UPSC ने National Defence Academy (NDA) – NDA Exam आणि Naval Academy (NA) Examination-II 2026 ची अधिकृत अधिसूचना जाहीर केली असून देशभरातील तरुणांसाठी संरक्षण दलात अधिकारी बनण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. Army, Navy आणि Air Force मध्ये अधिकारी पदांसाठी एकूण 394 जागांची भरती या परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे. UPSC ने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार अर्ज प्रक्रिया 20 मे 2026 पासून सुरू झाली असून उमेदवार 9 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत. NDA-NA परीक्षा 13 सप्टेंबर 2026 रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे.

NDA Exam २०२६ मधून 394 पदांसाठी भरती; मुला-मुलींना संधी
UPSC ने जाहीर केलेल्या जागांनुसार NDA आणि Naval Academy मध्ये मिळून एकूण 394 पदे भरली जाणार आहेत. यामध्ये Army, Navy, Air Force Flying Branch, Ground Duty आणि Naval Academy यांचा समावेश आहे.
पदांचे तपशील
- Army Wing – 208 जागा
- Navy Wing – 42 जागा
- Air Force Flying – 92 जागा
- Air Force Ground Duty (Tech) – 18 जागा
- Air Force Ground Duty (Non-Tech) – 10 जागा
- Naval Academy (10+2 Cadet Entry Scheme) – 24 जागा
NDA Exam २०२६ : कोण अर्ज करू शकतात?
या भरतीसाठी अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवारांचा जन्म 1 जानेवारी 2008 पूर्वी आणि 1 जानेवारी 2011 नंतर झालेला नसावा.
शैक्षणिक पात्रता
- Army Wing साठी – 12वी उत्तीर्ण
- Navy आणि Air Force साठी – 12वी Physics, Chemistry आणि Mathematics (PCM) सह उत्तीर्ण
- 12वीची परीक्षा देणारे विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात.
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन
उमेदवारांना UPSC च्या ऑनलाइन पोर्टलवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. अर्जासाठी Universal Registration Number (URN), Common Application Form (CAF) आणि Exam Specific Module भरावे लागणार आहे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा.
UPSC ने उमेदवारांना आधार कार्ड वापरण्याचा सल्ला दिला आहे. तसेच Live Photo Capture आणि Signature Upload प्रक्रिया देखील अनिवार्य करण्यात आली आहे.
NDA Exam २०२६ परीक्षा पद्धत कशी असेल?
NDA परीक्षेत दोन पेपर असतील:
| विषय | गुण | कालावधी |
| गणित | 300 | 2.5 तास |
| जनरल ॲबिलिटी टेस्ट (GAT) | 600 | 2.5 तास |
- एकूण लेखी परीक्षा 900 गुणांची असेल. त्यानंतर SSB Interview देखील 900 गुणांचा होणार आहे.
- निगेटिव्ह मार्किंगची महत्त्वाची सूचना- UPSC ने स्पष्ट केले आहे की Objective Type प्रश्नपत्रिकेत चुकीच्या उत्तरांसाठी Negative Marking लागू असेल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक-तृतीयांश गुण वजा केले जातील.
NDA Exam २०२६ – परीक्षा केंद्रांची मोठी यादी जाहीर
देशभरातील 86 शहरांमध्ये परीक्षा घेतली जाणार आहे. महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे परीक्षा केंद्रे असणार आहेत.
NDA Exam २०२६ : मोबाईल आणि स्मार्ट वॉचवर बंदी
परीक्षा केंद्रात मोबाईल फोन, स्मार्ट वॉच, ब्लूटूथ डिव्हाइस, कॅलक्युलेटर किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण नेण्यास कडक बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारांवर कठोर कारवाई केली जाईल.
e-Admit Card कधी मिळणार?
UPSC ने सांगितले की परीक्षा सुरू होण्याच्या आधीच्या आठवड्यात e-Admit Card अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होईल. Admit Card पोस्ट किंवा ईमेलने पाठवले जाणार नाही. उमेदवारांनी ते स्वतः डाउनलोड करावे लागेल.
SSB Interview आणि निवड प्रक्रिया
लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना Services Selection Board (SSB) Interview साठी बोलावले जाईल. SSB मध्ये Intelligence Test, Psychology Test, Group Tasks आणि Personality Assessment घेतले जाणार आहेत.
अर्ज शुल्क किती?
- General/OBC/EWS उमेदवार – ₹100
- SC/ST आणि महिला उमेदवार – शुल्क माफ
NDA Exam २०२६ : महत्त्वाच्या तारखा
| ऑनलाईन अर्जाची सुरुवात | 20 मे 2026 |
| ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख | 9 जून 2026 |
| परीक्षा तारीख | 13 सप्टेंबर 2026 |
देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी NDA -2 2026 ही मोठी संधी मानली जात आहे. UPSC च्या या भरती प्रक्रियेमुळे भारतीय सैन्य दलात अधिकारी होण्याचा मार्ग खुला झाला असून इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
