भारतातील निवडणूक प्रक्रियेत एक महत्त्वाचा टप्पा गाठत तामिळनाडू आणि (West Bangal Election 2026) पश्चिम बंगाल (पहिला टप्पा) येथे यंदा विक्रमी मतदानाची नोंद झाली आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच या दोन्ही राज्यांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तामिळनाडूमध्ये 84.69% तर पश्चिम बंगालमध्ये (फेज-1) तब्बल 91.78% मतदान झाले आहे. यापूर्वी तामिळनाडूमध्ये सर्वाधिक मतदान 2011 मध्ये 78.29% इतके झाले होते, तर पश्चिम बंगालमध्ये 2011 मध्ये 84.72% मतदानाची नोंद होती. यंदाच्या निवडणुकीत या दोन्ही राज्यांनी आपलेच जुने विक्रम मोडीत काढले आहेत.

Tamilnadu and West Bangal Election 2026 : महिलांची आघाडी
या निवडणुकीतील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे महिलांचा वाढता सहभाग. तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या दोन्ही ठिकाणी महिलांनी पुरुषांपेक्षा अधिक प्रमाणात मतदान केले आहे. ही बाब लोकशाहीसाठी सकारात्मक संकेत मानली जात आहे, कारण महिलांचा वाढता सहभाग सामाजिक जागरूकतेत वाढ दर्शवतो.
तामिळनाडूतील आकडेवारी
- एकूण मतदारसंख्या: 5.73 कोटी
- पुरुष मतदार: 2.80 कोटी
- महिला मतदार: 2.93 कोटी
- तृतीयपंथी मतदार: 7,728
- एकूण उमेदवार: 4,023
तामिळनाडूमध्ये महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त असल्यामुळे मतदानातही त्यांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून आला.
(West Bangal Election 2026) पश्चिम बंगाल (पहिला टप्पा) आकडेवारी
- एकूण मतदारसंख्या: 3.60 कोटी
- पुरुष मतदार: 1.84 कोटी
- महिला मतदार: 1.76 कोटी
- तृतीयपंथी मतदार: 465
- एकूण उमेदवार: 1,478
पश्चिम बंगालमध्ये (West Bangal Election 2026) पहिल्या टप्प्यात मोठ्या उत्साहात मतदान झाले असून, ग्रामीण आणि शहरी भागातही मतदारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
हजारो उमेदवारांचे भविष्य ईव्हीएम मशीन मध्ये कैद
तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल (पहिला टप्पा) येथील मतदान प्रक्रिया पूर्ण होताच हजारो उमेदवारांचे राजकीय भवितव्य आता ईव्हीएम मशीनमध्ये सुरक्षितपणे बंदिस्त झाले आहे. तामिळनाडू मध्ये तब्बल 4,023 उमेदवार रिंगणात होते, तर पश्चिम बंगाल (फेज-1) मध्ये 1,478 उमेदवारांनी आपले नशीब आजमावले. मतदारांनी दिलेला प्रत्येक मताचा निर्णय आता ईव्हीएममध्ये नोंदवला गेला असून, या मतपेट्यांमध्येच या सर्व उमेदवारांच्या विजय-पराजयाचा निर्णय दडलेला आहे. प्रचाराच्या रणधुमाळीनंतर आता सर्वांचे लक्ष मतमोजणीच्या दिवसाकडे लागले आहे, कारण तेव्हाच स्पष्ट होईल की जनतेने कोणावर विश्वास दाखवला आणि कोणाचे राजकीय भविष्य उंचावणार आहे. या टप्प्यावर उमेदवारांपासून ते पक्ष कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांमध्ये उत्सुकता आणि तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
लोकशाहीचा उत्सव
या विक्रमी मतदानामुळे देशातील लोकशाही अधिक मजबूत होत असल्याचे चित्र स्पष्ट होते. मतदारांमध्ये वाढती जागरूकता, निवडणूक आयोगाचे प्रयत्न, तसेच मतदान प्रक्रियेतील पारदर्शकता यामुळे नागरिकांचा विश्वास वाढत असल्याचे दिसते. विशेषतः महिलांनी दाखवलेला उत्साह आणि सहभाग हा भविष्यातील निवडणुकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. तज्ज्ञांच्या मते, हा कल कायम राहिला तर भारतातील लोकशाही अधिक समावेशक आणि बळकट होईल.
इलेक्शन कमिशनच्या अधिकृत वेबसाईट साठी येथे क्लिक करा.
समाज माध्यमावरील प्रतीक्रीयेसाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट:
