(Sarkari Job) धर्मादाय संघटनेच्या गट ब व गट क संवर्गातील रिक्त पदांसाठी सरळसेवा प्रवेश प्रक्रिया सुरू

Vishal Patole
By
Vishal Patole
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News...
Sarkari Job

महाराष्ट्र राज्यातील धर्मादाय (Dharmaday) संघटनेत (Sarkari Job) गट ब व गट क संवर्गातील एकूण १७९ रिक्त पदे भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज ११ सप्टेंबर २०२५ पासून सुरु होऊन ३ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ११:५५ पर्यंत स्वीकारले जातील. तपशीलवार माहिती आणि अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट https://charity.maharashtra.gov.in या ठिकाणी उपलब्ध आहे.

Sarkari Job

धर्मादाय (Dharmaday) संघटनेत (Sarkari Job) पदांची नावे व पगार

  • विधी सहायक (एस-१५): ३ जागा, वेतन रु. ४१,८०० ते १,३२,३००
  • लघुलेखक (उच्च श्रेणी) (एस-१६): २ जागा, वेतन रु. ४४,९०० ते १,४२,४००
  • लघुलेखक (कनिष्ठ श्रेणी) (एस-१५): २२ जागा, वेतन रु. ४१,८०० ते १,३२,३००
  • निरीक्षक (एस-१३): १२१ जागा, वेतन रु. ३५,४०० ते १,१२,४००
  • वरिष्ठ लिपिक (एस-८): ३१ जागा, वेतन रु. २५,५०० ते ८१,१००

परीक्षा शुल्क

  • खुला प्रवर्ग: रु. १०००
  • मागास प्रवर्ग व अनाथ: रु. ९००
  • माजी सैनिक व दिव्यांग: फी माफ

पात्रता

  • अर्जदार भारताचा नागरिक असावा.
  • किमान १५ वर्षे महाराष्ट्राचा रहिवाशी असलेला असावा (अधिवास प्रमाणपत्र आवश्यक).
  • वेगवेगळ्या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव:
  • विधी सहायक: कोणत्याही शाखेतील पदवी + धर्मादाय संघटनेत ३ वर्षांचा अनुभव.
  • लघुलेखक: दहावी पास + लघुलेखन आणि टायपिंग प्रमाणपत्र.
  • निरीक्षक व वरिष्ठ लिपिक: कोणत्याही शाखेतील पदवी + आवश्यक टायपिंग स्पीड.

वयमर्यादा

  • सर्वसाधारण: किमान १८ ते जास्तीत जास्त ३८ वर्षे.
  • मागास प्रवर्ग, प्राविण्य प्राप्त खेळाडू: ४३ वर्षे.
  • दिव्यांग पदाधिकारी: ४५ वर्षे.
  • माजी सैनिक: सेवेचा कालावधी + ३ वर्षे सवलत.

निवड प्रक्रिया

  • ऑनलाईन अर्ज, प्रवेशपत्र, ऑनलाइन परीक्षा, किमान ४५% गुण घेणे, नंतर कागदपत्र तपासणी करण्यात येईल.

ऑनलाईन अर्जासाठी येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट- https://charity.maharashtra.gov.in

धर्मादाय संघटनेत या पदांसाठी मोठ्या संख्येने उमेदवार अर्ज करतील असा अंदाज असून, ही संधी महाराष्ट्रातील इच्छुक व पात्र उमेदवारांसाठी मोठ्या महत्तवाची आहे. अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट पाहावी.

आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :

जालना जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ (Police Patil) पदाच्या ७२२ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू !

Govt Driver Job – केंद्रीय गुप्तचर विभागात 455 सुरक्षा सहाय्यक (मोटर ट्रान्सपोर्ट) पदांसाठी भरती

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
2 टिप्पण्या

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत