आज देशभरात श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात (Basant Panchmi) बसंत पंचमी 2026 साजरी केली जात आहे. या दिवशी ज्ञान, विद्या, कला आणि संगीताची, (Saraswati Mantra) सरस्वती मंत्र, अधिष्ठात्री देवी माँ सरस्वतीचे पूजन (Saraswati Aarti) केली जाते. पिवळ्या रंगाचे महत्त्व असलेल्या या शुभ दिवशी घर सजवण्यासाठी सुंदर रंगोली डिझाइन्स काढण्याची विशेष परंपरा आहे. वसंत पंचमी (बसंत पंचमी)च्या दिवशी घराच्या प्रवेशद्वारावर किंवा पूजास्थळी काढलेली रंगोली केवळ सजावटीसाठीच नव्हे, तर सकारात्मक ऊर्जा, समृद्धी आणि ज्ञानवृद्धीसाठी शुभ मानली जाते.

Basant Panchmi निमित्त सरस्वती वंदना मंत्र (Saraswati Aarti)
बसंत पंचमीच्या पावन पर्वानिमित्त देवी सरस्वतीची उपासना करताना सरस्वती वंदना मंत्राचे विशेष महत्त्व आहे. हा मंत्र ज्ञान, बुद्धी, विवेक आणि सर्जनशीलतेचे प्रतीक मानला जातो. “या कुन्देन्दु तुषारहारधवला…” या वंदनेत देवी सरस्वतीच्या तेजस्वी, शुद्ध आणि शांत स्वरूपाचे वर्णन करण्यात आले आहे. वीणा धारण केलेली, शुभ्र वस्त्रांनी अलंकृत आणि कमळावर विराजमान असलेली माँ शारदा अज्ञानरूपी अंधकार दूर करून विद्या व सद्बुद्धी प्रदान करते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. बसंत पंचमीच्या दिवशी श्रद्धेने व भक्तिभावाने सरस्वती वंदना मंत्राचा जप केल्यास अभ्यासात प्रगती, एकाग्रता वाढ, कला-संगीतात यश आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते, असे मानले जाते. त्यामुळे हा दिवस ज्ञानाच्या आराधनेसाठी अत्यंत शुभ आणि प्रेरणादायी ठरतो.
या कुन्देन्दु तुषारहारधवला
या शुभ्रवस्त्रावृता।
या वीणावरदण्डमण्डितकरा
या श्वेतपद्मासना॥
या ब्रह्माच्युत शंकरप्रभृतिभि:
देवै: सदा पूजिता।
सा मां पातु सरस्वती भगवती
निःशेषजाड्यापहा॥
(Saraswati Aarti) सरस्वती पूजनासाठी खास रांगोळी डिझाइन्स
बसंत पंचमीच्या निमित्ताने घरात खालील प्रकारच्या सोप्या व आकर्षक रंगोली डिझाइन्स काढता येतात —
कमळ फुलांची रांगोळी : माँ सरस्वती कमळावर विराजमान असल्याने कमळाच्या आकाराची रंगोली अत्यंत शुभ मानली जाते. वीणा आणि पुस्तकांची रचना वीणा, पुस्तके, शंख, हंस यांचा समावेश असलेली रंगोली ज्ञानप्राप्तीचे प्रतीक ठरते पिवळ्या रंगावर आधारित रांगोळी बसंत ऋतूचे प्रतीक असलेला पिवळा रंग वापरून फुलांची, सूर्याची किंवा पारंपरिक नक्षी काढता येते.
डॉट रंगोली (Dot Rangoli) : लहान मुलांसाठी व नवशिक्यांसाठी सोपी आणि आकर्षक डॉट रंगोली उत्तम पर्याय ठरते.रांगोळीकाढताना लक्षात घ्यावयाच्या गोष्टी रांगोळी नेहमी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा पूजाघराजवळ काढावी शक्यतो पिवळा, पांढरा, गुलाबी व केशरी रंग वापरावेत स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी. फुलांच्या पाकळ्यांनी केलेली रंगोली अधिक शुभ मानली जाते
बसंत पंचमी 2026 ला तयार होतोय विष योग
ज्योतिषशास्त्रानुसार, 23 जानेवारी 2026 रोजी बसंत पंचमीच्या दिवशी चंद्रमा आणि शनीची युती होत असल्याने विष योग निर्माण होत आहे. या योगाचा प्रभाव काही राशींवर अधिक राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
विशेषतः —
- मेष
- कर्क
- मकर, या तीन राशींच्या जातकांनी 25 जानेवारीपर्यंत विशेष सावधगिरी बाळगण्याचा सल्ला ज्योतिषांनी दिला आहे. या दिवशी काय करावे?
माँ सरस्वतीची पूजा (Saraswati Aarti)
- पिवळे वस्त्र परिधान करणे
- विद्यार्थ्यांनी पुस्तके व लेखन साहित्य पूजेत ठेवणे
- घरात रंगोली व फुलांनी सजावट करणे
- “ॐ ऐं सरस्वत्यै नमः” मंत्राचा जप करणे ज्ञान, यश आणि सकारात्मकतेचा उत्सव
बसंत पंचमी हा केवळ सण नसून ज्ञान, सर्जनशीलता आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक मानला जातो. या दिवशी श्रद्धेने काढलेली सुंदर रंगोली घरात मंगल वातावरण निर्माण करते आणि माँ शारदेचा कृपाशीर्वाद प्राप्त होतो, अशी भक्तांची श्रद्धा आहे.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
