
भारताचे परराष्ट्रमंत्री S. Jaishankar यांनी कॅरिबियनमधील महत्त्वाच्या देश Jamaica ची अधिकृत भेट सुरू केली असून ते राजधानी Kingston येथे दाखल झाले. या ऐतिहासिक दौऱ्यादरम्यान त्यांचे जमेका सरकारतर्फे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. विशेषतः जमेका देशाच्या परराष्ट्रमंत्री Kamina Johnson Smith यांनी स्वतः उपस्थित राहून त्यांचे स्वागत केले. ही भेट भारत आणि जमेका यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. पुढील दोन दिवसांच्या दौऱ्यात जयशंकर विविध उच्चस्तरीय बैठका आणि कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. यामध्ये जमेका देशाच्या राजकीय नेतृत्वाशी चर्चा, व्यापार व गुंतवणूक क्षेत्रातील संधींचा आढावा, तसेच स्थानिक व्यावसायिक समुदायाशी संवाद यांचा समावेश आहे.याशिवाय, या दौऱ्यात जमेका येथे वास्तव्यास असलेल्या भारतीय वंशाच्या नागरिकांशीही (Indian Diaspora) संवाद साधण्याचे नियोजन आहे. भारतीय संस्कृती आणि परंपरेशी जोडलेले हे समुदाय भारत–जमेका संबंधांच्या बळकटीकरणात महत्त्वाची भूमिका बजावतात.
भारताने अलीकडील काळात कॅरिबियन देशांशी सहकार्य वाढवण्यावर विशेष भर दिला आहे. व्यापार, आरोग्य, शिक्षण, आणि हवामान बदल या क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्य वाढवण्याचा भारताचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर (S. Jaishankar ) जयशंकर यांचा हा दौरा कूटनीतिक दृष्ट्या महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.तज्ज्ञांच्या मते, या भेटीद्वारे भारत आणि जमेका यांच्यातील संबंधांना नवी दिशा मिळेल आणि दोन्ही देशांमधील आर्थिक, सांस्कृतिक आणि राजनैतिक सहकार्य अधिक दृढ होईल.
समाज माध्यमावरील प्रतिक्रियेसाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट
