Railway Job Vacancy : रेल्वेत सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. South East Central Railway अंतर्गत नागपूर विभाग आणि मोतीबाग वर्कशॉप येथे अप्रेंटिस पदांसाठी तब्बल 1079 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. Apprentice Act 1961 आणि Apprenticeship Rules 1992 अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 19 मे 2026 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 जून 2026 रात्री 11:59 वाजेपर्यंत आहे. उमेदवारांना अधिकृत NAPS पोर्टलवरून अर्ज करावा लागणार आहे.

Railway Job Vacancy : एकूण 1079 जागांची भरती
जाहिरातीनुसार नागपूर विभागात 977 जागा तर मोतीबाग वर्कशॉपमध्ये 102 जागा भरल्या जाणार आहेत. सर्वाधिक जागा Electrician, COPA आणि Fitter या ट्रेडसाठी आहेत. नागपूर विभागात Electrician साठी 267, COPA साठी 158 आणि Fitter साठी 90 जागा उपलब्ध आहेत. तसेच Mechanic Diesel, Wireman, Carpenter, Welder, Plumber, Painter, Electronics Mechanic, Stenographer, Mason, Cable Jointer यांसारख्या विविध ट्रेडमध्येही भरती होणार आहे.
Railway Job Vacancy : पात्रता
शैक्षणिक पात्रता काय?
या भरतीसाठी उमेदवार किमान 50 टक्के गुणांसह 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यासोबत संबंधित ट्रेडमधील ITI (NCVT/SCVT) प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. अर्ज करताना उमेदवारांनी 10वी आणि ITI चे गुण अचूक भरावेत, अन्यथा अर्ज थेट बाद केला जाईल, असे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
वयोमर्यादा आणि सवलत
19 मे 2026 रोजी उमेदवारांचे वय किमान 15 वर्षे आणि कमाल 24 वर्षे असावे. SC/ST उमेदवारांना 5 वर्षांची तर OBC उमेदवारांना 3 वर्षांची वयोमर्यादा सवलत देण्यात आली आहे. दिव्यांग आणि माजी सैनिक उमेदवारांना 10 वर्षांची सूट मिळणार आहे.
Railway Job Vacancy – निवड प्रक्रिया कशी होणार?
या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड 10वी आणि ITI मधील गुणांच्या आधारे तयार करण्यात येणाऱ्या मेरिट लिस्टद्वारे केली जाणार आहे. दोन उमेदवारांचे गुण समान असल्यास जास्त वय असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.
प्रशिक्षण कालावधी आणि स्टायपेंड
निवड झालेल्या उमेदवारांना एक वर्षाचे अप्रेंटिस प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण काळात रेल्वेच्या नियमानुसार स्टायपेंडही दिले जाईल. मात्र अप्रेंटिसशिप पूर्ण झाल्यानंतर कायम नोकरीची हमी दिली जाणार नसल्याचे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.
Railway Job Vacancy महत्त्वाच्या सूचना
उमेदवारांना नागपूर विभाग किंवा मोतीबाग वर्कशॉप यापैकी एकच पर्याय निवडावा लागणार आहे. अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. चुकीची माहिती किंवा बनावट कागदपत्रे आढळल्यास उमेदवारी तत्काळ रद्द केली जाईल. तसेच पूर्वी कोणत्याही संस्थेत अप्रेंटिसशिप केलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करता येणार नाही.
रेल्वेतील करिअरसाठी मोठी संधी
10वी आणि ITI पूर्ण केलेल्या युवकांसाठी ही भरती मोठी संधी मानली जात आहे. विशेषतः तांत्रिक ट्रेडमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना रेल्वेच्या अनुभवी वातावरणात प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. सरकारी क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य वाढवण्यासाठी ही अप्रेंटिस भरती महत्त्वाची ठरणार आहे.
अधिकृत जाहिराठीसाठी येथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
