मुंबई (Dhamaal 4) : बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कॉमेडी फ्रँचायझींपैकी एक असलेल्या ‘धमाल’ मालिकेचा चौथा भाग आता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिनेता अजय देवगण याने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. त्याने (Dhamaal 4) ‘धमाल ४’चा धमाकेदार ट्रेलर येतोय; अजय देवगणने दिली चाहत्यांना आनंदाची बातमी, १० जुलैला रंगणार कॉमेडीचा महाउत्सव ! ‘धमाल ४’च्या ट्रेलरच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली असून, आता चाहते या कॉमेडीच्या धमाक्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. अजय देवगणने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “Ek baat toh pakki hai, niyat inki kachchi hai 🫣 Buckle up for 4x the laughter and unstoppable Dhamaal.” या मजेशीर कॅप्शनमुळे चित्रपटातील विनोद, गोंधळ आणि धमाल याची झलक चाहत्यांना आधीच मिळाली आहे.

Dhamaal 4 : १२ जूनला ट्रेलर, १० जुलैला चित्रपटगृहात धूम
निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘धमाल ४’चा अधिकृत ट्रेलर १२ जून रोजी प्रदर्शित होणार आहे, तर हा चित्रपट १० जुलैपासून जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या घोषणेनंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया येत असून, अनेक जण पुन्हा एकदा धमालच्या वेड्या आणि हास्यपूर्ण दुनियेत प्रवेश करण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येत आहे.
‘धमाल’ फ्रँचायझीची प्रेक्षकांमध्ये वेगळी ओळख
२००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या पहिल्या ‘धमाल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले होते. त्यानंतर आलेल्या ‘डबल धमाल’ आणि ‘टोटल धमाल’ या चित्रपटांनाही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. आता चौथ्या भागातून प्रेक्षकांना आणखी मोठा विनोदी गोंधळ, भन्नाट संवाद, मजेदार प्रसंग आणि मनोरंजनाचा चौपट डोस पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे.
Dhamaal 4 : चाहत्यांची उत्सुकता शिगेला
अजय देवगणच्या या घोषणेनंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर #Dhamaal4 ट्रेंड होऊ लागला आहे. “४ पट हास्य आणि न थांबणारी धमाल” या टॅगलाइनमुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिक वाढली आहे. आता सर्वांच्या नजरा १२ जूनला प्रदर्शित होणाऱ्या ट्रेलरकडे लागल्या आहेत. ट्रेलरमध्ये कोणते कलाकार दिसणार, काय नवे ट्विस्ट असणार आणि ‘धमाल ४’ प्रेक्षकांचे किती मनोरंजन करणार याची उत्सुकता आता वाढली आहे.
१० जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये Dhamaal 4 ‘धमाल ४’चा धमाकेदार कॉमेडीचा स्फोट पाहायला मिळणार आहे.
समाज माध्यमावरील अभिनेता अजय देवगन यांची प्रतिक्रिया पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
