SBI Clerk Recruitment 2026: भारतीय स्टेट बँक अर्थात State Bank of India (SBI) ने लिपिक संवर्गातील ज्युनियर असोसिएट (Customer Support & Sales) पदांसाठी विशेष भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. SBI च्या Central Recruitment & Promotion Department मार्फत ही भरती करण्यात येत असून, एकूण 1,538 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी जाहिरात क्र. CRPD/CR/SPLDRIVE/2026-27/16 जारी करण्यात आली आहे. ही विशेष भरती प्रामुख्याने SC/ST/OBC अनुशेष (Backlog) रिक्त पदांसाठी आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 7 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 ऑगस्ट 2026 आहे. उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज तसेच शुल्क भरणे आवश्यक आहे. पूर्व परीक्षा सप्टेंबर 2026 मध्ये, तर मुख्य परीक्षा ऑक्टोबर/नोव्हेंबर 2026 मध्ये होण्याचे जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे.

1,538 जागांसाठी SBI Clerk भरती
या भरतीमध्ये Junior Associate (Customer Support & Sales) या पदासाठी एकूण 1,538 पदे उपलब्ध आहेत. जाहिरातीनुसार प्रवर्गनिहाय एकूण जागांमध्ये SC – 207, ST – 1,219 आणि OBC – 112 अशा एकूण 1,538 जागांचा समावेश आहे. रिक्त पदांची संख्या बँकेच्या प्रत्यक्ष गरजेनुसार बदलू शकते, असे SBI ने स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रासाठी किती जागा?
महाराष्ट्रातील Maharashtra Circle/Mumbai Metro Circle अंतर्गत 165 पदे उपलब्ध आहेत. या पदांसाठी स्थानिक भाषा मराठी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी ही भरती विशेष महत्त्वाची आहे.
महाराष्ट्रातील परीक्षेसाठी अमरावती, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई/ठाणे/नवी मुंबई/MMR, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि चंद्रपूर अशी परीक्षा केंद्रे जाहिरातीत देण्यात आली आहेत.
शैक्षणिक पात्रता काय?
या पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारमान्य समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता 31 डिसेंबर 2026 रोजी पूर्ण झालेली असणे आवश्यक आहे.
पदवीच्या अंतिम वर्षात किंवा अंतिम सत्रात असलेले विद्यार्थीही या भरतीसाठी तात्पुरत्या स्वरूपात अर्ज करू शकतात. मात्र निवड झाल्यास त्यांना 31 डिसेंबर 2026 पर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा पुरावा सादर करावा लागेल.
वयोमर्यादा आणि सवलत
उमेदवाराचे वय 1 एप्रिल 2026 रोजी किमान 20 वर्षे आणि कमाल 28 वर्षे असावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म 2 एप्रिल 1998 ते 1 एप्रिल 2006 या कालावधीत झालेला असावा.
प्रवर्गानुसार कमाल वयोमर्यादेत सवलत पुढीलप्रमाणे आहे:
- OBC: 3 वर्षे
- SC/ST: 5 वर्षे
- PwBD (OBC): 13 वर्षे
- PwBD (SC/ST): 15 वर्षे
- Ex-Servicemen/Disabled Ex-Servicemen: नियमानुसार सवलत
- काही पात्र विधवा, घटस्फोटित किंवा न्यायालयीनरीत्या विभक्त महिलांना नियमानुसार 7 वर्षांची सवलत लागू आहे.
महत्त्वाची अट: एका राज्यासाठीच अर्ज
SBI Clerk भरतीमध्ये उमेदवाराला फक्त एका State/UT मधील रिक्त पदांसाठी अर्ज करता येईल. संबंधित राज्यासाठी अर्ज करताना त्या राज्यासाठी नमूद केलेल्या स्थानिक भाषेचे वाचन, लेखन, बोलणे आणि आकलन यांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. महाराष्ट्रासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी स्थानिक भाषा मराठी आहे. उमेदवाराने इयत्ता 10वी किंवा 12वीमध्ये संबंधित स्थानिक भाषा शिकल्याचे प्रमाणपत्र/गुणपत्रिका सादर केली असल्यास स्वतंत्र स्थानिक भाषा चाचणी द्यावी लागणार नाही. अन्यथा मुख्य परीक्षेनंतर आणि नियुक्तीपूर्वी Local Language Proficiency Test (LLPT) द्यावी लागेल. ही चाचणी उत्तीर्ण न झाल्यास नियुक्ती दिली जाणार नाही.
SBI Clerk निवड प्रक्रिया कशी असेल?
SBI Clerk 2026 ची निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत होणार आहे:
1. पूर्व परीक्षा (Preliminary Examination)
2. मुख्य परीक्षा (Main Examination)
3. स्थानिक भाषा प्रावीण्य चाचणी (Local Language Proficiency Test)
पूर्व परीक्षा ऑनलाइन पद्धतीने 100 गुणांची आणि एक तासाची असेल. त्यामध्ये इंग्रजी भाषा, संख्यात्मक क्षमता आणि तर्कशक्ती या तीन विभागांचा समावेश असेल. इंग्रजी भाषेसाठी 30 प्रश्न/30 गुण, Numerical Ability साठी 35 प्रश्न/35 गुण आणि Reasoning Ability साठी 35 प्रश्न/35 गुण असतील. प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र 20 मिनिटांचा वेळ दिला जाईल. चुकीच्या उत्तरासाठी 1/4 गुणांची निगेटिव्ह मार्किंग असेल.
SBI Clerk मुख्य परीक्षा 200 गुणांची
मुख्य परीक्षा एकूण 200 गुणांची असून त्यासाठी 2 तास 40 मिनिटे वेळ दिला जाईल. परीक्षेत पुढील चार विभाग असतील:
- General/Financial Awareness – 50 प्रश्न, 50 गुण
- General English – 40 प्रश्न, 40 गुण
- Quantitative Aptitude – 50 प्रश्न, 50 गुण
- Reasoning Ability & Computer Aptitude – 50 प्रश्न, 60 गुण
मुख्य परीक्षेतही चुकीच्या उत्तरासाठी संबंधित प्रश्नाच्या गुणांच्या 1/4 गुणांची कपात केली जाईल.
महत्त्वाचे म्हणजे पूर्व परीक्षेतील गुण अंतिम गुणवत्ता यादीसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत. अंतिम गुणवत्ता यादी तयार करताना मुख्य परीक्षेतील गुणांचा विचार केला जाईल. गुणवत्ता यादी राज्यनिहाय आणि प्रवर्गनिहाय तयार केली जाईल.
SBI Apprentice उमेदवारांना अतिरिक्त फायदा
SBI मध्ये प्रशिक्षित Apprentice उमेदवारांसाठी या भरतीमध्ये विशेष तरतूद आहे. पात्र SBI Trained Apprenticesना मुख्य परीक्षेच्या कमाल 200 गुणांपैकी 5 बोनस गुण म्हणजेच 2.5 टक्के अतिरिक्त गुण दिले जातील. मात्र त्यासाठी जाहिरातीत नमूद केलेल्या प्रशिक्षण व शाखेतील अनुभवाच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.
SBI Clerk पगार किती?
Junior Associate पदासाठी वेतनश्रेणी ₹24,050 ते ₹64,480 अशी आहे. पदवीधर उमेदवारांना दोन अतिरिक्त वेतनवाढी लागू असल्याने सुरुवातीचा Basic Pay ₹26,730 असेल.
SBI च्या जाहिरातीनुसार मुंबईसारख्या मेट्रो शहरात नव्याने नियुक्त झालेल्या Clerical Cadre कर्मचाऱ्यांचे सुरुवातीचे एकूण वेतन सध्याच्या दरानुसार सुमारे ₹46,000 प्रति महिना असू शकते. यामध्ये DA, इतर भत्ते आणि पदवीधरांसाठी लागू असलेल्या दोन अतिरिक्त वेतनवाढींचा समावेश आहे. पोस्टिंगच्या ठिकाणानुसार भत्त्यांमध्ये फरक पडू शकतो. याशिवाय बँकेच्या नियमांनुसार Provident Fund, New Pension Scheme, वैद्यकीय सुविधा, Leave Fare आणि इतर सुविधा उपलब्ध असतील.
अर्ज शुल्क किती?
या विशेष भरतीसाठी अर्ज शुल्क पुढीलप्रमाणे आहे:
- OBC: ₹750
- SC/ST/PwBD/XS/DXS: शुल्क नाही
भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.
अर्ज कसा करायचा?
उमेदवारांना फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी SBI च्या अधिकृत Career वेबसाइटवरील Junior Associates Recruitment विभागाचा वापर करावा. अर्ज करताना फोटो, स्वाक्षरी, डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा आणि हस्तलिखित घोषणापत्राची स्कॅन प्रत आवश्यक आहे. अर्ज भरताना उमेदवारांनी नाव, जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता, प्रवर्ग, राज्य/UT आणि स्थानिक भाषा यांची माहिती अत्यंत काळजीपूर्वक भरावी. अर्ज अंतिमरित्या सबमिट केल्यानंतर माहितीमध्ये बदल करण्याची सुविधा उपलब्ध नसल्याचे SBI ने स्पष्ट केले आहे.
SBI Clerk भरती २०२६ महत्त्वाच्या तारखा
| तपशील | तारीख |
| जाहिरात प्रसिद्ध | 7 ऑगस्ट 2026 |
| ऑनलाइन अर्ज सुरू | 7 ऑगस्ट 2026 |
| ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख | 27 ऑगस्ट 2026 |
| पूर्व परीक्षा | सप्टेंबर 2026 (तात्पुरती) |
| मुख्य परीक्षा | ऑक्टोबर/नोव्हेंबर 2026 (तात्पुरती) |
SBI च्या जाहिरातीनुसार पूर्व परीक्षा सप्टेंबर 2026 मध्ये आणि मुख्य परीक्षा ऑक्टोबर/नोव्हेंबर 2026 मध्ये होण्याची शक्यता आहे.
उमेदवारांनी ही महत्त्वाची बाब लक्षात घ्या
ही सामान्य SBI Clerk भरती नसून SC/ST/OBC अनुशेष रिक्त पदांसाठी विशेष भरती मोहीम आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आपली प्रवर्गनिहाय पात्रता आणि संबंधित राज्यातील रिक्त पदे काळजीपूर्वक तपासणे आवश्यक आहे. OBC उमेदवारांसाठी Non-Creamy Layer संदर्भातील अटी लागू आहेत.
तसेच उमेदवाराला एका राज्य/UT साठीच अर्ज करता येणार असून निवड झाल्यास संबंधित राज्यातच नियुक्ती केली जाईल. या पदांसाठी सामान्यतः Inter-State/Inter-Circle Transfer ची तरतूद नाही; मात्र महाराष्ट्रातील Mumbai Metro Circle आणि Maharashtra Circle यांच्यात तसेच उत्तर प्रदेशातील संबंधित दोन Circlesमध्ये नियमांनुसार Intra-State transferची मर्यादित तरतूद आहे.
नवीन Junior Associatesना ग्राहकांशी संपर्क, बँकिंग सेवा, सल्लागार सेवा आणि विविध बँकिंग उत्पादनांचे cross-selling यांसारखी कामे करावी लागू शकतात. आवश्यकतेनुसार बाहेर जाऊन ग्राहकांशी संपर्क साधणे, प्रवास तसेच शिफ्टमध्ये काम करणेही पदाच्या जबाबदाऱ्यांचा भाग असू शकतो.
SBI Clerk Bharti 2026: थोडक्यात
- पद: Junior Associate (Customer Support & Sales)
- एकूण पदे: 1,538
- महाराष्ट्रातील पदे: 165
- शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी
- वय: 20 ते 28 वर्षे (1 एप्रिल 2026 रोजी)
- OBC वयोसवलत: 3 वर्षे
- SC/ST वयोसवलत: 5 वर्षे
- OBC शुल्क: ₹750
- SC/ST/PwBD/XS/DXS: शुल्क नाही
- अर्ज पद्धत: ऑनलाइन
- अर्जाची अंतिम तारीख: 27 ऑगस्ट 2026
- पूर्व परीक्षा: सप्टेंबर 2026
- मुख्य परीक्षा: ऑक्टोबर/नोव्हेंबर 2026
- महाराष्ट्राची स्थानिक भाषा: मराठी
- सुरुवातीचे Basic Pay: ₹26,730
- मुंबईत अंदाजे सुरुवातीचे एकूण वेतन: सुमारे ₹46,000 प्रति महिना
SBI Clerk अर्ज लिंक
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी SBI च्या अधिकृत जाहिरातीतील पात्रता, राज्यनिहाय जागा आणि प्रवर्गाच्या अटी तपासाव्यात. SBI ने भरतीसंदर्भातील पुढील सर्व अधिकृत सूचना आपल्या अधिकृत Career पोर्टलवर प्रसिद्ध करण्याचे नमूद केले आहे.
ऑनलाइन अर्ज: SBI Clerk 2026 Online Application
अधिकृत SBI Career Portal: SBI Careers – Current Openings
टीप: या जाहिरातीत उमेदवारांना बाहेरील coaching platform, consultancy किंवा guaranteed selectionचा दावा करणाऱ्या व्यक्तींवर/चॅनेलवर अवलंबून राहू नये, असे SBI ने स्पष्ट केले आहे. भरतीसंदर्भातील अधिकृत माहिती SBI च्या Career Portalवरच तपासावी.
अधिकृत जाहिराती साठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
