चंद्र मोहिमेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानल्या जाणाऱ्या Artemis II मोहिमेशी संबंधित एक, Orion capsule ‘ओरायन’ अंतराळ कॅप्सूलचे पॅसिफिक महासागरात सुरक्षित स्प्लॅशडाउन करण्यात आले आणि त्यानंतर चार सदस्यीय अंतराळवीरांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. या यशस्वी प्रक्रियेमुळे भविष्यातील मानवयुक्त चंद्र मोहिमांसाठी NASA ला मोठा आत्मविश्वास मिळाला आहे. या मोहिमेत सहभागी असलेल्या अंतराळवीरांमध्ये रीड वाइसमन, व्हिक्टर ग्लोव्हर आणि क्रिस्टीना कोच यांचा समावेश होता, तर Canadian Space Agency चे अंतराळवीर जेरमी हॅन्सन देखील या मोहिमेचा भाग होते. या सर्वांना ओरायन कॅप्सूलमधून यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आले, ज्यामुळे संपूर्ण बचाव प्रक्रिया सुरळीत पार पडल्याचे स्पष्ट झाले. ‘ओरायन’ कॅप्सूलचे महासागरात सुरक्षितपणे उतरणे (स्प्लॅशडाउन) आणि त्यानंतरची बचाव मोहीम ही अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया मानली जाते. या प्रक्रियेत कॅप्सूलचे अचूक नियंत्रण, वातावरणात पुनःप्रवेश (re-entry) दरम्यान होणाऱ्या उष्णतेचा सामना आणि योग्य ठिकाणी उतरणे यांसारख्या अनेक तांत्रिक बाबींची कसोटी लागते. या सर्व टप्प्यांमध्ये यश मिळाल्याने भविष्यातील चंद्र मोहिमांसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

Orion अंतराळयान आणि Artemis II मोहीम म्हणजे नेमके काय ?
Artemis II ही मोहीम Artemis Program अंतर्गत राबवली जात असून, या कार्यक्रमाचा उद्देश पुन्हा एकदा मानवाला चंद्रावर पाठवणे आणि पुढे मंगळ मोहिमांसाठी तयारी करणे हा आहे. या मोहिमेमुळे अंतराळवीरांना पृथ्वीच्या कक्षेबाहेर नेऊन चंद्राभोवती परिक्रमा करण्यात आली आहे. या यशस्वी चाचणीमुळे अंतराळ संशोधन क्षेत्रात नवा आत्मविश्वास निर्माण झाला असून, येणाऱ्या काळात मानवाच्या चंद्र मोहिमेचे स्वप्न साकार होण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे.
Artemis II ही NASA च्या Artemis Program अंतर्गत राबवली जाणारी एक अत्यंत महत्त्वाची मानवयुक्त अंतराळ मोहीम आहे. 1972 मधील Apollo 17 नंतर प्रथमच मानवाने पुन्हा चंद्राच्या दिशेने प्रवास केला असल्यामुळे या मोहिमेला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश म्हणजे पृथ्वीच्या कक्षेबाहेर मानवाला सुरक्षितपणे पाठवण्याची क्षमता तपासणे, ‘ओरायन’ Orion अंतराळयानाची मानवासह चाचणी करणे आणि भविष्यातील चंद्रावर उतरणाऱ्या मोहिमांसाठी (Artemis III) आवश्यक तांत्रिक तयारी करणे हा आहे. या मोहिमेत चार अंतराळवीरांचा समावेश आहे. Reid Wiseman कमांडर म्हणून कार्यभार सांभाळला आहे, तर Victor Glover पायलट म्हणून कार्यरत होते. याशिवाय Christina Koch आणि Jeremy Hansen यांनी मिशन स्पेशलिस्ट म्हणून काम पहिले. विशेष म्हणजे, Canadian Space Agency च्या सहभागामुळे ही मोहीम आंतरराष्ट्रीय सहकार्याचे उत्कृष्ट उदाहरण ठरते. ही मोहीम Space Launch System (SLS) या शक्तिशाली रॉकेटद्वारे Kennedy Space Center येथून प्रक्षेपित केली आणि ‘Orion’ कॅप्सूलमध्ये अंतराळवीरांनी प्रवास केला. मोहिमेचा कालावधी सुमारे 10 दिवसांचा होता. पहिल्या दिवशी रॉकेटने उड्डाण घेऊन पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केला त्यागोदर सर्व यंत्रणांची तपासणी केली गेली. दुसऱ्या दिवशी ‘Translunar Injection’ प्रक्रियेद्वारे अंतराळयान चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू करेल. तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी अंतराळवीर Deep Space मध्ये प्रवास करताना जीवनसुरक्षा प्रणाली, संवाद प्रणाली आणि इतर तांत्रिक बाबींची चाचणी केल्या गेले . पाचव्या आणि सहाव्या दिवशी अंतराळयान चंद्राच्या जवळ जाऊन त्याच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर करून ‘फ्लायबाय’ करून त्यासोबतच चंद्राचे निरीक्षण केले गेले. त्यानंतर सातव्या आणि आठव्या दिवशी अंतराळवीरांचा पृथ्वीच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू झाला होता, ज्यात विविध वैज्ञानिक प्रयोग आणि डेटा संकलन केला गेला आहे.
नवव्या आणि दहाव्या दिवशी ‘Orion’ कॅप्सूलने पृथ्वीच्या वातावरणात पुनःप्रवेश केला. या वेळी सुमारे 2700 अंश सेल्सिअस इतक्या तीव्र उष्णतेचा सामना करत कॅप्सूल सुरक्षितपणे पॅसिफिक महासागरात उतरले. त्यानंतर बचाव पथक अंतराळवीरांना सुरक्षितपणे बाहेर काढले. ही प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असली तरी तिचे यश भविष्यातील मोहिमांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते.
या मोहिमेत अनेक वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रयोग केले जाणार आहेत. यामध्ये जीवनसुरक्षा प्रणालींची चाचणी, अंतराळातील विकिरणाचा मानवी शरीरावर होणारा परिणाम, नेव्हिगेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालींची कार्यक्षमता तसेच ‘Heat Shield’ च्या क्षमतेची तपासणी यांचा समावेश आहे. या सर्व संशोधनामुळे मानव दीर्घकाळ अंतराळात राहू शकतो का, याचा अभ्यास होणार आहे.
Artemis II मोहिमेचे महत्त्व अत्यंत व्यापक आहे. या मोहिमेमुळे मानव पुन्हा चंद्रावर जाण्याचा मार्ग मोकळा होईल, आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना मिळेल आणि विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती होईल. याचबरोबर ही मोहीम भविष्यातील Artemis III मोहिमेसाठी पायाभरणी करेल, ज्यामध्ये मानव प्रत्यक्ष चंद्रावर उतरणार आहे. तसेच, ही मोहीम मंगळ ग्रहाच्या भविष्यातील मोहिमांसाठीही एक महत्त्वाचा टप्पा मानली जाते.
एकूणच, Artemis II ही केवळ एक अंतराळ चाचणी नसून मानवाच्या अंतराळ संशोधनाच्या नव्या युगाची सुरुवात आहे. Apollo missions नंतरची ही सर्वात महत्त्वाची मोहीम मानली जात असून, तिच्या यशामुळे मानवाच्या चंद्रावर आणि पुढे मंगळावर जाण्याच्या स्वप्नांना नवे पंख मिळणार आहेत.
समाज माध्यमावरील प्रतिक्रियेसाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
