Dhondo Keshav Karve– धोंडो केशव कर्वे (अण्णा कर्वे) (महर्षी कर्वे ) यांचा जन्म १८ एप्रिल १८५८ रोजी झाला आणि त्यांचे निधन ९ नोव्हेंबर १९६२ रोजी झाले. ते एक महान समाजसुधारक होते. आज त्यांच्या पुण्यतिथीला भारत त्यांच्या महान कार्याला सलाम करत आहे.
- अण्णा कर्वे यांचे बालपण –Dhondo Keshav Karve
- विधवा पुनर्विवाह – आपल्या वैय्यक्तिक जीवनात आधुनिक विचारांचा अवलंब – Dhondo Keshav Karve
- विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळ आणि विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना –Dhondo Keshav Karve
- एक झोपडी -स्त्री शिक्षणसंस्थेचा उगम –Dhondo Keshav Karve
- फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे प्रोफेसर – Dhondo Keshav Karve
- उदात्त कार्य आणि दृष्टीकोन- Dhondo Keshav Karve
- एस.एन.डी. टी. विद्यापीठाची स्थापना – Dhondo Keshav Karve
- भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे – Dhondo Keshav Karve
अण्णा कर्वे यांचे बालपण –Dhondo Keshav Karve
रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड हे अण्णांचे मूळ गाव होतं. रस्ते आणि वाहनांची व्यवस्था नसताना शिक्षणाची आवड आणि जिद्द असलेले धोंडो कर्वे यांना शिक्षणासाठी खूप मोठी पायपीट करावी लागत असे. इ.स. १८८१ मध्ये मॅट्रिक परीक्षेत यश मिळवल्यानंतर त्यांनी मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्या ठिकाणाहून त्यांनी गणित विषयात पदवी प्राप्त केली. अण्णांचे वय चौदा वर्षे असताना, त्यांचा विवाह राधाबाईंशी झाला. राधाबाई त्या वेळेस केवळ आठ वर्षांच्या होत्या.
विधवा पुनर्विवाह – आपल्या वैय्यक्तिक जीवनात आधुनिक विचारांचा अवलंब – Dhondo Keshav Karve
अचानक अण्णा कर्वेंच्या जीवनात एक खूप मोठी घटना घडली इ.स. १८९१ मध्ये, त्यांची पत्नी सौ. राधाबाई बाळंतपणात मृत्यूला सामोऱ्या गेल्या. त्यावेळी त्यांच्या पत्नीचे वय केवळ २७ वर्षे होते. राधाबाईंचे निधन झाले तेव्हा अण्णांचे वय साधारणतः पंचेचाळीस वर्षे होते. त्या काळात प्रौढ वयातील विधुर पुरुषाने अल्पवयीन अविवाहित मुलीसोबत लग्न करणे एक सामान्य प्रथा मानली जात होती. मुलींचे लहान वयात लग्न होणे हे समाजाच्या रूढीतले होते, पण दुर्दैवाने जर पती लवकर मरण पावला, तर त्या मुलीला विधवा म्हणून आयुष्यभर दुःख भोगावे लागे. त्याकाळी विधवा महिलेला पुनर्विवाह करण्याची सवलत नव्हती, या परंपरेला नाकारत, अण्णांनी पं. रमाबाईंच्या शारदा सदन संस्थेतील गोदूबाई, या विधवा मुलीशी पुनर्विवाह केला. हे कृत्य त्या काळातील समाजाच्या परंपरांशी विसंगत होते. अशारितीने आपल्या जीवनात जाचक रूढी आणि अयोग्य परंपरांचा त्याग करून आणि आधुनिक विचारांचे प्रत्यक्ष आचरण करून त्यांनी समाजसुधारणेचे आदर्श समजा समोर प्रस्थापित केले. त्यानंतर ( Dhondo Keshav Karve ) अण्णा आणि गोदूबाई मुरूडला स्थायिक झाल्यावर त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार घालण्याचा ठराव पारित करण्यात आला. पुढे, गोदूबाई ‘आनंदी कर्वे’ किंवा ‘बाया कर्वे’ म्हणून ओळखल्या गेल्या आणि अण्णांच्या सामाजिक सुधारणांच्या कार्यात त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा होता.

विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळ आणि विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना –Dhondo Keshav Karve
अण्णांचा पुनर्विवाह केवळ एक व्यक्तिगत निर्णय नव्हता, तर तो एक समाजविरोधी घातक प्रथांशी लढाई होता. पुनर्विवाहासंदर्भात लोकमत जागृत करण्यासाठी, अण्णांनी २१ मे १८९४ रोजी पुनर्विवाहितांच्या कुटुंबाचा एक मेळा आयोजित केला. याच वेळी, ‘विधवा विवाह प्रतिबंध निवारक’ मंडळाची स्थापना केली, जे विधवाविवाहास विरोध करणाऱ्या समाजाच्या प्रतिगामी प्रवृत्तींना आवर घालण्यासाठी कार्यरत होते.
बालविवाह, जरठ-कुमारी विवाह, केशवपन यासारख्या अन्यायकारक रूढींविरुद्ध अण्णांनी इ.स. १८९६ मध्ये सहा विधवा महिलांसोबत ‘अनाथ बालिकाश्रम’ स्थापन केला आणि ‘विधवा विवाहोत्तेजक’ मंडळाची निर्मिती केली. विधवाविवाहाला त्या काळी न्यायसंगत मानले जात नव्हते, पण अण्णांनी या विरोधी मानसिकतेला आव्हान दिले आणि समाजाची विचारधारा बदलण्यासाठी चळवळ उभी केली.
एक झोपडी -स्त्री शिक्षणसंस्थेचा उगम –Dhondo Keshav Karve
अण्णांच्या या कार्याने समाजाच्या मनोवृत्तीत बदल घडविला आणि पुनर्विवाहासाठी जागरूकता निर्माण झाली. रावबहादूर गणेश गोविंद गोखले यांनी अण्णांच्या या कार्याला सहकार्य देण्यासाठी हिंगणे येथील सहा एकर जागा आणि रु. ७५० देणगी दिली. त्याच ठिकाणी अण्णांनी एक झोपडी बांधली, जी हिंगणे स्त्रीशिक्षण संस्थेची गंगोत्री ठरली. आज जरी त्या परिसरात अनेक इमारती उभ्या असल्या, तरी अण्णांची ती पहिली झोपडी त्यांच्या तपाचा आणि समाजसुधारणेचा प्रतीक म्हणून उभी आहे.
आताचे पुण्याजवळील कर्वेनगर (हिंगणे) या ठिकाणी इ.स. १८९६ मध्ये अण्णासाहेबांनी विधवा महिलांसाठी पहिला आश्रम सुरू केला. याच ठिकाणी इ.स. १९०७ साली त्यांनी महिला विद्यालयाची स्थापना केली. अण्णासाहेबांच्या २० वर्षीय विधवा मेहुणी पार्वतीबाई आठवले या विद्यालयाच्या पहिल्या विद्यार्थिनी होत्या. आश्रम आणि शाळेसाठी आवश्यक कुशल व्यक्ती तयार करण्यासाठी अण्णासाहेबांनी इ.स. १९१० साली ‘`निष्काम कर्म मठा’ची स्थापना केली. स्त्रियांना आवडीचे शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी आरोग्यशास्त्र, शिशुसंगोपन, गृहशास्त्र, आहारशास्त्र यांसारखे विषय अभ्यासक्रमात समाविष्ट केले, ज्यामुळे स्त्रियांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली. ग्रामीण भागातील महिलांना शिक्षणाची आवश्यकता ओळखून, कर्वे यांनी स्त्री शिक्षणाचा प्रसार करण्यावर भर दिला आणि गावात ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ स्थापन करून अनेक शाळा सुरू केल्या.
या तिन्ही संस्थांची प्रगती होत असल्याने एकत्रीकरण करून ‘हिंगणे स्त्री शिक्षण संस्था’ स्थापन करण्यात आली. त्यानंतर तिचे नाव ‘महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था’ (कर्वे शिक्षण संस्था) असे ठेवण्यात आले. १९९६ साली या संस्थेच्या कार्याला १०० वर्षे पूर्ण झाल्याने, दरवर्षी शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांना ‘बाया कर्वे पुरस्कार’ दिला जातो.
फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे प्रोफेसर – Dhondo Keshav Karve
लोकमान्य टिळक फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे अध्यापक होते, परंतु राजकारणात सक्रिय होण्याच्या कारणामुळे त्यांनी त्यांची जागा सोडली. त्यांच्या रिकाम्या पदावर गणित विभागाचे प्रमुख असलेल्या गोपाळ कृष्ण गोखले यांनी अण्णांना त्या पदावर बोलावून घेतले. यानंतर, इ.स. १८९१ ते १९१४ या लांबच्या काळात अण्णांनी फर्ग्युसन महाविद्यालयात गणित विषय शिकविला.
उदात्त कार्य आणि दृष्टीकोन- Dhondo Keshav Karve
- स्त्रिया आणि सामाजिक प्रगती: अण्णांनी महिलांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी अविरत परिश्रम केले, आणि त्यांच्या नंतर चिरंजीव र. धो. कर्वे यांनीही सामाजिक सुधारणा क्षेत्रात खूप मोठे योगदान दिले.
- संततिनियमन आणि समाज जागृती: अण्णांचे विचार पुढे नेत र. धो. कर्वे आणि त्यांच्या पत्नी यांनी संततिनियमनावर समाजात जागरूकता निर्माण केली, जरी त्या काळी हा मुद्दा समाजाने स्वीकारलेला नव्हता.
- पुनर्विवाह आणि सामाजिक लढा: अण्णांचा पुनर्विवाह सामाजिक लढा आणि घातक परंपरांविरुद्धचे बंड होता. १८९४ मध्ये, अण्णांनी पुनर्विवाहित कुटुंबांचा मेळा आयोजित केला आणि विधवाविवाहाच्या विरोधात ‘विधवा विवाह प्रतिबंध निवारक’ मंडळाची स्थापना केली.
- सामाजिक चळवळ:- १८९६ मध्ये अण्णांनी बालविवाह, जरठ-कुमारी विवाह आणि केशवपन यासारख्या रूढींचा विरोध करणारी चळवळ सुरू केली. ‘अनाथ बालिकाश्रम’ आणि ‘विधवा विवाहोत्तेजक’ मंडळाची स्थापना केली.
धोंडो केशव कर्वे हे एक अशी व्यक्तिमत्त्व होती जी तत्कालीन समाजाच्या कित्येक पट पुढे चालली आणि एक नवा दृषटिकोन जगाला दाखवला.
एस.एन.डी. टी. विद्यापीठाची स्थापना – Dhondo Keshav Karve
Dhondo Keshav Karve– धोंडो केशव कर्वे यांना एका जपानी महिला विद्यापीठाच्या माहितीपत्रकाने प्रेरित केलं. त्यातच त्यांच्या मनात भारतीय महिला विद्यापीठ स्थापनेसाठी विचार आले. १९१० मध्ये त्यांनी ‘निष्काम कर्ममठ’ या संस्कारपीठाची स्थापना केली, ज्याचा उद्देश शिक्षण संस्थांभोवती कार्यकर्त्यांची तटबंदी ठेवणे होता.
१९१५ मध्ये आयोजित अखिल भारतीय सामाजिक परिषदेचे अध्यक्षपद भूषविताना अण्णांनी महिला विद्यापीठाची कल्पना पुन्हा मांडली. ३ जून १९१६ रोजी अण्णांच्या प्रयत्नांमुळे महिला विद्यापीठाची स्थापना झाली, जी स्त्रीशिक्षणाच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण घटना ठरली. अण्णांच्या कार्याने समाजाच्या दुर्बल घटकांसाठी दरवाजे उघडले, ज्यामुळे अनेक स्त्रिया शिक्षणाच्या प्रवासात सामील होऊ शकल्या.
Dhondo Keshav Karve यांच्या कार्याने प्रेरित होऊन सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी या विद्यापीठास १५ लाख रुपयांची देणगी दिली. नंतर महर्षी कर्वेंनी सर विठ्ठलदास ठाकरसी यांच्या मातोश्री “श्रीमती नाथीबाई दामोदरदास ठाकरसी ” यांचे नाव या विद्यापीठाला दिले. या विद्यापीठाचे शिरोधार्य बोधवाक्य होते, ‘संस्कृता स्त्री पराशक्तिः’ (संस्कृती असलेली स्त्री सर्वशक्तिमान आहे). सरकारने या विद्यापीठास त्यानंतर एक स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा दिला. एवढेच नाही तर अण्णांनी इंग्लंड, जर्मनी, जपान आणि अमेरिका यांसारख्या देशांमध्ये जाऊन आपल्या संस्थांची ओळख वाढवली. बर्लिनमध्ये प्रा. अल्बर्ट आइनस्टाईन यांची भेट घेऊन त्यांनी अनेक देशांतील स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रातील योजनांचा अभ्यास केला आणि त्यांना भारतात लागू केले.
आज, २०२४ मध्ये, ‘कर्वे स्त्री शिक्षण संस्था’ आपल्या ध्येयाशी प्रगती करत आहे, आणि अण्णांच्या कार्याची गोडवी आजही जिवंत आहे.
भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे – Dhondo Keshav Karve
अण्णांच्या महान समाज कार्याची दखल घेऊन भारत सरकारने १९५५ मध्ये अण्णांना ‘पद्मविभूषण’ आणि १९५८ मध्ये ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान दिला. १०४ वर्षांचे दीर्घ आयुष्य जगत, ९ नोव्हेंबर १९६२ रोजी पुण्यात त्यांचे निधन झाले.
अशा या महामानवास आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त बातमी न्यूज (Batminews) कडून आदरांजली !
समाजमाध्यम आणि सोशल साईट “X” वरील आजच्या खास दिवसाबद्दलच्या प्रतिक्रियेसाठी येथे क्लिक करा.
आमचे इतर ब्लॉग :
संजूचा हमला आफ्रिका दमला; भारताला 61 धावांनी मोठा विजय- India Vs South Africa
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्वप्नांना बळ देणारी प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना: Vidyalakshmi
