पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांवर आणि Masood Azhar , हाफिज सईद सारख्या दहशतवाद्यांवर दबाव वाढत असल्याचे स्पष्ट संकेत देणारी आणखी एक मोठी घटना समोर आली आहे. लष्कर-ए-तैयबा (LeT) शी संबंधित टॉप कमांडर दहशतवादी शेख युसुफ आफ्रिदी याचा २६ एप्रिल २०२६ रोजी खैबर पख्तूनख्वा प्रांतात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडून खून केला. स्थानिक पोलिस आणि माध्यमांच्या माहितीनुसार, आफ्रिदीवर अचानक हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी त्याच्यावर जवळून अनेक गोळ्या झाडल्या, ज्यामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही आणि तपास सुरू आहे. शेख युसुफ आफ्रिदी हा लष्कर-ए-तैयबाचा महत्त्वाचा कमांडर मानला जात होता मुंबई २६/११ हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदचा जवळचा सहकारी होता. खैबर पख्तूनख्वा भागात संघटनेचे नेटवर्क मजबूत करण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती दहशतवादी भरती, प्रशिक्षण आणि ऑपरेशन्स समन्वयात त्याची भूमिका महत्त्वाची होती. आफ्रिदीचा खून हा एकटाच प्रकार नसून, गेल्या काही महिन्यांत अशा प्रकारच्या अनेक लक्ष्यित हल्ल्यांची मालिका दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर (ISI) या गुप्तचर संस्थेने Masood Azhar या जैश-ए-मोहम्मदच्या प्रमुखाला अत्यंत सुरक्षित आणि गुप्त ठिकाणी हलविल्याच्या चर्चा विविध माध्यमांमध्ये समोर येत आहे.

पाकिस्तानात “अज्ञात बंदूकधारी” हल्ल्यांना घाबरून जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर Masood Azhar लपला बिळात
आफ्रिदीचा खून हा एकटाच प्रकार नसून, गेल्या काही महिन्यांत अशा प्रकारच्या अनेक लक्ष्यित हल्ल्यांची मालिका दिसून येत आहे. २०२६ मध्येच अनेक दहशतवाद्यांचा संशयास्पद मृत्यू लाहोर, कराची आणि इतर भागांत समान पद्धतीने हत्या या घटनांमुळे पाकिस्तानातील दहशतवादी नेटवर्कमध्ये भीती आणि अस्थिरता निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम देशातील दहशतवादी नेटवर्कवर स्पष्टपणे दिसून येत आहे. अशा पार्श्वभूमीवर, Inter-Services Intelligence (ISI) या गुप्तचर संस्थेने Masood Azhar या जैश-ए-मोहम्मदच्या प्रमुखाला अत्यंत सुरक्षित आणि गुप्त ठिकाणी हलविल्याच्या चर्चा विविध माध्यमांमध्ये समोर येत आहेत. मागील काही दिवसांत अज्ञात हल्लेखोरांनी दहशतवादी संघटनांशी संबंधित व्यक्तींना लक्ष्य केल्याच्या घटना वाढल्या असून, त्यामुळे अशा संघटनांमध्ये अस्वस्थता आणि असुरक्षिततेची भावना वाढली आहे. या पार्श्वभूमीवर, महत्त्वाच्या नेत्यांचे संरक्षण वाढवणे आणि त्यांना गुप्त ठिकाणी हलवणे हा ISI चा धोरणात्मक निर्णय असल्याचे मानले जात आहे. पाकिस्तानात अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून दहशतवाद्यांवर होत असलेल्या सलग हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच खैबर पख्तूनख्वा हा भाग आधीपासूनच दहशतवादी कारवायांसाठी संवेदनशील मानला जातो. अलीकडील अहवालांनुसार, या प्रदेशात सुरक्षा दल, दहशतवादी आणि नागरिक यांच्यातील संघर्ष वाढत आहे.
Masood Azhar संबंधित बातम्यांवर पाकिस्तानात बंदी
पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर Masood Azhar याच्याबाबत सध्या विविध दावे आणि चर्चांना उधाण आले आहे. काही माध्यम अहवालांनुसार, स्थानिक पाकिस्तानी मीडियाला त्याच्याविषयी संवेदनशील बातम्या प्रसारित न करण्याच्या सूचना दिल्याची चर्चा रंगली आहे. यासोबतच त्याच्या प्रकृतीबाबतही वेगवेगळे दावे समोर येत आहेत. अलीकडील वृत्तांनुसार, अझहर दीर्घकाळापासून गंभीर आजाराने त्रस्त असल्याचे सांगितले जात असून त्याची प्रकृती अधिकच खालावल्याचे काही दावे करण्यात आले आहेत; मात्र या दाव्यांची स्वतंत्ररीत्या अधिकृत पुष्टी झालेली नाही.
समाज माध्यमावरील प्रतिक्रियेसाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
