
राज्यातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांपैकी एक असलेल्या यशवंतराव चव्हाण मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग वर ‘कनेक्टिंग लिंक’ (मिसिंग लिंक) (Mumbai Pune Missing Link) प्रकल्पाचा एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला असून, त्याचे नुकतेच उद्घाटन करून वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहे. या नव्या मार्गामुळे प्रवासाचा वेळ कमी होण्याबरोबरच वाहतुकीचा ताणही कमी होणार आहे. मात्र, या मार्गावर काही वाहनचालक आणि प्रवासी सेल्फी व फोटो काढण्यासाठी वाहन थांबवत असल्याचे निदर्शनास आले असून प्रशासनाने याबाबत गंभीर इशारा दिला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) आणि वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, द्रुतगती मार्गावर कोणत्याही परिस्थितीत वाहन थांबवण्यास परवानगी नाही. विशेषतः केबल-स्टेड पुल आणि बोगद्यांच्या परिसरात वाहन थांबवून फोटो किंवा व्हिडिओ काढणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. अशा प्रकारचे कृत्य अपघातांना कारणीभूत ठरू शकते, त्यामुळे नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
(Mumbai Pune Missing Link) या ‘कनेक्टिंग लिंक’ प्रकल्पात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
(Mumbai Pune Missing Link) या ‘कनेक्टिंग लिंक’ प्रकल्पात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दोन बोगदे आणि दोन भव्य पूल उभारण्यात आले आहेत. हे सर्व भाग २४x७ सीसीटीव्ही देखरेखीखाली ठेवण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई केली जाणार आहे. महाराष्ट्र महामार्ग पोलीस यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, बोगद्यांमध्ये हलक्या वाहनांसाठी कमाल वेग मर्यादा १०० किमी/तास ठेवण्यात आली आहे, तर बस आणि इतर प्रवासी वाहनांसाठी ही मर्यादा ८० किमी/तास आहे. या वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यास तसेच अनधिकृतरीत्या वाहन थांबवल्यास मोठ्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. प्रशासनाने स्पष्टपणे सांगितले आहे की, सोशल मीडियासाठी रील्स, फोटो किंवा सेल्फी काढण्याच्या नादात स्वतःचा आणि इतर प्रवाशांचा जीव धोक्यात घालणे योग्य नाही. सुरक्षित आणि सुरळीत प्रवासासाठी वाहतूक नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. दरम्यान, ‘कनेक्टिंग लिंक’मुळे मुंबई–पुणे (Mumbai Pune Missing Link) प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि आरामदायी होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, यासाठी नागरिकांची जबाबदारी आणि शिस्तही तितकीच महत्त्वाची असल्याचे प्रशासनाने अधोरेखित केले आहे.
समाज माध्यमावरील प्रतिक्रियेसाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
