१४ एप्रिल १८९१ हि तारीख भारतातील मागासलेल्या, भरडल्यागेलेल्या , शेकडो वर्षे गुलामगिरी सोसलेल्या खूप मोठ्या समाजासाठी उद्धाराची तारीख आहे. कारण 14 April (१४ एप्रिल १८९१ ) याच दिवशी. मागासवर्गीय समाजाच्या जीवनात प्रकाश आणणारा तेजस्वी सूर्य उगविला ज्याचे नाव आहे Dr Babasaheb Ambedkar- डॉ. बाबासाहेब आंबेडकर. या ज्ञानरूपी सूर्याच्या काही प्रकाशकिरणांनी भारतीय संविधानाला जन्म दिला, काही प्रकाश किरण स्त्री पुरुष समानतेला जन्म देऊन गेले, काही किरण सामाजिक स्थित्यंतर करीत आहेत, तर काही प्रकाशकिरण देशाच्या आर्थिक समस्या सोडवण्यात मदत करत आहेत. काही किरण समाजातील कुजलेल्या प्रथांना आपल्या ओजस्वी आणि तेजस्वी तेजाने नष्ट करत आहेत. तर काही किरण तळागाळात फसलेल्या समाजाला आरक्षणाच्या मदतीची मायेची ऊब देत आहेत. अशाप्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाच्या या ज्ञानरूपी सूर्याच्या प्रखर तेजाने सर्व जग प्रकाशमान आणि दैदिप्यमान होऊन उजळून निघाले आहे.
- Dr Babasaheb Ambedkar Jayanti – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
- Dr Babasaheb Ambedkar Jayanti निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे Tributes to Dr. Babasaheb Ambedkar on his Jayanti. Jai Bhim! नावाने व्हिडीओ प्रसिद्ध केला
- Bhimrao Ramji Ambedkar (Dr Babasaheb Ambedkar)
- Bhimrao Ramji Ambedkar History -(भीमराव रामजी आंबेडकर इतिहास)
- Dr Babasaheb Ambedkar- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुरुवातीचे जीवन प्राथमिक व माध्यमिक शिक्षण – (Bhimrao Ramji Ambedkar History)
- भीमराव रामजी आंबेडकर यांचा महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याशी संपर्क व उच्चशिक्षण – (Bhimrao Ramji Ambedkar History)
- Dr Babasaheb Ambedkar- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उपजीविकेसाठी केलेली कामे व नोकऱ्या – (Bhimrao Ramji Ambedkar History)
- Dr Babasaheb Ambedkar- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जातीवाद व अस्पृश्यता विरोधी कार्य – (Bhimrao Ramji Ambedkar History)
- Dr Babasaheb Ambedkar- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंदोलन
- Dr Babasaheb Ambedkar- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे “मूकनायक”
- Bhimrao Ramji Ambedkar Education – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण व पदव्या
- Bhimrao Ramji Ambedkar Books – Dr Babasaheb Ambedkar- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके आणि शोध निबंध
- Bhimrao Ramji Ambedkar Organizations Founded – Dr Babasaheb Ambedkar यांनी स्थापित केलेल्या संस्था व संघटना
- Bhimrao Ramji Ambedkar Movies – डॉ आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट
- Bhimrao Ramji Ambedkar Died – डॉ बाबासाहेब आंबेडकर मृत्यू
- Dr Ambedkar Quotes

Dr Babasaheb Ambedkar Jayanti – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
Dr Babasaheb Ambedkar यांचा जन्म १४ एप्रिल रोजी झाला म्हणून संपूर्ण जगभरात. १४ एप्रिल हा दिवस मागासवर्गीय व आंबेडकरवादी एक पवित्र दिवस म्हणून साजरा करतात. समाजातील सर्व घटकांना न्याय, समता, बंधुता देणाऱ्या महामानवाला सर्व स्थरातून मानवंदना या दिवशी दिल्या जाते आणि Dr Babasaheb Ambedkar Jayanti – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती भारतात आणि जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
Dr Babasaheb Ambedkar Jayanti निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे Tributes to Dr. Babasaheb Ambedkar on his Jayanti. Jai Bhim! नावाने व्हिडीओ प्रसिद्ध केला
आज १४ एपिल २०२५ रोजी Dr Babasaheb Ambedkar Jayanti मित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मायक्रो ब्लॉगिंग साईट X वर व्हिडीओ प्रसिद्ध करून आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
Bhimrao Ramji Ambedkar (Dr Babasaheb Ambedkar)
बाबासाहेबांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर (Bhimrao Ramji Ambedkar) असे होते. परंतु जन्मवेळी बाबासाहेबांचे आडनाव सकपाळ असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी मालोजी सकपाळ तर आईचे नाव भीमाबाई असे होते. भीमराव हे आपल्या आई वडिलांचे १४ वे अपत्य होते. तत्कालीन अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या महार जातीत बाबासाहेबांचा जन्म झाला. त्यांचे वडील रामजी हे इंग्रजी सैन्यात सुभेदार होते व तसेच बाबासाहेबांच्या जन्मवेळी रामजींचा परिवार मध्य प्रदेशातील महु याठिकाणी वास्तव्यास होता. महु हे ठिकाण आज डॉ. आंबेडकर नगर म्हणून ओळखल्या जाते.
Bhimrao Ramji Ambedkar यांचे मूळ नाव
(Dr Babasaheb Ambedkar) बाबासाहेबांचे मूळ नाव भीमराव रामजी सकपाळ असे होते. सकपाळ परिवार हा मुळचा रत्नागिरी जिल्ह्यातील मांडणगाव तालुक्यातील ‘आंबडवे’ य गावाचे होते. तसेच पूर्वी आपल्या गावावरून आडनावे ठेवली जात होती त्यामुळे साताऱ्याच्या गव्हर्मेंट हायस्कूल मध्ये बाबासाहेबांचा प्रवेश करताना त्यांचे वडील “रामजी” यांनी “आंबडवेकर” अशी बाबासाहेबांच्या आडनावाची नोंद केली. या शाळेत बाबासाहेबांना शिकविण्यासाठी “कृष्णा केशव आंबेडकर” नावाचे शिक्षक होते ज्यांनी कालांतराने बाबासाहेबांच्या सहमतीने “आंबडवेकर” या आडनावाचे “आंबेडकर” असा वापरात व दफ्तरी बदल केला त्यानंतर बाबासाहेबांचे नाव “भीमराव रामजी आंबेडकर” -Bhimrao Ramji Ambedkar. असे झाले.
Bhimrao Ramji Ambedkar History -(भीमराव रामजी आंबेडकर इतिहास)
Dr Babasaheb Ambedkar- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुरुवातीचे जीवन प्राथमिक व माध्यमिक शिक्षण – (Bhimrao Ramji Ambedkar History)
- १४ अपील १८९१ रोजी मध्यप्रदेश येथील महू येथे जन्म
- प्राथमिक शाळा – कॅम्प स्कूल, सातारा
- बाबासाहेब ५ वर्षांचे असतांना त्यांची आई भीमाबाई यांचा मस्तकशूल नावाच्या आजाराने मृत्यू.
- त्यानंतर बाबासाहेबांची आत्तु (आत्या) मीराबाई यांनी त्यांचे संगोपन केले.
- इंग्रजी चौथी पास झाल्यावर बाबासाहेबांचा परिवार १९०४ मध्ये मुंबईला गेला.
- मुंबई मध्ये एल्फिनस्टन या सरकारी शाळेत पाचव्या वर्गासाठी प्रवेश घेतला.
- शाळेत भीमरावांना इतर विद्यार्थ्यांपेक्षा वेगळे बसविले जात असे, त्यांना वर्गात बसण्याची परवानगी नव्हती, पाण्याच्या पेल्याला देखील स्पर्श करण्याचा अधिकार त्यांना नव्हता.
- १४ ते १५ वर्ष वय असतांना व शिक्षण सुरु असताना दापोलीच्या भिकू वलंगकर यांची मुलगी रमाबाई यांच्याशी झाला लग्नाच्यावेळी रमाबाई यांचे वय ९ ते १० वर्षे होते.
- सन १९०७ ला एल्फिनस्टन शाळेतून मैट्रिक ची परीक्षा पास
भीमराव रामजी आंबेडकर यांचा महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याशी संपर्क व उच्चशिक्षण – (Bhimrao Ramji Ambedkar History)
- केळुसकर गुरुजींनी भिमरावांची भेट महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याशी घालून दिली.
- बाबासाहेबांची हुशारी पाऊन महाराज सयाजीराव गायकवाडांनी त्यांना २५ प्रती महिना स्कॉलरशिप मंजूर केली.
- १९१२ मध्ये मुंबई विद्यापीठातून राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषयात बि.ए. ची पदवी घेऊन बडोदा संस्थानात नोकरी
- १२ जानेवारी १९१२ बाबासाहेबांना यशवंत नावाचा पहिला मुलगा झाला.
- २ फेब्रुवारी १९१३ रोजी बाबासाहेबांचे वडील रामजी आंबेडकर यांचे निधन
- बडोदा संस्थान च्या महाराज सयाजीराव गायकवाडांच्या स्कॉलरशिप च्या आधारे अमेरिकेतील कोलंबिया विश्वविद्यालयात शिक्षण.
- आंबेडकर हे परदेशात अर्थशास्त्र विषयात पी.एच.डी पूर्ण करणारे पहिले भारतीय ठरले. पी.एच.डी साठी (भारताचा राष्ट्रीय लाभांश: इतिहासात्मक आणि विश्लेषणात्मक अध्ययन) द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया: अ हिस्टॉरीकल अँड ॲनलाटिकल स्टडी या विषयावर बाबासाहेबांनी प्रबंध लिहिला.
- आंबेडकरांचे शिक्षण – बि.ए. दोनदा एम. ए., पी.एच. डी., एम.एस्सी., Bar- At- Law डी. एस्सी., एल.एल. डी., डी.लिट. अशा डिग्र्या बाबासाहेबांनी तत्कालीन आर्थिक व सामाजिक विषमतेच्या विरोधी परिस्थितीत दिवसरात्र अभ्यासकरून परिस्थितीशी संघर्ष करून मिळविल्या होत्या.
- १९२२ या वर्षी ग्रेज इन येथून Bar- At- Law हि वकिलीची पदवी घेऊन ३ एप्रिल १९२३ रोजी मुंबईत परतले.
Dr Babasaheb Ambedkar- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उपजीविकेसाठी केलेली कामे व नोकऱ्या – (Bhimrao Ramji Ambedkar History)
- बडोदा संस्थानच्या करारानुसार दीडशे रुपये महिन्याने मिलिटरी सेक्रेटरी या पदावर जुलै १९१७ ला नोकरी स्वीकारली परंतु अस्पृश्य समाजाचे आहेत म्हणून कार्यालयात त्यांना अयोग्य वागणूक दिली जाऊ लागली. कार्यालयातील लोक सतत अपमानीत करू लागले. अस्पृश्य असल्याने बडोद्यात बाबासाहेबांना राहण्यासाठी जागा मिळाली नाही. त्यामुळे नोव्हेंबर १९१७ ला नोकरी सोडून मुंबईला परतावे लागले.
- वकिली पूर्ण करून आल्यावर बाबासाहेबांनी नाशिक जिल्ह्याच्या आडगाव येथील महार व्यक्ती जाधव यांची पहिली केस लढली ती केस वर्षभरात यशस्वीरित्या लढल्यावर यांना ६०० रुपये मिळाले.
- दोन पारशी मुलांना घरगुती शिकवणी देऊन दरमहा १०० रुपये मिळविले
- अर्थशास्त्र विषयातील प्रघाढ पंडित असलेल्या बाबासाहेबांनी व्यावसायिकांना सल्ले देण्याच्या उद्देशाने स्टॉक्स अँड शेअर्स ॲडव्हायझर्स नावाची कंपनी सुरू केली. परंतु हि कंपनी एका महार व्यक्तीची आहे हे समजल्यावर लोकांनी सल्ले घेण्यास येणे बंद केले बाबासाहेबांना कंपनी बंद करावी लागली.
- नंतर दावर्स कॉलेज ऑफ कॉमर्स या कॉलेज मध्ये अर्थशास्त्र, बँक व्यवहार व व्यापार विषयक कायदे या विषयाचे प्रोफेसर म्हणून काम सुरु केले येथे त्यांना दरमहा ५० रुपये महिना मिळाला.
Dr Babasaheb Ambedkar- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जातीवाद व अस्पृश्यता विरोधी कार्य – (Bhimrao Ramji Ambedkar History)
- भारतातील जातिवाद आणि अस्पृश्यता निर्मूलनाच्या लढ्यातील प्रथम आणि प्रमुख नेते म्हणजे डॉ. आंबेडकर होय.
- विविध जातीतील संघर्ष आणि तफावत कमी करून जातिवाद निर्मुलन करण्यासाठी त्यांनी तीन महत्वपूर्ण मार्ग सांगिलते
- लग्न – आंतरजातीय विवाह केले जावेत जेणेकरून जाती जातीत एकता निर्माण होईल.
- खानपान- विविध जातीच्या लोकांनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येवून जेवणे किंवा एकमेकांच्या घरी एकमेकांना बोलावून जेवणे म्हणजे जातीय सलोखा निर्माण होईल.
- सांस्कृतिक मिलाप- विविध जातीतील लोकांनी एकत्र येऊन सांस्कृतिक कार्यक्रम सामुहिक रित्या आयोजित करावे व सर्व जातीतील लोकांनी त्यामध्ये सहभाग घ्यावा.
- साउथबरो यांच्या अध्यक्षतेखाली मताधिकार समिती जेव्हा तत्कालीन मुंबई प्रांतात आली तेव्हा अस्पृश्यांचा प्रतिनिधी म्हणून गव्हरमेंट ऑफ इडिया कायदा १९१९ बद्दल आपली मते मांडली तसेच ५० पानांचे निवेदन मांडले ज्यामध्ये अस्पृश्यांसाठी महत्वाचे मुद्दे मांडले गेले जसे कि
- अस्पृशांना मतदानाचा हक्क मिळावा जो अगोदर मिळत नसे.
- त्यांना निवडणुकीस उभे राहता आले पाहिजे.
- त्यांच्या मतदारांना स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे.
- अस्पृश्यांचे अस्पृश्य प्रतिनिधी त्यांनीच निवडले पाहिजे
- अस्पृश्यांच्या मतदारसंघात अस्पृश्यांना त्यांच्या लोकसंख्येनुसार जागा मिळाव्यात
- आंबेडकरांच्या आदेशाने संपूर्ण भारतात अस्पृश्य लोक आंदोलन करू लागले
- १९२० साली कोल्हापूर जवळच्या माणगाव येथे २१ व २२ मार्च १९२० रोजी दक्षिण महाराष्ट्र दलित परिषदेचे पहिले अधिवेशन झाले तिथे आपल्या भाषणात अस्पृश्यांच्या उद्धारासाठी सामाजिक आणि राजकीय हक्कांचे समर्थन केले.१९२६ मध्ये सातारा येथे सातारा जिल्हा महार परिषदेचे अधिवेशन झाले त्यावेळी आपल्या भाषणात बाबासाहेबांनी महार वतनाविषयी माहिती देत अस्पृश्य समाजाने जातीवादी ब्राह्मणी विचारसरणीपासून दूर राहण्यास सांगितले
- मागासवर्गीय व अस्पृश्य समाजाच्या हितांचे रक्षण करण्यासठी बाबासाहेबांनी ९ मार्च १९२४ रोजी “बहिष्कृत हितकारिणी सभा” स्थापन केली.
डॉ. आंबेडकर आपल्या अस्पृश्य समाजाचा उद्धार करतील आणि आपल्या देशाचाही उद्धार करतील. ते फक्त अस्पृश्यांचेच नव्हे तर देशाचेही थोर राष्ट्रीय नेते होतील. त्यांच्या नेतृत्वाखाली अस्पृश्य समाजाने अवश्य आपला उद्धार करून घ्यावा. तसे घडले तर सर्वांचेच कल्याण होईल.
छत्रपती शाहू महाराज, २१ ते २२ मार्च १९२० माणगाव कोल्हापूर
Dr Babasaheb Ambedkar- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंदोलन
- चवदार तळे आंदोलन –
- अस्पृश्यांना सार्वजनिक ठिकाणचे पाणी वापरण्याचा हक्क नव्हता अशावेळी अस्पृश्यांना आपले हक्क मिळवून देण्यासाठी महाड येथील उच्चवर्णीय समाजाच्या विरोधात चवदार तळ्याचे पाणी सर्वप्रथम प्राशन केले मग सर्व अनुयायांनी तलावातील पाणी चाखले
- शिवजयंती व गणेशोत्सवात सहभाग
- मनुस्मृती चे दहन
- अंबादेवी मंदिर आंदोलन
- पर्वती मंदिर सत्याग्रह
- काळाराम मंदिर सत्याग्रह
“आज आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत. मंदिरात प्रवेश केल्यामुळे आपले प्रश्न सुटणार नाहीत. आपले प्रश्न राजकीय आहेत, सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि शैक्षणिक आहेत. काळाराम मंदिरात प्रवेश करणे म्हणजे हिंदू मनाला केलेले आवाहन आहे. उच्चवर्णीय हिंदूंनी आपल्याला आपल्या हक्कांपासून अनेक पिढ्यांपासून दूर ठेवले. आता तेच हिंदू आपल्याला आपला मानवी हक्क देतील का ? हा प्रश्न या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या माध्यमातून मी विचारत आहे. हिंदू मन हे आपल्याला एक मानव म्हणून स्वीकारावयास तयार आहे की नाही हा याची पडताळणी या सत्याग्रहाद्वारे होणार आहे.”
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, २ मार्च १९३० रोजी केलेले भाषण
Dr Babasaheb Ambedkar- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे “मूकनायक”
Dr Babasaheb Ambedkar- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९२० साली मूकनायक नावाचे पाक्षिक सुरु केले ज्याच्या माध्यमातून यांनी अस्पृश्य समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली व हा अन्याय कसा कमी होईल त्याच्या उपाययोजना शासनाला या माध्यमातून सुचवल्या.
- तसेच १९२४ साली बहिष्कृत भारत नावाचे वृत्तपत्र सुरु केले
- २९ जून १९२८ साली समता हे वृत्तपत्र सुरु केले
- २४ फेब्रुवारी १९३० रोजी जनता हे वृत्तपत्र सुरु केले
- ४ फेब्रुवारी १९५६ रोजी प्रबुद्ध भारत वृत्तपत्र सुरु केले
या सर्व वृत्तपत्रातून त्यांनी भारतीय समाजातील स्पृश्य – अस्पृश्यतेच्या समस्येवर आपले प्रखर विचार मांडले. समाजपरिवर्तनात या वृत्तपात्रांची प्रमुख भूमिका होती.
Bhimrao Ramji Ambedkar Education – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण व पदव्या
- बि.ए. (B.A.)
- दोनदा एम. ए. (Double MA)
- पी.एच. डी. (PhD)
- एम.एस्सी. (MSc)
- Bar- At- Law
- डी. एस्सी. (D.Sc.)
- एल.एल. डी., (LLD)
- डी.लिट (D.Lit)
Bhimrao Ramji Ambedkar Books – Dr Babasaheb Ambedkar- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके आणि शोध निबंध
Dr Babasaheb Ambedkar- बाबसाहेब आंबेडकर हे मराठी, पाली, संस्कृत, इंग्रजी, हिंदी, फ्रेंच, जर्मनी, गुजराती, बंगाली, पारसी आणि कन्नड इत्यादी भाषांचे जानकर होते. बाबासाहेबांनी एकूण २२ ग्रंथ आणि पुस्तिका, १० निवेदने साक्षी पुरावे, १० शोध निबंध, लेख आणि परीक्षणे इत्यादी सर्व इंग्रजी लेखनाचा साहित्य साठा आहे याव्यतिरिक्त त्यांची १० ग्रंथ अपुरे राहिलेले आहेत. त्यांच्या काही लेखनाची माहिती खाली दिली आहे.
| Federation Versus Freedom | Pakistan or Partition of India | Ranade, Gandhi and Jinnah |
| Waiting for a Visa (Autobiography) | Mr Gandhi and Emancipation of the Untouchables | What Congress and Gandhi Have done to the Untouchables |
| Communal Deadlock and way to solve it | Who were the Shudras? | The Buddha and His Dhamma |
| Riddles in Hinduism | Dictionary of the Pali (Pali – English) | The Pali Grammer |
| A People at Bay | Untouchables or Children of India’s Ghetto | Can I Be a Hindu? |
| What the Brahmins Have to the Hindus | Essay of Bhagwat Gita | India and Communism |
| Revolution and Counterrevolution in Ancient Inida | Buddha and Karl Marx | Constitution and Constituionalism |
| Annihilation of Caste |
Bhimrao Ramji Ambedkar Organizations Founded – Dr Babasaheb Ambedkar यांनी स्थापित केलेल्या संस्था व संघटना
- बहिष्कृत हितकारिणी सभा
- दलित शिक्षण संस्था
- पीपल्स एजुकेशन सोसायटी
Bhimrao Ramji Ambedkar Movies – डॉ आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट
| बालक आंबेडकर (१९९०) | बाळ भीमराव (२०१८) | ओरिजिन |
| डॉ आंबेडकर (१९९१ ) | युगपुरुष डॉ बाबासाहेब आंबेडकर (१९९३) | डॉ बि. आर. आंबेडकर (२००५) |
| भीम गर्जना (१९९०) | पेरियार (२००७) | रमाबाई भीमराव आंबेडकर (२०११) |
| शुद्र :- द रायजिंग (२०१२) | अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध (२०१३ ) | रमाबाई (२०१६ ) |
| बोले इंडिया जय भीम (२०१६) | रमाई (२०१९) | सरणं गच्छामि (२०१७) |
| जोशी कि कांबळे (२००८) | डेबु (२०१०) | डॉ बाबासाहेब आंबेडकर (२०००) |
Bhimrao Ramji Ambedkar Died – डॉ बाबासाहेब आंबेडकर मृत्यू
Bhimrao Ramji Ambedkar डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाचे ६ डिसेंबर १९५६ रोजी महापरिनिर्वाण झाले परंतु त्यांनी आपल्या अस्पृश्य आणि मागासलेल्या समाजाला त्यांचे न्याय हक्क, स्वधर्म आणि स्वाभिमान अगोदरच मिळवून दिला होता . अशा या महामानवाला मनाचा मुजरा.
Dr Ambedkar Quotes
मी अस्पृश्य जातीत हिंदू म्हणून जन्माला आलो ते माझ्या हाती नव्हते, पण हिंदू म्हणून मरणार नाही!
डॉ बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर- Dr Babasaheb Ambedkar यांच्या जीवनावर आधारित इन्टरनेट वरील व्हिडीओ लिंक खाली दिल्या आहेत.
बाबासाहेब आंबेडकर यांची दुर्मिळ बीबीसी मुलाखत
B R Ambedkar: वो भीमराव बाबासाहेब अम्बेडकर जिन्हें आप नहीं जानते होंगे (BBC Hindi)
DNA: धर्मनिरपेक्षता पर क्या सोचते थे BR Ambedkar? | BR Ambedkar’s views on secularism?
आमच्या इतर ब्लॉगसाठी येथे क्लिक करा.
महात्मा फुले जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा – Mahatma Fule
Mahavir Jayanti- भगवान महावीर जयंती !
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या सर्वांना शिवमय मंगल शुभेच्छा ! – Shivaji Maharaj
Mahaparinirvan Din- महापरिनिर्वाण दिन
गुरु गोबिंद सिंह: एक प्रेरणादायी जीवन प्रवास- Gurugovindsingh
” (Gurunanak) गुरु नानक देवजींच्या जीवनातील सत्य आणि प्रकाश”
