Liquefied Petroleum Gas (LPG) गॅस बाबत सरकारची महत्वपूर्ण प्रेस कॉन्फरंस ! जनतेला केले अवाहन !

Vishal Patole
Liquefied Petroleum Gas

नवी दिल्ली – देशभरात एलपीजी (Liquefied Petroleum Gas) संदर्भात निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे. Press Information Bureau (PIB India) मार्फत देण्यात आलेल्या माहितीनुसार, व्यावसायिक एलपीजीच्या वाटपात तब्बल ७० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे देशात एलपीजीचा कोणताही तुटवडा नसून नागरिकांनी घाबरून सिलिंडर खरेदी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या Ministry of Petroleum and Natural Gas अंतर्गत संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी स्पष्ट केले की, काही ठिकाणी अजूनही “panic buying” म्हणजेच घाबरून मोठ्या प्रमाणावर सिलिंडर खरेदी केली जात आहे. मात्र, प्रत्यक्षात सर्व वितरकांकडे पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि कोणत्याही ठिकाणी एलपीजी संपलेली (dry out) परिस्थिती नाही. त्या पुढे म्हणाल्या की, एलपीजी वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी ९३ टक्के सिलिंडर वितरण ‘ऑथेंटिकेशन कोड’च्या माध्यमातून केले जात आहे. या प्रणालीमुळे ग्राहकांना योग्य आणि सुरक्षित पद्धतीने सिलिंडर मिळत असल्याची खात्री केली जात आहे.

Liquefied Petroleum Gas बाबत मागील महिन्याची आकडेवारी

एप्रिल महिन्याच्या आकडेवारीबाबत बोलताना सुजाता शर्मा यांनी सांगितले की, या महिन्यात आतापर्यंत सुमारे १,६५,००० टनांहून अधिक व्यावसायिक (Liquefied Petroleum Gas) एलपीजीची विक्री झाली आहे. ही आकडेवारी देशातील मागणी पूर्ण करण्यासाठी पुरवठा सक्षम असल्याचे दर्शवते. दरम्यान, सरकारकडून पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले आहे की, देशात एलपीजीचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता नियमित गरजेनुसारच सिलिंडर खरेदी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. एलपीजीचा पुरवठा मुबलक असून वितरण व्यवस्थाही व्यवस्थित सुरू आहे. त्यामुळे कोणतीही भीती न बाळगता सामान्य पद्धतीनेच वापर आणि खरेदी करावी, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

समाज माध्यमावरील प्रतिक्रियेसाठी येथे क्लिक करा.

आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :

बातमीन्यूज

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
प्रतिक्रिया नाहीत

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत