushpa 2 या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले असून, सुकुमार रायटिंग्स आणि मिथरी मूव्ही मेकर्स यांच्या सहकार्याने या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. चित्रपटात प्रमुख भूमिका अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना, फहाद फासिल, जगपती बाबू, धनंजय, राव रमेश, सुनील आणि अनसूया भारद्वाज यांनी साकारली आहे. आता हा चित्रपट आणखी किती गल्ला गोळा करतो आणि किती दिग्गजांचे रेकॉर्ड मोडीत काढतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Pushpa Box Office Collection
Pushpa Movie (Pushpa 2) चित्रपटाचे विविध भाषेतील BOX OFFICE कलेक्शन
Pushpa 2 हा चित्रपट भारतात एकूण ५ भाषेत तर विदेशात सब टायटल सह रिलीज झाला. प्रत्येक भाषेतील या चित्रपटाचे कलेक्शन उत्तम आहे. गेल्या सात दिवसात चित्रपटाने ९४७.४ करोड रुपये कमावले आहेत आणि आज चित्रपट १००० करोड चा पल्ला गाठणार आहे. साकीनिक च्या माहितीनुसार या चित्रपटाचे दि ११-१२-२०२४ पर्यंतचे विविध भाषेतील कलेक्शन खाली देत आहोत.
| तेलगु नेट | हिंदी नेट | तमिळ नेट | कन्नड नेट | मल्याळम नेट | विदेश | एकूण नेट |
| ३३९.८१ करोड | ८०७.६४ करोड | ५८.५६ करोड | ७.७७ करोड | १४.१५ करोड | २७०.५ करोड | १७३६.१५ करोड रुपये |
Pushpa Movie (Pushpa 2) चित्रपटाची घोषणा आणि उत्पादन प्रक्रिया
डिसेंबर २०२१ मध्ये पुष्पा: द राइज (Pushpa 2) प्रदर्शित होण्याच्या काही दिवस आधीच पुष्पा २ च्या सिक्वेलची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. ऑगस्ट २०२२ मध्ये पुष्पा २: द रूल या सबटायटलची घोषणा करण्यात आली. प्रारंभिक योजना अशी होती की चित्रपटाचे १०% फुटेज पुष्पा: द राइज च्या बॅक-टू-बॅक शूटिंगमध्ये तयार केले जाईल. तथापि, सुकुमार यांनी कथेत बदल करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे ऑक्टोबर २०२२ मध्ये चित्रपटाचे मुख्य छायाचित्रण सुरू झाले.
चित्रपटाचे संगीत देवी श्री प्रसाद यांनी दिले आहे, छायांकन मिरोस्लाव कुबा ब्रोसेक यांनी केले आहे आणि संपादन नवीन नूली यांनी केले आहे. पुष्पा २ च्या कथेतील सुधारणा आणि उच्च दर्जाच्या तांत्रिक कामामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
Pushpa 2: The Rule निर्मिती आणि टीम
सुकुमार यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली आहे, तर श्रीकांत विसा यांनी संवाद लिहिले आहेत. सुकुमारने सिनेमॅटोग्राफर मिरोस्लाव कुबा ब्रोसेक, संपादक नवीन नूली आणि रुबेन, कला दिग्दर्शक एस. रामकृष्ण, साउंड डिझायनर रेसुल पुकुट्टी आणि विजय कुमार यांच्यासह मागील भागातील तंत्रज्ञांची टीम कायम ठेवली आहे. याशिवाय, दीपाली नूर आणि शीतल शर्मा यांनी कॉस्च्युम डिझायनर्स म्हणून काम केले आहे, तर प्रीती शील सिंग कॅरेक्टर डिझायनर म्हणून कार्यरत आहेत. पीटर हेन, केचा कंफकडी, ड्रॅगन प्रकाश आणि नवकांत हे स्टंट दिग्दर्शक आहेत. प्रेम रक्षित, गणेश आचार्य, विजय पोलाकी आणि सृष्टी वर्मा यांचे नृत्य दिग्दर्शन आहे.
Pushpa 2 कास्ट आणि कॅरेक्टर
पुष्पा २ मध्ये पहिल्या भागातील सर्व प्रमुख कलाकार पुन्हा एकदा आपापल्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना, फहाद फासिल, धनंजय, राव रमेश, सुनील, अनसूया भारद्वाज आणि अजय घोष यांचा समावेश आहे. एप्रिल २०२३ मध्ये जगपती बाबूला एक महत्त्वपूर्ण भूमिका दिली गेली. त्याचप्रमाणे, जगदीश प्रताप बंदरीला आत्महत्या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर फेब्रुवारी २०२४ मध्ये तो पुन्हा चित्रपटाच्या कास्टमध्ये सामील झाला.
Pushpa 2: The Rule आयटम नंबरसाठी अभिनेत्रींची निवड
सुरुवातीला, आयटम नंबरसाठी तृप्ती डिमरी, जान्हवी कपूर, दिशा पटानी आणि श्रद्धा कपूर यासारख्या विविध अभिनेत्रींचा विचार केला जात होता. परंतु, शेवटी श्रीलीला या भूमिकेसाठी निवडण्यात आले.
Pushpa 2 Release Date
Pushpa 2- पुष्पा २: द रूल हा चित्रपट दिनांक ०५ डिसेंबर २०२४ रोजी जगभरात रिलीज झाला आहे.
Pushpa 2: The Rule चित्रपटाची तांत्रिक माहिती:
| निर्माते | नवेण येरनेनी, यलमंचिली रवि शंकर |
| दिग्दर्शक व लेखक | सुकुमार |
| संगीत | देवी श्री प्रसाद |
| सिनेमॅटोग्राफी | मिरोस्लाव कुबा ब्रोसेक |
| संपादन | नवीन नूली |
| रिलीज तारीख | ५ डिसेंबर २०२४ |
| भाषा | तेलुगू, हिंदी |
| बजेट | ₹४००–५०० कोटी |
Pushpa Movie (Pushpa 2- The Rule) – रिव्हिव
पुष्पा २: द रूल हा चित्रपट पुष्पा: द राइज या चित्रपटाचा तो सिक्वेल आहे जो पती पत्नी प्रेम, पारिवारिक नाते, भारतीय संस्कृती व जीवन पद्धती याचे दर्शन घडवतो त्यासोबतच अत्याधुनिक तंत्रज्ञान, उत्कंठावर्धक कथा आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो. नायकाची चित्रपटातील एन्ट्री थक्क करणारी आहे. चित्रपटाचे संगीत, सिनेमाटोग्राफी उत्तम आहे, दिग्दर्शन व कथा उत्तम रित्या प्रेक्षकांना बांधून ठेवते. मध्ये मध्ये होणारे हलके फुलके कॉमेडी सीन प्रेक्षकांना खळखळून हसवतात, श्रेयस तळपदे या मराठी नायकाच्या आवाजातील डब केलेले हिंदी डायलॉग व त्यामध्ये अधून मधून येणारा मराठी तडका चित्रपटाला वेगळा स्वाद देतो. तसेच मारधाड, टशन इत्यादी बाबी चित्रपटाचा हिस्सा आहेतच रोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेगळे मनोरंजन करणारा व प्रेक्षकांचे पैसे वसूल करून देणारा असा हा चित्रपट आहे. खास करून तरुणवर्गाला आकर्षित करेल असा हा चित्रपट बनला आहे त्यामुळे तो प्रेक्षकांना आकर्षित करत आहे.
आला पुष्पा ३ चा ट्रेलर- Pushpa 3
पुष्पा २ मधील कथा अजून संपलेली नाही, चित्रपटात शेवटी पुष्पा ३ चे प्रमोशन करून पुष्पा च्या पुढील सिक्वलची उत्सुकता निर्मात्याने वाढवलेली असतानाच नुकताच गोल्डमाईन्सने पुष्पा चा पुढील सिक्वल असलेला पुष्पा -३ चा ट्रेलर लौंच केला आहे. पुष्पा सिरीजच्या इतर भागासारखाच हा चित्रपट देखील धमाकेदार असणार आहे त्याच्या ट्रेलर मधून स्पष्ट होते. प्रेक्षक शेवट पर्यंत खिळवून ठेवणारा पुष्पा २ चित्रपट भारी कलेक्शन करत आहे. शेवटच्या क्षणापर्यंत चित्रपट प्रेक्षकांना अक्षरश: बांधून ठेवण्यात यशस्वी ठरला आहे. त्याचीच कथा पुढे सरकवत सुकुमार पुष्पा ३ मधून प्रेक्षकांपुढे काय सादर करतील याची उत्सुकता लागलेली असताना आता पुष्पा ३ चा ट्रेलर निर्मात्यांनी सादर केला आहे.
पुष्पा २: द रूल चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
