
भारतातील झारखंडमधील अवघ्या सात वर्षांच्या इशांक सिंहने अद्वितीय असा पराक्रम करत पाल्क सामुद्रधुनी (Palk Strait) पोहत पार केली आहे. ३० एप्रिल रोजी त्याने सुमारे २९ किलोमीटरचा खुल्या समुद्रातील प्रवास केवळ ९ तास ५० मिनिटांत पूर्ण केला. या विक्रमाची नोंद Universal Records Forum (URF) यांनी घेतली असून, इशांकला ‘पाल्क सामुद्रधुनी पार करणारा सर्वात तरुण आणि सर्वात वेगवान जलतरणपटू’ असा किताब देण्यात आला आहे. ही धाडसी जलतरण मोहिम Talaimannar (श्रीलंका) येथून सुरू होऊन Dhanushkodi (तामिळनाडू, भारत) येथे समाप्त झाली. (Palk Strait) पाल्क सामुद्रधुनी ही India आणि Sri Lanka यांच्यामधील अरुंद समुद्री पट्टा असून, येथे प्रचंड वेगवान समुद्री प्रवाह, अनिश्चित हवामान आणि लाटांची तीव्रता यामुळे जलतरण करणे अत्यंत कठीण मानले जाते. तज्ज्ञांच्या मते, या मार्गावर पोहणे हे जगातील सर्वात आव्हानात्मक खुल्या समुद्रातील जलतरणांपैकी एक आहे. अनेक अनुभवी जलतरणपटूंनाही या मार्गावर अपयश येते. अशा परिस्थितीत, केवळ सात वर्षांच्या मुलाने हा पराक्रम करून केवळ देशाचाच नव्हे तर जगाचाही गौरव वाढवला आहे. इशांकच्या या यशामागे त्याची कठोर मेहनत, नियमित सराव आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. लहान वयातच त्याने समुद्रातील लाटा, प्रवाह आणि हवामानातील बदल यांचा सामना करण्याचे प्रशिक्षण घेतले होते. या विक्रमामुळे त्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकले आहे. इशांक सिंहच्या या ऐतिहासिक यशामुळे भारतातील युवा खेळाडूंना मोठी प्रेरणा मिळाली आहे. त्याच्या धैर्य, चिकाटी आणि जिद्दीमुळे भविष्यात अशाच अनेक विक्रमांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
समाज माध्यमावरील प्रतिक्रियेसाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
